माऊलींच्या सुवर्ण कलशारोहणासाठी राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडून 1लाख 11हजार देणगी.
माऊलींच्या सुवर्ण कलशारोहणासाठी राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडून 1लाख 11हजार देणगी.
केज
दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे राहुल ज्ञानेश्वर चव्हाण असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही," इवलेसे रोप लाविलेये द्वारी, त्याचा वेणू चालला गगनावरी " दहा वर्षांपासून राहुल ज्ञानेश्वर चव्हाण हे समाजातील विविध क्षेत्रात दातृत्वाचे काम करताना दिसत आहेत. आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५०व्या जयंती महोत्सवाच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या शिखरावर ११ किलो सुवर्णाचे कलशारोहण करण्याचा संकल्प सोडला आहे. हा महोत्सव गोकुळअष्टमी, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होणार आहे. या मंगल कार्यासाठी सर्व भाविक, भक्त आणि वारकऱ्यांना स्वेच्छेने आर्थिक देणगी किंवा वस्तुरूपी सुवर्ण दान देण्याचे आवाहन संस्थान कमिटीने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत आळंदी शिवसेना शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी उदार अंतःकरणाने देणगी अर्पण केली आहे.
राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी आपले आजोबा कै. भिकू मारुती चव्हाण आणि आजी कै.शांताबाई भिकू चव्हाण यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सुवर्ण कलशारोहण कार्यासाठी १,११,१११ रुपये इतकी देणगी माऊलींच्या चरणी अर्पण केली आहे. या दानशूर योगदानाबद्दल श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने राहुल चव्हाण यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा