श्री.अजित पवार मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड यांच्याकडून बीड जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा बैठक संपन्न.
श्री.अजित पवार मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड यांच्याकडून बीड जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा बैठक संपन्न.
बीड
राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील विविध महत्वाच्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री क्षेत्र परळी वैजनाथ मंदिर विकास आराखडा, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा ग्रंथालय, सहकार भवन, तसेच विविध प्रशासकीय इमारतींच्या उभारणीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
बैठकीला आमदार सतीश चव्हाण, धनंजय मुंडे, विक्रम काळे, नमिता मुदंडा, संदीप क्षीरसागर, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रमुख मुद्दे:
प्रशासकीय संकुल: महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्य शासकीय इमारती एकाच परिसरात सुसज्ज व आधुनिक स्वरूपात उभारण्याचे निर्देश.
इमारतींच्या आराखड्यात नैसर्गिक प्रकाश, व्हेंटिलेशन व सौरऊर्जा प्रणालीचा समावेश अनिवार्य.
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय: जुन्या इमारतींच्या जागी नवीन अद्ययावत रुग्णालय उभारणीसाठी आराखडा तयार करण्याचे आदेश.
परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र: सुधारित 351 कोटींचा विकास आराखडा अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे सादर. मंदिर परिसराचे पुरातन स्वरूप राखून विकास करणार.
रेल्वे: बीड - अहिल्यानगर रेल्वेमार्ग पूर्ण; मराठवाडा मुक्ती दिनापासून रेल्वे सेवा सुरू करण्याचा मानस.
लमान तांडा (अंबेजोगाई): नविन कारागृहासाठी जागा व निधीची तरतूद.
कंकालेश्वर देवस्थान: 12 एकर जागेसाठी संरक्षण भिंतीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश इत्यादी विविध विकास कामांची आढावा बैठक संपन्न झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा