*कानडी माळी येथे "एक पेड मा के नाम 2.0 अभियान"अंतर्गत वृक्षलागवड मोहिमेचे यशस्वी आयोजन*

 *कानडी माळी  येथे "एक पेड मा के नाम 2.0 अभियान"अंतर्गत वृक्षलागवड मोहिमेचे यशस्वी आयोजन*









कानडी माळी  (ता.केज जि.बीड) 

पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय दिनांक 7 जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते. कानडी माळी  परिसरात भव्य वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत सुमारे 1000 वृक्षांचे लागवड यशस्वीरित्या पूर्ण झाली असून परिसर आता हरित क्षेत्रात रूपांतरित होत आहे.

ही मोहिम ग्रामस्थांच्या सहभागाने आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पार पडली. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदवला. लागवड केलेल्या वृक्षांमध्ये आंबा, सागवान, चिंच, कडुलिंब, बाभळी आदी देशी व पर्यावरणपूरक प्रजातींचा समावेश आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. अशोक राऊत यांनी सांगितले की, "पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे. वृक्षलागवड ही केवळ एक सामाजिक जबाबदारी नसून भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे."

यावेळी गावचे उपसरपंच बाळासाहेब राऊत ग्रामपंचायत सदस्य मसुराम राऊत, राहुल राऊत, रामेश्वर राऊत, स्थानिक शाळेचे मुख्याध्यापक, तलाठी, मंडळ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व वनविभागाचे अधिकारी यांनी देखील या उपक्रमात मोलाची भूमिका बजावली. लागवडीनंतर या झाडांचे संगोपन व देखभाल यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.

सदरील कार्यक्रमासाठी कानडी माळी ग्रामपंचायत अधिकारी श्री शंकर हेडगिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रम चे यशस्वी नियोजन केले. परिसरातील लोकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा