विजेचा धक्का लागून शेतकरी ठार

 विजेचा धक्का लागून शेतकरी ठार. 





केज


केज तालुक्यातील कोरडेवाडी शिवारातील घाटेवस्ती येथे राहणारे शेतकरी बाबासाहेब रावसाहेब राख,वय 55 वर्षे यांना सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान विजेचा धक्का बसला.जखमी अवस्थेत त्यांना केज येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन त्यांना मयत घोषित केले.

सोमवारी दि.18 आॕगष्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान कोरडेवाडी शिवारातील घाटेवस्ती येथे राहणाऱ्या बाबासाहेब रावसाहेब राख,वय 55 वर्षे यांना सोमवारी दि.18 आॕगष्ट रोजी राहत्या घरी विजेचा धक्का लागून ते जखमी झालेहोते.त्यांना पुढील उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात घेवून गेल्या नंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करुन त्यांना मयत झाल्याचे घोषित केले.बाबासाहेब राख यांच्या पश्च्यात पत्नी, 1 मुलगा असा परिवार असून सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर कोरडेवाडी येथील स्म्शानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा