केंद्राच्या योजनेतून बीड जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी मंजूर,खा.बजरंग सोनवणे यांचे प्रयत्न फळाला.
केंद्राच्या योजनेतून बीड जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी मंजूर,खा.बजरंग सोनवणे यांचे प्रयत्न फळाला.
बीड
पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत सन २०२५-२६ च्या वार्षिक आराखड्या नुसार बीड जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायत इमारती मंजुर करण्यात आलेल्या असून नवीन ग्रामपंचायत इमारत व नागरी सुविधा केंद्र खोली बांधण्यात येणार आहे.
यासाठी खा. बजरंग सोनवणे यांनी पाठपुरावा केला असून आता या पाठपुराव्या मुळे गावांचा चेहरामोहरा बदलणार आहे.केंद्र शासनाने पंचायती राजव्यवस्थे च्या बळकटी करणा साठी राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान या योजनेचे पुनर्गठण करुन राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही योजना सन २०१८ -१९ ते सन २०२१-२२ या कालावधीत राबविली आहे.सदर योजनेचा मुळ ढाचा न बदलता सन २०२२-२३ पासून पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ही योजना ग्रामविकास विभागाच्या निर्णयान्वये लागू केली आहे.
सदर योजना केंद्रशासन पुरस्कृत असून या योजनेच्या निधीचे प्रमाण हे केंद्र हिस्सा ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के असे आहे. सन २०२५-२६ या वित्तीय वर्षाकरिता पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान योजनेसाठी वार्षिक कृती आराखड्यास केंद्र शासनाने मंजूरी दिलेली आहे.ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज सुलभ होण्यासाठी संसदीय समितीच्या सूचनांनुसार ग्राम पंचायतींना पायाभूत सुविधा घटकांतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत आणि त्यासोबत नागरीसुविधा केंद्र खोली मंजूर करण्यासाठी पंचायती राज मंत्रालय,भारत सरकार यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार बीड जिल्ह्यातील २८ ग्राम पंचायतींकरीता नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम व नागरी सुविधा केंद्र खोली बांधकामास मंजूर करण्यात आले आहे.यात केज तालुक्याला झुकते माप दिले असून २८ पैकी ४ इमारती या केज तालुक्यातील आहेत.
केंद्राकडे पाठविले प्रस्ताव
उद्दिष्टाच्या अधीन राहून ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ३०००पेक्षा अधिक आहे आणि त्यांना स्वमालकीची ग्रामपंचायत इमारत नाही,अथवा धोकादायक व मोडकळीस आलेली आहे,अशा ग्रामपंचायतीं चे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केंद्र शासनाने सन २०२४ -२५ या आर्थिक वर्षात दिल्या होत्या.
या ग्रामपंचायतींचा समावेश धोंडराई, नित्रूड,आडस, टाकरवण,जातेगाव, होळ,जिरेवाडी, बनसारोळा,बंगाली पिंपळगाव,मानूर, मोरेवाडी,तेलगाव, कोळगाव,जाटनांदूर, जवळगाव,सायगाव, सौताडा,मोगरा,आष्टा ह.ना.,पाली,यूसफ वडगाव,चनई,केसापुरी, दादेगाव,पुस,गढी, पिंपळनेर,तिंतरवणी आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा