जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामास उच्च न्यायालयाची मंजुरी. केज वकील संघाच्या मागणीला यश.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामास उच्च न्यायालयाची मंजुरी. केज वकील संघाच्या मागणीला यश.
केज
केज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम करण्यास मा.उच्च न्यायालय,मुंबई यांनी मंजुरी दिली असून, सदर बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता प्रक्रियेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बीड यांच्या आदेशानुसार बांधकाम विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रस्तावित इमारतीत पुढील सुविधांचा समावेश असणे आवश्यक आहे. तृतीयपंथीय व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे तसेच दिव्यांग,महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी न्यायालयीन इमारतीत प्रवेशयोग्य पायाभूत सुविधा असल्या पाहिजेत.सदर प्रस्ताव मा.उच्च न्यायालयाचे पत्र दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ व दिनांक २१ डिसेंबर २०२४ नुसार तयार करण्यात आला आहे.
प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंबाजोगाई कार्यालया मार्फत तांत्रिक मान्यते साठी आवश्यक बाबींचा समावेश करून अंतिम अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे.या निर्णयामुळे केज तालुक्यातील न्यायिक कामकाज अधिक सुसज्ज आणि सर्वसमावेशक पद्धतीने पार पाडले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.केज वकील संघाचे अध्यक्ष अॕड. एम.एस.लाड यांच्या सह वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याची मागणी केली होती त्यांच्या मागणीची दखल घेऊन मा.उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे याबद्दल केज वकील संघाच्या वतीने मा.उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा