ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यासाठी संघर्ष समिती पाठ पुरावा करणार,प्रसंगी आंदोलन छेडण्याचा बैठकीत निर्णय - धनंजय कुलकर्णी

ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यासाठी संघर्ष समिती पाठ पुरावा करणार,प्रसंगी आंदोलन छेडण्याचा बैठकीत निर्णय - धनंजय कुलकर्णी 











केज


समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती मागील अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या उत्कर्षासाठी वेगवेगळी आंदोलन केली आहेत तसेच काही मागण्या सरकारकडून मान्य देखील झाल्या परंतु अजूनही काही मागण्या बाकी आहेत यामध्ये पुरोहिताना मानधन देणे, ब्राह्मण संरक्षण कायदा लागु करणे, प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह मिळावे, वेदपाठ शाळांना अनुदान द्यावे,मंदिरा वरील सरकारी नियंत्रण काढावे यासह अनेक मागण्यासाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती पाठपुरावा करत राहील व ब्राह्मण समाजाच्या व हिंदू धर्म परंपरा यासाठी कार्य करत राहील असा निर्णय संघर्ष समिती च्या बैठकीत घेण्यात आला.

समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती च्या वतीने ब्राह्मण समाजाच्या उत्कर्षा साठी वेगवेगळी आंदोलने केली.यामध्ये धरणे आंदोलन,केज ते बीड मोटार सायकल रॕली मोर्चा,आझाद मैदानावरील धरणे आंदोलन,पळी ताम्हण वाजवून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन अशी नियमीत आंदोलन केली आमरण उपोषण केले यामुळे शिक्षण प्रशिक्षणासाठी अमृत संस्था,परशुराम आर्थिक विकास महामंडळ तयार झाली तर केंद्र सरकार कडून इडब्लुएस आरक्षण, वेदभुषण, वेदविभुषण शिक्षणाला १० वी १२ वी चा दर्जा दिला अश्या काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी अजुन तरी अमृत संस्था कडून गरजुंना योग्य योजना तयार केलेल्या नाही आणि परशुराम आर्थिक विकास महा मंडळ अजुनही कार्यरत नाही तसेच पुरोहितांना मानधन,ब्राह्मण संरक्षण कायदा,के जी टु पि जी मोफत शिक्षण,प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण मुलामुलींसाठी वस्तीगृह वेदपाठ शाळाना शासकीय अनुदान द्यावे मंदिरावरील शासकीय नियंत्रण काढावे या उर्वरीत मागण्यासाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती नियमित पाठपुरावा करेल तसेच वेळ पडल्यास वेगवेगळ्या प्रकारची लोकशाही जपणारी आंदोलन केली जातील ब्राह्मण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत शासकीय योजना पोंहचली जात नाही तोपर्यंत तसेच ब्राह्मण समाजावर होणाऱ्या अन्यायाला संघर्ष समिती सतत लढा देत राहील असे समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय कुलकर्णी, दिपक रणनवरे,श्रीकांत जोशी,ईश्वर दिक्षीत, चंद्रकांत पाटील,श्रीधर खोत,श्रीराम शेटे, पुरोहित कल्याणसमिती चे प्रदेशाध्यक्ष श्रीनिवास केजकर, ऋषीकेश जोशी,अनंत देवा कोकीळ,योगेश देवा जोशी,भीमाशंकर कुलकर्णी लातुर जिल्हा अध्यक्ष,प्रविण जोशी युवा कल्याण समिती मराठवाडा अध्यक्ष, सुहास कुलकर्णी यवतमाळ जिल्हाध्यक्ष विकास वाघ धाराशीव जिल्हाध्यक्ष,व्यवसाय कल्याण समिती मराठवाडा अध्यक्ष शिवराज मुथळे,बीड जिल्हा अध्यक्ष गजानन औसेकर,राहुलऔसेकर आदींनी रविवार दि.10 ऑगस्ट रोजी केज येथे धनंजय कुलकर्णी यांचे निवासस्थानी झालेल्या बैठकीत आपले विचार मांडले.लवकरच पुढील बैठकीत रणनीती आखली जाणार आहे अशी माहिती संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा