महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, शाखा केजच्या वतीने पत्रकार चंद्रकांत पाटील यांचा 54 वा वाढदिवस साजरा.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, शाखा केजच्या वतीने पत्रकार चंद्रकांत पाटील यांचा 54 वा वाढदिवस साजरा.











केज 


आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, एक नदीसारखा जो सतत वाहत असतो. प्रत्येक दिवस नवा अनुभव घेऊन येतो, पण वाढदिवस हा एक विशेष दिवस असतो. हा दिवस आनंद, खुशी आणि नवीन आशा घेऊन येतो.

वाढदिवस म्हणजे आपल्या प्रियजनांसोबत एकत्र येऊन त्यांचा खास दिवस साजरा करण्याचा, आनंद आणि उत्सव अनुभवण्याचा वेळ आहे. हा दिवस जीवनातील यश, स्वप्ने आणि प्रेम साजरे करण्याची एक खास संधी देतो.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, शाखा केजच्या वतीने संघातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार तथा महाराष्ट्राचे पत्रकार संघ मुंबई शाखा केजचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा 54 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

चंद्रकांत पाटील यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.  यामध्ये केज नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड, बाजीराव ढाकणे ( जिल्हा समन्वयक गो- शाळा जलदुत, पर्यावरण प्रेमी तथा जिल्हा समन्वयक महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य,भारतीय नमो संघाचे प्रदेश अध्यक्ष भाऊसाहेब घोडके यांनी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले आहे.

यावेळी  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केजचे उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, सचिव विजय बिक्कड, कार्याध्यक्ष नंदूलाल मिसाळ, प्रसिद्धीप्रमुख  पांडुरंग कसबे, पत्रकार हिराचंद काळे. पत्रकार सचिन साखरे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा