न्यू इंटेल कॉम्प्युटर,केज संस्थेला एम के सी एल चा मानाचा पुरस्कार
न्यू इंटेल कॉम्प्युटर,केज संस्थेला एम के सी एल चा मानाचा पुरस्कार
केज
न्यू इंटेल कॉम्प्युटर केज ही एम एस सी आय टी MSCIT ची केज तालुक्यातील सर्वात जुनी आणि दर्जेदार संस्था असून,2025 या शैक्षणिक वर्षात MSCIT आणि 'क्लिक' या दोन्ही कोर्समध्ये मिळून संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक प्रवेश संख्या नोंदवल्याबद्दल या संस्थेला MKCL (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) तर्फे गौरवण्यात आले.
ही गौरवपर पारितोषिक MKCLच्या विभागीय बैठकीत संस्थेचे प्राचार्य श्री.गणेश सत्वधर यांनी स्वीकारले.हेपारितोषिक MKCLव्यवस्थापकीय संचालक श्री.समीर पांडे सर आणि श्री. बालकिशन बलदवा सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
न्यू इंटेल कॉम्प्युटर ही संस्था गेल्या 25 वर्षां पासून गुणवत्तापूर्ण संगणक शिक्षण देण्यासाठी ओळखली जाते.या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवले असून, केज व परिसरात संगणक शिक्षण क्षेत्रात एक विश्वासार्ह नाव निर्माण केले आहे.या यशाबद्दल मित्रमंडळी व विद्यार्थी यांच्या कडुन संचालक गणेश सत्वधर व सत्वधर परिवाराचे योगदानाबद्दल स्वागत केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा