विश्व हिंदू परिषदेच्या वतीने प्रफुल्ल कुलकर्णी यांना धर्मवीर जिवन गौरव पुरस्कार प्रदान.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने प्रफुल्ल कुलकर्णी यांना धर्मवीर जिवन गौरव पुरस्कार प्रदान.
अंबाजोगाई
विश्व हिंदू परिषद अंबाजोगाई प्रखंड च्या वतिने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोरजी मुंदडा, डॉ.शरदराव हेबाळकर, साईनाथ उपरे, डॉ.गोपाळ चौसाळकर,प्रणव रायचुरकर, गणेश पांचाळ, चंद्रकांत घोलप, कृष्णा देशमुख उपस्थित होते.
विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रास्ताविक डॉ चौसाळकर,
चंद्रकांतजी घोलप म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या माध्यमातून हिंदू समाज संघटनाचे कार्य सुरू आहे.हिन्दु समाजासमोर अनेक समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कृष्णा देशमुख म्हणाले की, प्रफुल्ल कुलकर्णी यांनी राष्ट्र कार्यासाठी जिवन झोकून दिले.देशापुढील समस्या सोडविण्यासाठी हिंदू तरुणांनी संघटीत होऊन कार्य केले पाहिजे.समाज देश व संस्कृती टिकली पाहिजे असे आवाहन केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना नंदकिशोर मुंदडा म्हणाले की,समाज कार्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे.साधु संतांनी समाज जोडण्याचे काम केले.प्रफुल्ल नानांनी प्रतिकूल परिस्थितीत हिंदू समाज जोडण्याचे कार्य केले, कार्यकर्ते जोडण्याचे काम केले.हा सत्कार नानांच्या लढवय्ये पणाला आहे.या कार्यासाठी कै.वहिनींची खंबीरपणे साथ होती.पालकांनी आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करावेत तरच समाज एकसंघ निर्माण होईल.
प्रफुल्ल कुलकर्णी म्हणाले की,
हिंदू समाज जागृती चे काम केले तो खारीचा वाटा आहे.सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे ज्या मार्गाने विजय मिळवता येतो तो मार्ग अवलंबला पाहिजे मला हिन्दू समाजाची साथ मिळाली म्हणूनच कार्य करु शकलो.आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे.पण आमचा शत्रूबोध संपल्यामुळे हिंदू समाज संघटीत होण्यास अडचण होत आहे.समाजात काम करतांना समाज हित जोपासले गेले पाहिजे असे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ.हेबाळकर म्हणाले की, मला कार्यकर्त्यांचे कौतुक करण्याची संधी मिळाली व्यापक मंथन झाले.देशात हिंदूंचे एक मोठे जनसंघटन व कार्यकर्ते उभे राहिले पाहिजे. तरच समाज उभा राहिल.हे कार्य संघाने उभे केले.अशा कार्यकर्त्यां पैकी एक प्रफुल्ल कुलकर्णी होत.हिंन्दू एकजुट च्या माध्यमातून अनेक तरुण जोडले त्याचेच रूपांतर नंतर बजरंग दलात झाले.मी समाजासाठी काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे.असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.आरती सोनेसांगवीकर,तर आभार प्रदर्शन जयदीप चिलमे यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन ॲड कल्याणीताई विर्धे यांनी केले.याप्रसंगी सर्व हिन्दूत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी साईनाथ उपरे यांच्या वतीने गौशाळे साठी मोफत औषधी वाटप करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा