जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या हस्ते मांजरा धरणाचे जलपूजन संपन्न ; मांजरा धरण भरल्याचा आनंद आहे,अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेणार- रमेशराव आडसकर

जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या हस्ते मांजरा धरणाचे जलपूजन संपन्न ; मांजरा धरण भरल्याचा आनंद आहे,अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेणार- रमेशराव आडसकर



केज


धनेगाव येथील केज सह अंबाजोगाई,लातूर येथील जलवाहिनी समजले जाणारे मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे.हा एक सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बाब असून  शेतकरी बांधवावर निसर्गाची कृपा कायम रहावी असे उद्गार रमेशराव आडसकर यांनी धनेगाव येथील मांजरा धरणाच्या जलपूजन करते वेळी व्यक्त केले.मागील काही दिवसांत भरपूर पाऊस झाल्याने अनेक शेतकर्यांचे पिक गेले आहेत.त्यांचे पंचनामे करणे सुरू आहे. मी स्वतः उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटून पिडीत शेतकर्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे.असेही रमेशराव आडसकर यांनी उपस्थित शेतकरी यांना आश्वासन दिले. 

तसेच मांजरा धरण भरले आहे. व पाऊस काळ चांगला झाला आहे.त्यामुळे उसाचे पिक चांगले रहाणार आहे.अंबा सहकारी साखर कारखाना परिसरातील सर्व उस नेण्यासाठी तत्पर असून चांगला भाव देण्याची हमी देखील रमेशराव आडसकर यांनी दिली आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे. मांजरा धरणाच्या जलपूजन प्रसंगी रमेशराव आडसकर यांच्यासोबत अंकुश अण्णा इंगळे कृ. उ.बा.स.सभापती केज, ॠषीकेश भैय्या आडसकर,राजाभाऊ अवताडे रा.कॉ.ता. अंबाजोगाई,बालासाहेब शेप सरपंच,अमर भैय्या पाटील रा.कॉ.पा.ता.अ. केज,संभाजी इंगळे, खोडसे मामा,तपसे, काळदाते यांच्या सह शेतकरी कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा