सत्यशोधक साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त बिसेफच्या माध्यमातून परिसंवाद व राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न
सत्यशोधक साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त बिसेफच्या माध्यमातून परिसंवाद व राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न.
केज
सत्यशोधक साहित्य सम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती केज येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भारतीय धम्म महासंघाच्या वतीने सर्व प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास आलेल्या सर्वच मान्यवरांचे स्वागत शाल हार व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.बौद्ध धम्माच्या नियमानुसार कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीदिलेल्या २२ प्रतिज्ञाचे यावेळी वाचन करण्यात आले तसेच भारतीय संविधानाच्याउद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर मंगल मैत्री गीत झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंगलम सर यांनी भूषविले.एच. पी.कांबळे यांनी प्रमुख मार्गदर्शकाची भूमिका निभावली त्याचप्रमाणे दीपक साठे,दत्ताजी मान,एस.एम जोगदंड, कोळंबीकर सर व प्रा. रामराव वाघमारे यांनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी मनोगत व्यक्त करताना श्रमिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण वाघमारे यांनी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन कशा पद्धतीने होत आहे याविषयी मार्गदर्शन केले.त्याच प्रमाणे इतर सर्वच मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.शेवटी शरण्यागत घेउन कार्यक्रमातील सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले.सदरील कार्यक्रमाचेसूत्रसंचालन अनिल वैरागे यांनी केले यावेळी कार्यक्रमाला ॲड.दीपक साठे लातूर, प्रा.रामराव वागमारे नांदेड,एस.एम जोगदंड, प्रा.जी.एल सूर्यवंशी, बाळासाहेब जाधव बीड,दत्ताजी माने लातूर,भारत सूर्यवंशी, पी.बी कोलंबीकर, समर्थ रोडे,भगवान पाथरीकर,लक्ष्मण वाघमारे,ॲड.चंद्रवधन जाधव,धर्मराजमुजमुले, भिवाजी जोगदंड, बाबुराव गालफाडे, सुनील वैरागे,अनिल जाधव,संजय कांबळे, सतीश कापसे,सुरेश कांबळे यांच्यासह समाज बांधव बौध्द उपासक मोठया संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा