मल्टीस्टेट मध्ये बुडालेल्या खातेदारांच्या आशा पल्लवीत, खा.सौ.रजनीताई पाटील यांचे मानले आभार

मल्टीस्टेट मध्ये बुडालेल्या खातेदारांच्या आशा पल्लवीत, खा.सौ.रजनीताई पाटील यांचे मानले आभार.



केज


दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मल्टीस्टेट बँकाच्या घोटाळ्यां विषयीच्या महत्वपूर्ण बैठकीत सहभागी होऊन खा.सौ.रजनीताई पाटील यांनी मल्टीस्टेट बँकाच्या गैरकारभाराने आर्थिक नुकसान झालेल्या व जीवन संपवलेल्या खातेदार, ठेवीदारांच्या मदतीसाठी परखडपणे भूमिका मांडली.

याविषयी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षते खाली एक समिती तयार करण्यात आली जलद गतीने चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करून बाधीत खातेदारांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन बैठकीचे अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा आणि चौकशी समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खा.सौ. रजनीताई पाटील यांना दिल्यामुळे ठेवीदार व खातेदार यांच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यांनी खा.सौ.रजनीताई पाटील यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा