पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या हस्ते मांजरा धरणाचे जलपूजन संपन्न ; मांजरा धरण भरल्याचा आनंद आहे,अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेणार- रमेशराव आडसकर

इमेज
जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या हस्ते मांजरा धरणाचे जलपूजन संपन्न ; मांजरा धरण भरल्याचा आनंद आहे,अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेणार- रमेशराव आडसकर केज धनेगाव येथील केज सह अंबाजोगाई,लातूर येथील जलवाहिनी समजले जाणारे मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे.हा एक सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बाब असून  शेतकरी बांधवावर निसर्गाची कृपा कायम रहावी असे उद्गार रमेशराव आडसकर यांनी धनेगाव येथील मांजरा धरणाच्या जलपूजन करते वेळी व्यक्त केले.मागील काही दिवसांत भरपूर पाऊस झाल्याने अनेक शेतकर्यांचे पिक गेले आहेत.त्यांचे पंचनामे करणे सुरू आहे. मी स्वतः उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटून पिडीत शेतकर्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे.असेही रमेशराव आडसकर यांनी उपस्थित शेतकरी यांना आश्वासन दिले.  तसेच मांजरा धरण भरले आहे. व पाऊस काळ चांगला झाला आहे.त्यामुळे उसाचे पिक चांगले रहाणार आहे.अंबा सहकारी साखर कारखाना परिसरातील सर्व उस नेण्यासाठी तत्पर असून चांगला भाव देण्याची हमी देखील रमेशराव आडसकर यांनी दिली आहे.त्या...

केज तालुक्यात आरोग्य विभागाचा अजबच प्रकार,कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांना करु लागले बळजबरी

इमेज
केज तालुक्यात आरोग्य विभागाचा अजबच प्रकार,कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांना करु लागले बळजबरी. केज प्राथमिक आरोग्य केंद्र विडा परिसरातील गावागावांत आशा स्वयंसेविका घराघरात जाऊन कुटुंबातील महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी सक्ती करु लागल्या आहेत.आशा स्वयंसेविका कुटुंबातील महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिये साठी प्रवृत्त करण्या बरोबरच बळजबरी पण करु लागल्या आहेत. महिलांचे फोटो काढणे सह्या घेणे प्रकार सुरू केला आहे.त्यामुळे विडा परिसरात महिला दडपणाखाली आल्या आहेत.आशा स्वयंसेविकांना गावातील महिला सही देत नाहीत म्हटले तर त्या म्हणतात तुमच्या सर्व योजना सरकार बंद करणार आहे.हा अजब च प्रकार पाहून महिला घाबरून गेल्या आहेत. या प्रकरणी काय गोड बंगाल आहे हे आरोग्य विभागाने तातडीने स्पष्ट केले पाहिजे असे या भागातील लोक म्हणत आहेत.आज लहुरी आणि परिसरातील गावागावांतून लोक म्हणत आहेत की हा प्रकार तातडीने थांबला पाहिजे सध्या सगळी कडे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या या प्रकरणी लोक दडपणा खाली आले आहेत. तरी तालुका वैद्यकीय अधिकारी केज आणि विडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी य...

विजेचा धक्का लागून शेतकरी ठार

इमेज
  विजेचा धक्का लागून शेतकरी ठार.  केज केज तालुक्यातील कोरडेवाडी शिवारातील घाटेवस्ती येथे राहणारे शेतकरी बाबासाहेब रावसाहेब राख,वय 55 वर्षे यांना सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान विजेचा धक्का बसला.जखमी अवस्थेत त्यांना केज येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन त्यांना मयत घोषित केले. सोमवारी दि.18 आॕगष्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान कोरडेवाडी शिवारातील घाटेवस्ती येथे राहणाऱ्या बाबासाहेब रावसाहेब राख,वय 55 वर्षे यांना सोमवारी दि.18 आॕगष्ट रोजी राहत्या घरी विजेचा धक्का लागून ते जखमी झालेहोते.त्यांना पुढील उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात घेवून गेल्या नंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करुन त्यांना मयत झाल्याचे घोषित केले.बाबासाहेब राख यांच्या पश्च्यात पत्नी, 1 मुलगा असा परिवार असून सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर कोरडेवाडी येथील स्म्शानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले.

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने प्रफुल्ल कुलकर्णी यांना धर्मवीर जिवन गौरव पुरस्कार प्रदान.

इमेज
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने प्रफुल्ल कुलकर्णी यांना धर्मवीर जिवन गौरव पुरस्कार प्रदान.   अंबाजोगाई  विश्व हिंदू परिषद अंबाजोगाई प्रखंड च्या वतिने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोरजी मुंदडा, डॉ.शरदराव हेबाळकर, साईनाथ उपरे, डॉ.गोपाळ चौसाळकर,प्रणव रायचुरकर, गणेश पांचाळ, चंद्रकांत घोलप, कृष्णा देशमुख उपस्थित होते.  विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रास्ताविक डॉ चौसाळकर, चंद्रकांतजी घोलप म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या माध्यमातून हिंदू समाज संघटनाचे कार्य सुरू आहे.हिन्दु समाजासमोर अनेक समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कृष्णा देशमुख म्हणाले की, प्रफुल्ल कुलकर्णी यांनी राष्ट्र कार्यासाठी जिवन झोकून दिले.देशापुढील समस्या सोडविण्यासाठी हिंदू तरुणांनी संघटीत होऊन कार्य केले पाहिजे.समाज देश व संस्कृती टिकली पाहिजे असे आवाहन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना नंदकिशोर मुंदडा म्हणाले की,समाज कार्यासाठी वेळ देणे...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, शाखा केजच्या वतीने पत्रकार चंद्रकांत पाटील यांचा 54 वा वाढदिवस साजरा.

इमेज
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, शाखा केजच्या वतीने पत्रकार चंद्रकांत पाटील यांचा 54 वा वाढदिवस साजरा. केज  आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, एक नदीसारखा जो सतत वाहत असतो. प्रत्येक दिवस नवा अनुभव घेऊन येतो, पण वाढदिवस हा एक विशेष दिवस असतो. हा दिवस आनंद, खुशी आणि नवीन आशा घेऊन येतो. वाढदिवस म्हणजे आपल्या प्रियजनांसोबत एकत्र येऊन त्यांचा खास दिवस साजरा करण्याचा, आनंद आणि उत्सव अनुभवण्याचा वेळ आहे. हा दिवस जीवनातील यश, स्वप्ने आणि प्रेम साजरे करण्याची एक खास संधी देतो. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, शाखा केजच्या वतीने संघातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार तथा महाराष्ट्राचे पत्रकार संघ मुंबई शाखा केजचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा 54 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.  यामध्ये केज नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड, बाजीराव ढाकणे ( जिल्हा समन्वयक गो- शाळा जलदुत, पर्यावरण प्रेमी तथा जिल्हा समन्वयक महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य,भारतीय नमो संघाचे प्रदेश अध्यक्ष भाऊसाहे...

जीवन शिक्षण शैक्षणिक संकुलात 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

इमेज
जीवन शिक्षण शैक्षणिक संकुलात 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. केज  केज येथील झुंजार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जीवन शिक्षण शैक्षणिक संकुलाच्या  वतीने 79 वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती फैमून्निसा बेगम इनामदार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री हरून भाई इनामदार हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थिताना शुभेच्छा दिल्या. केज च्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, मार्गदर्शक श्री नबी भाई इनामदार,संस्थेचे सहसचिव श्री मोहम्मद यासीन हरून इनामदार, नगरसेवक राजू भाई इनामदार, जलाल भाई इनामदार, पद्मिन अक्का शिंदे,डॉ. त्र्यंबक चाटे, मुख्याध्यापक रमाकांत ढाकणे, प्रा.दत्ता हंडीबाग,विनायक ठोंबरे, सहाय्यक मुख्याध्यापक श्री संदीप गुळवे,रामचंद्र जाधव, श्री मुफसिल शेख, श्री पठाण व इतर मान्यवर तसेच पालक उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दिनांक 13,14, व 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांनी घुंगरू काठी, लेझिम, डंबेल,टिपरी इ...

माजलगाव धरण ४२ टक्के भरले.

इमेज
माजलगाव धरण ४२ टक्के भरले. माजलगाव  बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्या, नाले ओसंडून वाहू लागले असून प्रकल्पातील पाणीसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे. माजलगाव धरण ४२ टक्के भरले आहे. तालुक्यात गेल्या २४ तासात २२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात गेल्या २४ तासामध्ये १२.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुनपासून ते आत्तापर्यंत ५८.५ टक्के पाऊस झाला आहे.

BDS शिक्षणासाठी पात्र झाल्याबद्दल आडसकरांकडून कौतुकाची थाप

इमेज
BDS शिक्षणासाठी पात्र झाल्याबद्दल आडसकरांकडून कौतुकाची थाप  केज –     तालुक्यात धनेगाव येथील माजी सरपंच  सुहास गुजर यांची कन्या कु .श्रावणी सुहास गुजर हीची  दंतवैद्यक शाखेतील Bachelor of Dental Surgery (BDS) या पदवी अभ्यासक्रमासाठी पात्रता मिळवली आहे. त्यांच्या या यशाबद्दल राष्ट्रवादी कांग्रेस (अजित पवार)पक्षाचे नेते तथा अंबासाखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश आडसकर त्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश आडसकर,माजी सरपंच सतिष गुजर,चेरमन विकास पाटील, कृ.बा स.संचालक पशुपति पाटील, कृ.बा.संचालक रामकिसन बाबा खोडसे, शिवदास थळकरी , माजी सरपंच सुहास गुजर,रघुनंदन मोरे, बाळासाहेब नांदे, धनेश्वर गुजर, शंकर इंगळे, शाम खोडसे,गजानन गोरे , विशाल खोडसे, अमरदीप शिंदे,  उपस्थित होते. कू.श्रावणी सुहास गुजर हीने मेहनती अभ्यासात सातत्य ठेऊन यश मिळवले असून पालकांचे मार्गदर्शन, तसेच शिक्षकांचा या यशात मोलाचा वाटा असल्याचे  ऋषिकेश आडसकर यांनी बोलताना  सांगितले. श्रवणीच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन उज्ज्वल भवित...

*विद्यार्थ्याचा विकास हाच आमचा ध्यास :- श्रीमती बावचकर.* भालगाव येथील शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*

इमेज
*विद्यार्थ्याचा विकास हाच आमचा ध्यास :- श्रीमती बावचकर.* भालगाव येथील शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न* केज :-  शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या स्पर्धा परीक्षेतील एम टी एस या स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ भालगाव -१  येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. व्यासपिठावर ग्रामसेवक पुजारी, प्रशासक चौरे,युवराज ढोबळे, बालासाहेब मोरे,अमीन पठाण , मयूर सुरवसे, गिरी भगवान,उत्तमराव सुरवसे मेजर, राजेभाऊ मोरे मेजर,अरविंद मोरे उपस्थित होते.जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो म्हणून विद्यार्थ्याचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचे शाळेच्या शिक्षिका श्रीमती बावचकर बोलताना सांगितले. भालगाव.१ येथील जिल्हा परिषद शाळेतून एम टी एस.या शासनाच्या मान्यता प्राप्त स्पर्धा परीक्षेत  आरोही गोविंद कांबळे व कृष्णिका शरण मिटकरी यांनी गोल्ड मेडल, सिद्धी खंडू विभुते,सृष्टी बापूसाहेब मोरे, सृष्टी रमेश पारडे,यांनी सिल्वर मेडल पटकावले तर सिद्धेश्वर खंडू ...

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या – खा. रजनीताई पाटील

इमेज
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या – खा. रजनीताई पाटील केज   चार दिवसापासून बीड जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खा. रजनीताई पाटील यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना  नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.  शेती हा शेतकऱ्यांचा मुख्य आधार आहे. पाऊस, नैसर्गिक आपत्तीमुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून त्याला तात्काळ मदतीची गरज आहे. नुकसानग्रस्त भागांचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. पुढे बोलताना खा. पाटील म्हणाल्या की, शासनाने तत्परतेने कार्यवाही केली नाही तर शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक बिकट होईल. त्यामुळे प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणे ही काळाची गरज आहे. शासनाच्या विविध योजनांमधून तसेच आपत्ती व्यवस्थापन निधीतून तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.  शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून सर्व स्तरांवर लढा देण्याचा निर्धार खा. रजनीताई पाटील यांनी व्य...

लोकशाहीच्या संरक्षणासाठी खासदार रजनीताई पाटील आक्रमक !

इमेज
लोकशाहीच्या संरक्षणासाठी खासदार रजनीताई पाटील आक्रमक ! केज  राज्यसभेच्या खासदार संसदरत्न, कायम सामाजिक व सर्वसामान्य नागरिकांचे विविध विषय अभ्यासपूर्ण आणि आक्रमकपणे संसदेत मांडणाऱ्या काँग्रेसच्या खा रजनीताई पाटील यांनी काल इंडिया आघाडीच्या  आंदोलनात आक्रमक भूमिका घेतली. निवडणूक आयोगाने घेतलेली एकतर्फी भूमिका ही लोकशाहीला घातक असून काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी अतिशय महत्वाच्या मुद्याला हात घातला असून यासाठी विरोधी बाकावरील सर्व खासदार या आंदोलनात सामील झाले होते.  राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून  बीड च्या खासदार रजनीताई पाटील या आंदोलनात होत्या अक्षरशः सरकारने पोलिसांच्या दडपशाही ने हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला परंतु खा. राजनीताई पाटील यांनी महिला खासदार असताना देखील या विरोधाला न जुमानता अडवण्यासाठी टाकलेले बॅरिकेट ढकलून देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु भेटण्यासाठी जात असताना, इंडिया आघाडीतील खासदारांना पोलिसांकडून अडवण्यात आले आणि ताब्यातही घेण्यात आले.तरीही त्या मागे हटल्या नाहीत. मत चोरीच्या विरोधात मोठे आंदोलन केले ग...

*आवादा कंपनीच्या बेजबाबदार अधिकाऱ्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चा आज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा* *मोर्चाला सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे - भगवंत (अप्पा) वायबसे (मराठवाडा अध्यक्ष)*

इमेज
*आवादा कंपनीच्या बेजबाबदार अधिकाऱ्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चा आज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा*  *मोर्चाला सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे - भगवंत (अप्पा) वायबसे (मराठवाडा अध्यक्ष)* केज  आवादा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे केज तहसील कार्यालयासमोर उपोषण करत असलेल्या सुबाबाई गोपाळ भोसले यांची उपोषण स्थळावर तब्येत खालावली होती त्यांना दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते . आवादा कंपनीच्या सबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) यांच्या वतीने आज दि.12.08.2025 रोजी सकाळी 11  वाजता केज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचे  आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे मराठवाडा अध्यक्ष भगवंत (आप्पा) वायबसे यांनी केले आहे. याबाबतीत सविस्तर वृत्त असे की  आवादा कंपनीच्या मनमानी आणि गुंड प्रवृत्तीच्या छळाला कंटाळून दि.24. 07.2025 रोजी केज तहसील कार्यालयाच्या समोर  उपोषण करत असलेले भोसले,तेलंग, थोरात, आदी लोक उपोषण करत होते दि.25 रोजी त्यांना सौ. सबाबाई गोपाळ भोसले या भेटण्यासाठी आल्या होत...

सत्यशोधक साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त बिसेफच्या माध्यमातून परिसंवाद व राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न

इमेज
सत्यशोधक साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त बिसेफच्या माध्यमातून परिसंवाद व राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न.   केज   सत्यशोधक साहित्य सम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती केज येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भारतीय धम्म महासंघाच्या वतीने सर्व प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास आलेल्या सर्वच मान्यवरांचे स्वागत शाल हार व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.बौद्ध धम्माच्या नियमानुसार कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीदिलेल्या २२ प्रतिज्ञाचे यावेळी वाचन करण्यात आले तसेच भारतीय संविधानाच्याउद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर मंगल मैत्री गीत झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंगलम सर यांनी भूषविले.एच. पी.कांबळे यांनी प्रमुख मार्गदर्शकाची भूमिका निभावली त्याचप्रमाणे दीपक साठे,दत्ताजी मान,एस.एम जोगदंड, कोळंबीकर सर व प्रा. रामराव वाघमारे यांनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी मनोगत व्यक्त करताना श्रमिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण वाघमारे यांनी अशा कार्यक्रमाच...

तृतीयपंथांचे आयशा शेख यांच्यासोबत अनोखे रक्षाबंधन

इमेज
तृतीयपंथांचे आयशा शेख  यांच्यासोबत अनोखे रक्षाबंधन.   बीड   राखी पौर्णिमेनिमित्त बीड शहरातील तृतीयपंथी समुदायाने पत्रकार आणि समाजसेविका आयेशा शेख यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले. या विशेष प्रसंगी तृतीयपंथी व्यक्तींनी आयेशा शेख यांना राखी बांधून बंधुत्वाचा संदेश दिला, ज्यामुळे त्यांच्या सहकार्याची आणि समर्थनाची भावना प्रकट झाली. हा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये न केवल सणाच्या पारंपरिक महत्वाला उजाळा देण्यात आला, तर तृतीयपंथी समुदायाच्या अधिकारांसाठी आयेशा शेख यांनी त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या उपक्रमाद्वारे तृतीयपंथी समाजाने एकत्र येऊन एकत्रिततेचा शब्द आणि संदेश दिला, जेणेकरून समाजात सकारात्मक बदल घडवता येतील. हे एकत्रित पणे केलेले कार्य निसर्गाच्या किंवा आरोग्याच्या क्षेत्रात एकमेकांच्या मदतीसाठी नातेसंबंध साधण्यासाठी प्रभावी ठरले आहे. रक्षाबंधनाच्या या सणामुळे या समुदायाचा आपसी स्नेह, सहकार आणि बंधुत्वाची भावना आणखी दृढ झाली.  तृतीयपंथी व्यक्तींच्या विविधतेचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम खास होता, कारण यामुळे त्यांन...

ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यासाठी संघर्ष समिती पाठ पुरावा करणार,प्रसंगी आंदोलन छेडण्याचा बैठकीत निर्णय - धनंजय कुलकर्णी

इमेज
ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यासाठी संघर्ष समिती पाठ पुरावा करणार,प्रसंगी आंदोलन छेडण्याचा बैठकीत निर्णय - धनंजय कुलकर्णी  केज समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती मागील अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या उत्कर्षासाठी वेगवेगळी आंदोलन केली आहेत तसेच काही मागण्या सरकारकडून मान्य देखील झाल्या परंतु अजूनही काही मागण्या बाकी आहेत यामध्ये पुरोहिताना मानधन देणे, ब्राह्मण संरक्षण कायदा लागु करणे, प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह मिळावे, वेदपाठ शाळांना अनुदान द्यावे,मंदिरा वरील सरकारी नियंत्रण काढावे यासह अनेक मागण्यासाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती पाठपुरावा करत राहील व ब्राह्मण समाजाच्या व हिंदू धर्म परंपरा यासाठी कार्य करत राहील असा निर्णय संघर्ष समिती च्या बैठकीत घेण्यात आला. समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती च्या वतीने ब्राह्मण समाजाच्या उत्कर्षा साठी वेगवेगळी आंदोलने केली.यामध्ये धरणे आंदोलन,केज ते बीड मोटार सायकल रॕली मोर्चा,आझाद मैदानावरील धरणे आंदोलन,पळी ताम्हण वाजवून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन अशी नियमीत आंदोलन केली आमरण उपोषण केले यामुळे शिक्षण प्रशिक्षणासाठी अमृत संस्था,परश...

माऊलींच्या सुवर्ण कलशारोहणासाठी राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडून 1लाख 11हजार देणगी.

इमेज
माऊलींच्या सुवर्ण कलशारोहणासाठी राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडून 1लाख 11हजार देणगी. केज  दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे राहुल ज्ञानेश्वर चव्हाण असं म्हटलं तर वावगं  ठरणार नाही," इवलेसे रोप लाविलेये द्वारी, त्याचा वेणू चालला गगनावरी " दहा वर्षांपासून राहुल ज्ञानेश्वर चव्हाण हे समाजातील विविध क्षेत्रात दातृत्वाचे काम करताना दिसत आहेत. आज  संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५०व्या जयंती महोत्सवाच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या शिखरावर ११ किलो सुवर्णाचे कलशारोहण करण्याचा संकल्प सोडला आहे. हा महोत्सव गोकुळअष्टमी, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होणार आहे. या मंगल कार्यासाठी सर्व भाविक, भक्त आणि वारकऱ्यांना स्वेच्छेने आर्थिक देणगी किंवा वस्तुरूपी सुवर्ण दान देण्याचे आवाहन संस्थान कमिटीने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत आळंदी शिवसेना शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी उदार अंतःकरणाने देणगी अर्पण केली आहे. राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी आपले...

केंद्राच्या योजनेतून बीड जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी मंजूर,खा.बजरंग सोनवणे यांचे प्रयत्न फळाला.

इमेज
केंद्राच्या योजनेतून बीड जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी मंजूर,खा.बजरंग सोनवणे यांचे प्रयत्न फळाला. बीड पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत सन २०२५-२६ च्या वार्षिक आराखड्या नुसार बीड जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायत इमारती मंजुर करण्यात आलेल्या असून नवीन ग्रामपंचायत इमारत व नागरी सुविधा केंद्र खोली बांधण्यात येणार आहे. यासाठी खा. बजरंग सोनवणे यांनी पाठपुरावा केला असून आता या पाठपुराव्या मुळे गावांचा चेहरामोहरा बदलणार आहे.केंद्र शासनाने पंचायती राजव्यवस्थे च्या बळकटी करणा साठी राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान या योजनेचे पुनर्गठण करुन राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही योजना सन २०१८ -१९ ते सन २०२१-२२ या कालावधीत राबविली आहे.सदर योजनेचा मुळ ढाचा न बदलता सन २०२२-२३ पासून पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही योजना ग्रामविकास विभागाच्या निर्णयान्वये लागू केली आहे. सदर योजना केंद्रशासन पुरस्कृत असून या योजनेच्या निधीचे प्रमाण हे केंद्र हिस्सा ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के असे आहे. सन २०२५-२६ या वित्तीय वर्षाकरिता पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान योजनेसाठी वार्...

न्यू इंटेल कॉम्प्युटर,केज संस्थेला एम के सी एल चा मानाचा पुरस्कार

इमेज
न्यू इंटेल कॉम्प्युटर,केज संस्थेला एम के सी एल चा मानाचा पुरस्कार केज न्यू इंटेल कॉम्प्युटर केज ही एम एस सी आय टी MSCIT ची केज तालुक्यातील सर्वात जुनी आणि दर्जेदार संस्था असून,2025 या शैक्षणिक वर्षात MSCIT आणि 'क्लिक' या दोन्ही कोर्समध्ये मिळून संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक प्रवेश संख्या नोंदवल्याबद्दल या संस्थेला MKCL (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) तर्फे गौरवण्यात आले. ही गौरवपर पारितोषिक MKCLच्या विभागीय बैठकीत संस्थेचे प्राचार्य श्री.गणेश सत्वधर यांनी स्वीकारले.हेपारितोषिक MKCLव्यवस्थापकीय संचालक श्री.समीर पांडे सर आणि श्री. बालकिशन बलदवा सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. न्यू इंटेल कॉम्प्युटर ही संस्था गेल्या 25 वर्षां पासून गुणवत्तापूर्ण संगणक शिक्षण देण्यासाठी ओळखली जाते.या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवले असून, केज व परिसरात संगणक शिक्षण क्षेत्रात एक विश्वासार्ह नाव निर्माण केले आहे.या यशाबद्दल मित्रमंडळी व  विद्यार्थी यांच्या कडुन संचालक गणेश सत्वधर व सत्वधर परिवाराचे योगदानाबद्दल स्वागत केले आहे.

मल्टीस्टेट मध्ये बुडालेल्या खातेदारांच्या आशा पल्लवीत, खा.सौ.रजनीताई पाटील यांचे मानले आभार

इमेज
मल्टीस्टेट मध्ये बुडालेल्या खातेदारांच्या आशा पल्लवीत, खा.सौ.रजनीताई पाटील यांचे मानले आभार. केज दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मल्टीस्टेट बँकाच्या घोटाळ्यां विषयीच्या महत्वपूर्ण बैठकीत सहभागी होऊन खा.सौ.रजनीताई पाटील यांनी मल्टीस्टेट बँकाच्या गैरकारभाराने आर्थिक नुकसान झालेल्या व जीवन संपवलेल्या खातेदार, ठेवीदारांच्या मदतीसाठी परखडपणे भूमिका मांडली. याविषयी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षते खाली एक समिती तयार करण्यात आली जलद गतीने चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करून बाधीत खातेदारांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन बैठकीचे अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा आणि चौकशी समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खा.सौ. रजनीताई पाटील यांना दिल्यामुळे ठेवीदार व खातेदार यांच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यांनी खा.सौ.रजनीताई पाटील यांचे आभार मानले आहेत.

मौजे जीवाचीवाडी येथे 1100 वृक्षांची लागवड करण्यात आली.

इमेज
मौजे जीवाचीवाडी येथे 1100 वृक्षांची लागवड करण्यात आली. केज     हरित बीड जिल्हा अभियान अंतर्गत व जिल्हाधिकारी मा. विवेकजी जाॅन्सन साहेब यांच्या संकल्पनेतून 1100 वृक्ष लागवड  मौजे जीवाची वाडी येथे करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये मध्ये शाळा महाविद्यालय तालुकास्तर गाव पातळीवर असे मिळून तीस लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले, हे उद्दिष्ट ठेवून येणाऱ्या काळात एक कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. आज मौजे जिवाचीवाडी ता.केज ग्रामपंचायत अंतर्गत गावात तीनशे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले,  यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते भागवत चौरे सरपंच पती दिपक काळे तलाठी गुलबिले मॅडम केज पोलिस स्टेशन व विडा बिट अंमलदार सोनवणे सर दराडे सर सानप मॅडम गव्हाणे मॅडम ग्रामपंचायत महसूल अधिकारी ढाकणे सर नितिन फुंदे  नवनाथ सोळुंके बबरू कांबळे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक  मुन्ना सर व सर्व शिक्षक आणि कर्मचारी तसचे प्राथमिक शाळेतील वर्ग धवलसिंग सर बोबडे सर शिक्षक गण व विद्यार्थी तसेच गावकरी वृक्षारोपण कार्यक्रमांत मोठ्या संख्येने उपस्थित ...

सह दुय्यम निबंधक केज कार्यालयामध्ये महसूल सप्ताहाचे आयोजन. सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.

इमेज
सह दुय्यम निबंधक केज कार्यालयामध्ये महसूल सप्ताहाचे आयोजन. सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न. केज   महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे केज तालुका कार्यालयात 01 ते 07 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. शासनाच्या विविध योजनांचा  लाभ घेण्यासाठी विशेष माहिती सह दुय्यम निबंधक श्रीमती एस. बी. परदेशी, कनिष्ठ लिपिक श्री. समीर शेख यांनी पक्षकारांना मार्गदर्शन केले. सलोखा योजना, जमीन आदला बदल पत्र इत्यादी,  सुविधा प्रदान करण्यात आल्या. या सप्ताहाच्या काळात मुद्रांक विक्रेते श्री शेख खातासाहेब गुलाब, उत्तम बाबुराव थोरात, कुरेशी हरून हुसेन, श्रीराम शेटे, वशिष्ठ घोळवे ,शेख अजित, मोहनराव साठे, भगवानराव जमाले, किसन महाजन ,अनंत शिरसाट, योगेश आरकर ,तसेच दस्त लेखक भीमराव लोंढे, रामभाऊ धनवडे ,आश्रुबा रांजणकर, ऍड व्ही एस मुंडे, हिराचंद काळे, धैर्यशील देशमुख .

श्री.अजित पवार मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड यांच्याकडून बीड जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा बैठक संपन्न.

इमेज
श्री.अजित पवार मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड यांच्याकडून बीड जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा बैठक संपन्न.   बीड  राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील विविध महत्वाच्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री क्षेत्र परळी वैजनाथ मंदिर विकास आराखडा, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा ग्रंथालय, सहकार भवन, तसेच विविध प्रशासकीय इमारतींच्या उभारणीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. बैठकीला आमदार सतीश चव्हाण, धनंजय मुंडे, विक्रम काळे, नमिता मुदंडा, संदीप क्षीरसागर, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रमुख मुद्दे: प्रशासकीय संकुल: महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्य शासकीय इमारती एकाच परिसरात सुसज्ज व आधुनिक स्वरूपात उभारण्याचे निर्देश. इमारतींच्या आराखड्यात नैसर्गिक प्रकाश, व्हेंटिलेशन व सौरऊर्जा प्रणालीचा समावेश अनिवार्य. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय: जुन्या इमारतींच्या जागी नवीन अद्ययावत रुग्णालय उभारणीसाठी आराखडा तयार करण्याचे आदेश. परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र:...

हरित बीड अभियान अंतर्गत बोरगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले.

इमेज
हरित बीड अभियान अंतर्गत बोरगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. केज हरित बीड जिल्हा अभियान अंतर्गत व जिल्हाधिकारी मा . विवेकजी जाॅन्सन साहेब यांच्या संकल्पनेतून तीस लाख वृक्षारोपण महा वृक्षारोपण कार्यक्रम मोहिम राबविण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये मध्ये शाळा महाविद्यालय तालुकास्तर गाव पातळीवर असे मिळून तीस लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले, हे उद्दिष्ट ठेवून येणाऱ्या काळात एक कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. आज बोरगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावात अकराशे  रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले,  यावेळी उपस्थित सरपंच गव्हाणे ग्रामपंचायत अधिकारी कोकाटे साहेब ग्रामपंचायत महसूल अधिकारी मॅडम संपर्क अधिकारी विश्वास राऊत तसेच माध्यमिक शाळेचे शिक्षक विद्यार्थी पालक गावकरी वृक्षारोपण कार्यक्रमांत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान; शेतकरी पुत्र खा.सोनवणेंनी संसदेत मांडला प्रश्न,हरीण, रानडुकरांनी नुकसान केल्यास भरपाई का नाही? शेतकऱ्यांच्या आवाज दिल्लीत पोहचविला.

इमेज
वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान; शेतकरी पुत्र खा.सोनवणेंनी संसदेत मांडला प्रश्न,हरीण, रानडुकरांनी नुकसान केल्यास भरपाई का नाही? शेतकऱ्यांच्या आवाज दिल्लीत पोहचविला. बीड बीड जिल्ह्यात हरीण, रानडुक्करे व इतर वन्य प्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होत आहे. नैसर्गिक आपत्ती सोबतच जंगली प्राणी उपद्रवामुळे शेतीमालाचे नुकसान बीड जिल्ह्या तील कांही भागात मोठ्या प्रमाणात होत असते.ही चिंतेची बाब आहे.हा उपद्रव रोखण्यासाठी उपाय योजना करण्याची गरज आहे.नुकसानग्रस्त शेतक-यांना पिकांची नुकसान भरपाई मिळत नाही.इतर राज्यांमधे हत्तीने पिकाचे नुकसान केले तर भरपाई मिळते पण आमच्या शेतकऱ्यांना हरीण, रानडुक्कर यांनी नुकसान केल्यानंतर नुकसान भरपाई का मिळत नाही? असा सवाल उपस्थित करत वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी तसेच हा उपद्रव रोखण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात,अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी संसदेत केली. जिल्ह्यातील शेतकरी पुत्र म्हणून खा.सोनवणे यांची ओळख असून ते वारंवार शेती प्रश्नावर आवाज उठवित आहेत. कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकुर यांनी दिलेल्या लेखी...

*मायबाप सरकार " युवा प्रशिक्षणार्थीना" कायमस्वरूपी हक्काची भाकरी द्या :- दत्तात्रय मुजमुले* *सांगली येथील बेमुदत आमरण उपोषण म्हणजे उद्रेकाची सुरूवातच*

इमेज
  *मायबाप सरकार " युवा प्रशिक्षणार्थीना" कायमस्वरूपी हक्काची भाकरी द्या :- दत्तात्रय मुजमुले* *सांगली येथील बेमुदत आमरण उपोषण म्हणजे उद्रेकाची सुरूवातच* केज  महाराष्ट्रातील महायुती सरकारने राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून योजना काढली. त्यात अनेक तरुणांना अल्प रोजगार मिळाला.मात्र सरकारने त्यापुढे फक्त पाच महिन्याचा कालावधी वाढवत सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींचे भविष्य अंधारात ढकलले आहे.       सरकारने राज्यातील अंदाजे 1 लाख ३४ हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीना वाऱ्यावर सोडत आहेत.बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.पुढे पाच महिने वाढीव देण्यात आले असून भविष्यात मात्र कालावधी वाढवणार नसल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्या खात्याचे मंत्री हे युवा प्रशिक्षणार्थीच्या भावनेशी खेळत आहेत. प्रशिक्षणार्थीना हे सरकार फसवत आहेत. युवा प्रशिक्षणार्थीना हक्काची कायमस्वरूपी भाकरी मिळवून देण्यासाठी सां...

*कानडी माळी येथे "एक पेड मा के नाम 2.0 अभियान"अंतर्गत वृक्षलागवड मोहिमेचे यशस्वी आयोजन*

इमेज
  *कानडी माळी  येथे "एक पेड मा के नाम 2.0 अभियान"अंतर्गत वृक्षलागवड मोहिमेचे यशस्वी आयोजन* कानडी माळी  (ता.केज जि.बीड)  पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय दिनांक 7 जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते. कानडी माळी  परिसरात भव्य वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत सुमारे 1000 वृक्षांचे लागवड यशस्वीरित्या पूर्ण झाली असून परिसर आता हरित क्षेत्रात रूपांतरित होत आहे. ही मोहिम ग्रामस्थांच्या सहभागाने आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पार पडली. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदवला. लागवड केलेल्या वृक्षांमध्ये आंबा, सागवान, चिंच, कडुलिंब, बाभळी आदी देशी व पर्यावरणपूरक प्रजातींचा समावेश आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. अशोक राऊत यांनी सांगितले की, "पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे. वृक्षलागवड ही केवळ एक सामाजिक जबाबदारी नसून भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे." यावेळी गावचे उपसरपंच बाळासाहेब राऊत ग्र...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज च्यावतीने ज्येष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ संपन्न.

इमेज
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज च्यावतीने ज्येष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ संपन्न. केज  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज च्या वतीने ज्येष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी यांचा आज दिनांक ०५/०८/२०२५ वार मंगळवार रोजी वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह केज येथे पार पडला. धनंजय कुलकर्णी हे ज्येष्ठ  पत्रकार व रॉयल इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आहेत, ते समाजकार्यात सतत अग्रेसर व प्रसिद्ध व्यक्ती म्हणून कार्यरत आहेत. यावेळी सत्कार समारंभासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ केज तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाटील,  उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड,  सचिव विजय बिक्कड, कार्याध्यक्ष नंदकुमार मिसाळ, पत्रकार विरोधी हल्ला समिती अध्यक्ष विश्वास राऊत, पत्रकार रोहन गलांडे, पत्रकार हिरामण काळे उपस्थित होते.

लोकजगत वृत्तपत्राचे केज तालुका प्रतिनिधी म्हणून हिरामण काळे यांची निवड,

इमेज
लोकजगत वृत्तपत्राचे केज तालुका प्रतिनिधी म्हणून हिरामण काळे यांची निवड, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज च्या वतीने केले स्वागत. केज लोकजगत वृत्तपत्राच्या संपादिका शेख आयेशा यांच्या मार्गदर्शनाखाली ताज्या बातम्या,लेख, आणि विविध विषया वरील माहिती वाचका पर्यंत पोहोंचवणे,हि जनहिताची कामे करण्यासाठी केज तालुका प्रतिनिधी म्हणून हिरामण काळे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोकजगत हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात प्रकाशित होणारे मराठी भाषेतील साप्ताहिक वृत्तपत्र आहे. साप्ताहिक वृत्तपत्र हे एक सामान्य-बातम्या किंवा चालू घडामोडींचे प्रकाशन आहे जे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा विविध ब्रॉडशीट,मासिके आणि डिजिटल स्वरूपात प्रकाशित केले जाते. लोकजगत या वृत्तपत्राचे केज तालुका प्रतिनिधी म्हणून  हिरामण काळे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरावरून स्वागत व शुभेच्छा दिल्या जात आहेत.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज पदाधिकारी  यांच्या वतीने त्यांचा सत्कार केला आहे.

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामास उच्च न्यायालयाची मंजुरी. केज वकील संघाच्या मागणीला यश.

इमेज
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामास उच्च न्यायालयाची मंजुरी. केज वकील संघाच्या मागणीला यश. केज केज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम करण्यास मा.उच्च न्यायालय,मुंबई यांनी मंजुरी दिली असून, सदर बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता प्रक्रियेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बीड यांच्या आदेशानुसार बांधकाम विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रस्तावित इमारतीत पुढील सुविधांचा समावेश असणे आवश्यक आहे. तृतीयपंथीय व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे तसेच दिव्यांग,महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी न्यायालयीन इमारतीत प्रवेशयोग्य पायाभूत सुविधा असल्या पाहिजेत.सदर प्रस्ताव मा.उच्च न्यायालयाचे पत्र दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ व दिनांक २१ डिसेंबर २०२४ नुसार तयार करण्यात आला आहे.  प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंबाजोगाई कार्यालया मार्फत तांत्रिक मान्यते साठी आवश्यक बाबींचा समावेश करून अंतिम ...

शारदा इंग्लिश स्कूल केजचे प्राचार्य श्री.मिश्रा सोनल महेंद्र यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान

इमेज
शारदा इंग्लिश स्कूल केजचे प्राचार्य श्री.मिश्रा सोनल महेंद्र यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान.  केज केज शहरातील शारदा इंग्लिश स्कूल शाळेचे प्राचार्य श्री.सोनल महेंद्र मिश्रा यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी "मालती राव,जेसिका मूर,आणि नाओइस डोलन यांच्याकाल्पनिक कथांमध्ये एक स्त्रीवादी मॅट्रिक्स" या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला,तो प्रबंध मंजूर  होऊन विद्यापीठातर्फे त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. पीएचडी प्रदानकमिटीचे अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ. मुश्तजीब खान प्रोफेसर इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर हे होते. तर बाह्य परीक्षक म्हणून श्री.एच.एम सरवदे सहाय्यक प्रोफेसर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे होते. डॉ.सोनल मिश्रा यांनी हा प्रबंध मार्गदर्शक श्री डॉ.डी.एन.गंजेवार प्राचार्य प्रल्हादराय दालमिया सायन्स कॉलेज मुंबई (माजी  इंग्रजी विभाग प्रमुख व वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्ले धारूर जिल्हा बीड) यांच्या मार्गदर...