*आवादा कंपनीच्या बेजबाबदार अधिकाऱ्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चा आज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा* *मोर्चाला सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे - भगवंत (अप्पा) वायबसे (मराठवाडा अध्यक्ष)*
*आवादा कंपनीच्या बेजबाबदार अधिकाऱ्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चा आज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा*
*मोर्चाला सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे - भगवंत (अप्पा) वायबसे (मराठवाडा अध्यक्ष)*
केज
आवादा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे केज तहसील कार्यालयासमोर उपोषण करत असलेल्या सुबाबाई गोपाळ भोसले यांची उपोषण स्थळावर तब्येत खालावली होती त्यांना दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते .
आवादा कंपनीच्या सबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) यांच्या वतीने आज दि.12.08.2025 रोजी सकाळी 11 वाजता केज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे मराठवाडा अध्यक्ष भगवंत (आप्पा) वायबसे यांनी केले आहे.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की आवादा कंपनीच्या मनमानी आणि गुंड प्रवृत्तीच्या छळाला कंटाळून दि.24. 07.2025 रोजी केज तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण करत असलेले भोसले,तेलंग, थोरात, आदी लोक उपोषण करत होते दि.25 रोजी त्यांना सौ. सबाबाई गोपाळ भोसले या भेटण्यासाठी आल्या होत्या, आपल्या कुटुंबावर होत असलेला अन्याय अत्याचार पाहून त्यांची तब्येत अचानक खालावली होती त्यांना केज येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यामुळे आवाजा कंपनीचे संबंधित अधिकारी सतीश कुमार शर्मा, सागर चंद्रकांत साबळे, संदीप खेत्रे, सुनील शिंदे, व गुत्तेदार अमोल पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक (भाऊ)निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मराठवाडा अध्यक्ष भगवंत (आप्पा )वायबसे यांच्या उपस्थितीत दिनांक आज 12.08.2025 रोजी केज येथील भवानी चौकातून तहसील कार्यालया समोर धडक मोर्चा काढणार असल्याचे शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.
मागण्यामध्ये
(1) आवादा कंपनीचे संबंधित अधिकारी सतीश कुमार शर्मा ,सागर चंद्रकांत साबळे,संदीप कात्रे,सुनील शिंदे व गुत्तेदार अमोल पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
(2) पहिल्या सर्वे प्रमाणे लाईटचे काम मा. उपजिल्हा दंडाधिकारी साहेब आंबेजोगाई यांच्या पूर्ण परवानग्या घेऊन करण्यात यावे
(3) शेतकरी बांधवावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
(4) पहिल्या सर्वे मध्ये छेडछाड करून गरीब बांधवावर दबाव तंत्राचा वापर करून चालू केलेले काम कायमस्वरूपी बंद करण्यात या चार मागण्यांचा समावेश आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा