*मायबाप सरकार " युवा प्रशिक्षणार्थीना" कायमस्वरूपी हक्काची भाकरी द्या :- दत्तात्रय मुजमुले* *सांगली येथील बेमुदत आमरण उपोषण म्हणजे उद्रेकाची सुरूवातच*

 *मायबाप सरकार " युवा प्रशिक्षणार्थीना" कायमस्वरूपी हक्काची भाकरी द्या :- दत्तात्रय मुजमुले*

*सांगली येथील बेमुदत आमरण उपोषण म्हणजे उद्रेकाची सुरूवातच*













केज 


महाराष्ट्रातील महायुती सरकारने राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून योजना काढली. त्यात अनेक तरुणांना अल्प रोजगार मिळाला.मात्र सरकारने त्यापुढे फक्त पाच महिन्याचा कालावधी वाढवत सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींचे भविष्य अंधारात ढकलले आहे.

      सरकारने राज्यातील अंदाजे 1 लाख ३४ हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीना वाऱ्यावर सोडत आहेत.बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.पुढे पाच महिने वाढीव देण्यात आले असून भविष्यात मात्र कालावधी वाढवणार नसल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्या खात्याचे मंत्री हे युवा प्रशिक्षणार्थीच्या भावनेशी खेळत आहेत. प्रशिक्षणार्थीना हे सरकार फसवत आहेत. युवा प्रशिक्षणार्थीना हक्काची कायमस्वरूपी भाकरी मिळवून देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील  कृष्णामाईच्या घाटावर महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे तुकाराम बाबा महाराज हे पाच दिवस आमरण उपोषणाला बसले होते.ही युवा प्रशिक्षणार्थीनच्या उद्रेकाची सुरूवात आहे.

     तरी सरकारने  राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांच्या मागण्या गांभीर्याने घेऊन राज्यातील युवा प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी हक्काची भाकरी द्यावी अशी मागणी युवा प्रशिक्षणार्थी तथा पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा