पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती निमित्त राज्यभर उत्सव साजरा करण्याचे निर्देश.

इमेज
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती निमित्त राज्यभर उत्सव साजरा करण्याचे निर्देश. मुंबई संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५हे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ७५०वी जयंती वर्ष असून,येत्या गोकुळ अष्टमी दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांची ७५० वी जयंती साजरी होणार आहे.या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगर परिषदा यांनी संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमा किंवा मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढून सार्वजनिक रीतीने हा महोत्सव साजरा करावा,असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरीस्थानिक स्वराज्य संस्थांनी या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि उत्सवाच्या आयोजनात आवश्यक ती दक्षता घ्यावी,असेही शासनाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.शासनाने या संदर्भातील अधिकृत परिपत्रक दि.३० जुलै २०२५ रोजी जाहीर केले असून,नगरविकास विभागाचे अपर सचिव अनिलकुमार आर....

आनंदगाव येथील रहिवासी गणेश गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

इमेज
आनंदगाव येथील रहिवासी गणेश गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन  केज केज तालुक्यातील आनंदगाव येथील रहिवाशी गणेश संभाजी गायकवाड वय ५८ वर्ष यांचे हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने बुधवार  सायंकाळी हैद्राबाद येथे दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आनंदगाव येथील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,चार भाऊ,जावई असा मोठा परिवार आहे.बप्पा म्हणून ते सर्वपरिचित होते.ते माजी सरपंच ज्ञानेश्वर गायकवाड,बाबासाहेब गायकवाड यांचे बंधू होत त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरावर शोककळा पसरली आहे.

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी जिया भाई शेख यांची निवड. सच्चा कार्यकर्त्याच्या कार्याची मिळाली पावती.

इमेज
भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी जिया भाई शेख यांची निवड. सच्चा कार्यकर्त्याच्या कार्याची मिळाली पावती. बीड    सन २००८ सालापासून दिवंगत गोपीनाथराव मुंडे साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिया भाई शेख यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे याबद्दल जिया शेख यांचे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहे. जिया भाई शेख हे मुंडे साहेबांच्या हयातीत आणि त्यांच्या मृत्यू पश्चात सुद्धा मुंडे भगिनी आणि भाजप सोबत एकनिष्ठतेने कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची व एकनिष्ठतेची दखल घेत राज्याच्या पर्यावरण मंत्री मा.नामदार पंकजाताई मुंडे, माजी खासदार प्रितमताई मुंडे, केज मतदार संघाच्या दबंग आमदार नमिताताई व अक्षयजी मुंदडा आणि केज मतदार संघाचे किंग मेकर म्हणून जिल्हाभर प्रसिद्ध असलेले नंदकिशोर (काकाजी) मुंदडा व युवकांचे हृदयसम्राट युवा नेते पनगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अक्षयजी नंदकिशोर मुंदडा, भाजप  जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख, तालुकाध्यक्ष राणा  दादा डोईफोडे यां...

विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल,केज या शाळेस CBSE बोर्डाची मान्यता प्राप्त

इमेज
विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल,केज या शाळेस CBSE बोर्डाची मान्यता प्राप्त. केज   विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल केज या शैक्षणिक संस्थेस केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) दिल्ली यांची मान्यता प्राप्त झाली असून संस्थेने केलेल्या महत्वपूर्ण वाटचालीस यश मिळाले आहे . केज शहरापासून जवळच असलेल्या विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूलची CBSE निरीक्षण समितीमार्फत दिनांक २३ जुलै २०२५ रोजी तपासणी करण्यात आली.या समितीमध्ये पुणे येथिल सिंहगड स्कूलच्या प्राचार्या श्रीमती स्मिता सावंत,आणि पुणे येथिल भारती विद्यापीठाच्या प्राचार्या श्रीमती भावना राय यांचा समावेश होता.तपासणी दरम्यान समितीच्या सदस्यांनी ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक सुविधांचे कौतुक केले. शाळेतील पायाभूत सुविधा,शिस्तबद्ध व्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेले प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण पाहून समिति कडून समाधान व्यक्त केले. या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे,विजयकांत भैया मुंडे,अतुल दादा मुंडे, प्राचार्या माधुरीताई मुंडे,शाळेच्या प्राचार्या श...

आदित्य पाटील यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड.

इमेज
आदित्य पाटील यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड. केज  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश समितीच्या सरचिटणीस पदावर आदित्य पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ही निवड पक्षाच्या भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल असून तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या काँग्रेस पक्षाच्या धोरणाची ही ठळक निशाणी आहे.  आदित्य पाटील यांची राजकीय कारकीर्द : आदित्य पाटील हे अत्यंत अभ्यासू, दूरदृष्टी असलेले आणि समाजाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात. स्थानिक स्तरावरून सुरू झालेला हा प्रवास आता राज्यस्तरावर पोहोचलेला आहे. त्यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस, आणि जिल्हा कार्यकारिणीमध्ये विशेष कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांचे हक्क, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर त्यांचा ठाम आणि स्पष्टवक्ता दृष्टिकोन पक्षासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरलेला आहे. चौकट .....  काँग्रेस पक्षाची विश्वासू निवड : महाराष्ट्रातील राजकारणात सध्या अस्थिरतेचे वारे आहेत. अशा परिस्थितीत आदित्य पाटील यांच्यासारख्या तरुण, ऊर्जावान आणि ध्येयवेड्या...

*सिद्धार्थ भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे दिग्गजांची मांदियाळी: राजकीय, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंतांची उपस्थिती!*

इमेज
  *सिद्धार्थ भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे दिग्गजांची मांदियाळी: राजकीय, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंतांची उपस्थिती!* पुणे:  संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स (SBGI), मिरज चे कार्यकारी संचालक, 'दैनिक महानगरी' आणि 'दैनिक जनप्रवास' यांसारख्या प्रतिष्ठित दैनिकांचे ते मालक, मिरज-सांगली येथील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रमुख, उद्योगपती तसेच सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. सिद्धार्थ भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य आणि विशेष कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या सोहळ्याला उपस्थित मान्यवरांच्या मांदियाळीने कार्यक्रमाची शोभा वाढवली, तसेच सिद्धार्थ भोकरे यांच्या जनसंपर्काची आणि विविध क्षेत्रांतील त्यांच्या मैत्रीची प्रचिती दिली. मान्यवरांची लक्षवेधी उपस्थिती: यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विशेष उपस्थिती लावत सिद्धार्थ भोकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबतच भाजपचे...

कीर्तन महोत्सव बीड येथे व्याकरणाचार्य ज्ञानेश भक्त ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचा ६१ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

इमेज
कीर्तन महोत्सव बीड येथे व्याकरणाचार्य ज्ञानेश भक्त ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचा ६१ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन. बीड कीर्तन महोत्सव बीड येथे व्याकरणाचार्य ज्ञानेश भक्त ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचा ६१ वा अभिष्टचिंतन सोहळा संत भगवान बाबा वारकरी वारकरी संस्था होळ व स्व. झुंबरलाल  जी खटोड सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१ऑगस्ट ते ३ आॕगष्ट दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की,बीड येथे दि.१ ऑगस्ट ते ३ आॕगष्ट या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,बीड येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात महाराष्ट्रा तील ख्यातनाम सात सांप्रदायिक कीर्तनकार आपली कीर्तन सेवा देणार आहेत.या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे,श्रावण मास सणांचा प्रत्यक्ष उत्सव आणि अध्यात्मिक अनुभव प्रेक्षकांना लाभणार आहे.हा कीर्तन महोत्सव संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या साडे सातशेव्या जन्मजयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आले असून, गेली २५ वर्षे खटोड प्रतिष्ठान कीर्तन आणि संत विचारांचे बीज समाजात पेरण्याचे...

समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर पुरोहित कल्याण समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी अनंत देवा कोकीळ यांची निवड.

इमेज
समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर पुरोहित कल्याण समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी अनंत देवा कोकीळ यांची निवड. केज समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने वेळोवेळी केलेले आंदोलने व सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती संघटनात्मक बांधणी करत असून संस्थापक अध्यक्ष श्री.धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक 29 जुलै रोजी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली तसेच समस्त समाज संघर्ष समिती अंतर्गत ब्राह्मण समाज पुरोहित कल्याण समितीच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी वेद शास्त्र संपन्न श्री.अनंत देवा संजीवनराव कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली तसे नियुक्ती पत्र ब्राह्मण समाज पुरोहित कल्याण समिती चे प्रदेशाध्यक्ष श्रीनिवास केजकर यांनी दिले.  समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडे वेळोवेळी निवेदने,वेगवेगळे आंदोलने करण्यात आली याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सोबत तीन वेळा बैठका झाल्...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी बप्पासाहेब घुगे यांची फेरनिवड.

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी बप्पासाहेब घुगे यांची फेरनिवड. बीड  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी मा. बप्पासाहेब घुगे यांची फेर निवड करण्यात आली आहे. ही निवड त्यांचे काम व  पक्ष करिता तळमळ धडपड पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एकनिष्ठता तसेच आचरण व विचाराद्वारे समाजात पक्षाच्या पद प्रतिष्ठेची जपवणूक व जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम अग्रेसर असतात याचीच एक दखल घेऊन बाबासाहेब घुगे यांची बीड जिल्हा सरचिटणीस पदी फेर निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे यांच्या आदेशाने माजी कृषी मंत्री आ. धनंजयजी मुंडे, बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवा नेते योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत बाप्पासाहेब घुगे यांची बीड जिल्हा सरचिटणीस पदी फेर निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे बप्पासाहेब घुगे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा-केज यांच्या वतीने नव निर्वाचित पत्रकार पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.

इमेज
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा-केज यांच्या वतीने नव निर्वाचित पत्रकार पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न. केज  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा-केज यांच्या वतीने नव निर्वाचित पत्रकार पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ शासकीय विश्रामगृह,केज येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात प्रकाशपर्व न्यूज पोर्टल बीड जिल्हा संपादक पदी लिंबराज शंकरराव गायकवाड,दैनिक वादळ वार्ता बीडजिल्हा संपादक पदी कपिल अंबादास मस्के आणि पुरोगामी पत्रकार संघ बीड जिल्हाध्यक्ष पदी रणजित तात्याराम घाडगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास केज तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, शाखा केजचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे होते.त्यांच्या सोबत तालुकाउपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, पांडुरंग कसबे,नंदूलाल मिसाळ,पुरोगामी पत्रकार संघ केज तालुकाध्यक्ष दिनकर जाधव,सक्रिय पत्रकार संघ केज तालुकाध्यक्ष संतोष गालफाडे, सह्याद्री पत्रकार संघ केज तालुकाध्यक्ष अनिल ठोंबरे आ...

*समाजाचा द्वेष झाला म्हणून आम्ही मात्र कुणाचाही द्वेष करणार नाही - धनंजय मुंडे*

इमेज
*समाजाचा द्वेष झाला म्हणून आम्ही मात्र कुणाचाही द्वेष करणार नाही - धनंजय मुंडे* *संघर्ष आपल्या रक्तात; तो शेवटपर्यंत करणार* *अस्मिता आणि गुणवत्तेवर आक्षेप घेणाऱ्यांनो, आता बास! - मुंडेंचा इशारा* *वंजारी समाजाच्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांचे जोरदार भाषण* *ज्या दिवशी जात आड करून राजकारण करण्याची पाळी येईल, त्यादिवशी राजकारण सोडून देऊ - धनंजय मुंडे यांचे सर्वसमावेशक व सहिष्णू वागणुकीचे आवाहन* *अनेक मान्यवरांचा विशेष गौरव* *एकोप्याने राहून एकमेकांना सहाय्य करू - पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने* ठाणे     मी राजकारणात आणि सामाजिक जीवनात सक्रिय झाल्यापासून आजपर्यंत माझ्यावर अनेक संकटे, अनेक संघर्ष आले, त्यांना मी सामोरे गेलो. मात्र यावेळी सलग २०० दिवस माझी मीडिया ट्रायल चालवली गेली. मी, माझे आई - वडील, माझी मुले - बाळे, माझी जात, माझा जिल्हा, माझी माती या सगळ्यांची बदनामी केली गेली. त्या सर्व बदनामीला मी संयमाने तोंड दिले. जात म्हणून अनेकांनी सातत्याने द्वेष भावनेने टीका टिप्पणी, आरोप केले. कुणी व्यक्ती दोषी असेल तर त्याला जरूर फाशी द्या, चुकीचे समर्थन कुणीच करणार नाही; समाज म्हणून तरीह...

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हेवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

इमेज
पंकजाताई  मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त  कोल्हेवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. केज  ग्रामपंचायत कोल्हेवाडी येथे 26 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांचा वाढदिवस एक सामाजिक उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड करून साजरा केला. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या वाक्याप्रमाणे  सजीवांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. वृक्ष ( झाडे) आपणास ऑक्सिजन देतात, ऑक्सीजन ज्याच्याशिवाय आपण काही मिनिटांपेक्षा जास्त जगू शकत नाही. वृक्ष आपल्याला सावली देतात, पशू पक्षी या सावलीत रखरखत्या सूर्यापासून आसरा घेतात. वृक्षांची मुळे जमिनीची धूप थांबवतात. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून असा हा सामाजिक उपक्रम कोल्हेवाडीच्या ग्रामस्थांनी हातात घेतला व कोल्हेवाडी  येथील मुख्य रस्त्याच्या लगत, जिल्हा परिषद शाळा मिसाळ वस्ती, जिल्हा परिषद शाळा कोल्हेवाडी या ठिकाणी वृक्ष लागवड केली.  याप्रसंगी कोल्हेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ सरपंच-उपसरपंच ग्रामपंचायत स...

दहिफळ वडमाऊली येथे पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस विवीध उपक्रमाने साजरा.

इमेज
दहिफळ वडमाऊली येथे पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस विवीध उपक्रमाने साजरा.  केज केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथे महाराष्ट्राची रण रागिणी तथा पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडें यांच्या वाढदिवसा निमित्त आमदार नमिताताई मुंदडा,भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा,अक्षय भैय्या मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राहुल भैय्या गदळे यांनी दहिफळ वडमाऊली येथे सर्व प्रथम वडमाऊली देवीची आरती करून, वृक्षारोपण कार्यक्रम,शालेय विध्यार्थ्यांना शालेय साहित्य, फळे वाटप करून तसेच जिल्हा परिषद शाळेला शालेय साहित्य देऊन मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी जेष्ठ नेते सखाहरी तात्या गदळे,सरपंच डॉ.शशिकांत दहिफळकर, इंजिनियर शरद बप्पा गदळे, जयदत्त दहिफळकर, बाळासाहेब ठोंबरे, संतोष मुंडे,विजय ठोंबरे,बंकट ठोंबरे,अमोल ठोंबरे, धनंजय मोराळे,आण्णा ठोंबरे,बाळू ठोंबरे,सूर्या गदळे,विजय गदळे,विकी गदळे, पिनू ठोंबरे, संदीप ठोंबरे,गणेश ठोंबरे, श्रीनिवास मुंडे,पप्पू ठोंबरे,मच्छिन्द्र ठोंबरे, विनोद गदळे,विनोद मोरे, मल्हारी गदळे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुंडे सर,खोसे सर,अनिल ठोंबरे सर गावातील ...

शिक्षक कॉलनी भागातील नागरिकांनी गणेश उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा घेतला निर्णय

इमेज
शिक्षक कॉलनी भागातील नागरिकांनी गणेश उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा घेतला निर्णय.                                       केज केज शहरातील शिक्षक काॕलनी भागातील नागरिकांनी बैठक घेऊन आगामी गणेश उत्सवात कोणताही धांगडधिंगा न घालता एकदम साध्या पद्धतीने गणेश जयंती उत्सव साजरा करुन एक आदर्श निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.कोणालाही वर्गणी न मागण्याचा निर्णय समस्त शिक्षक कॉलनी भागातील रहिवासी लोकांनी घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. येणारा गणेश उत्सव व इतर सर्वच उत्सव साजरे करताना पारंपरिक व साध्या पद्धतीने,उत्साहात प्रत्येक उत्सव साजरा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.डिजेचा धिंगाणा व इतर गोष्टी यामुळे टाळल्या जातात.गणेश उत्सवात पारंपरिक देवाची गाणी,पुजा तसेच प्रसाद ठेऊन गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे.शिक्षक कॉलनी,बीड रोड केजच्या नागरिकांचे व युवकांचे या कौतुकास्पद निर्णयामुळे सर्वञ कौतुक केले जात आहे.  यामध्ये दत्ता धस पंत, पिटू भैय्या तांदळे, खय्युम शेख,भगवान केदार,सुनील घोळ...

आवादा कंपनी मुळे केज तालुक्यात दुसरा बळी,आवादा कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण ; वृद्ध महिलेचा उपोषणा दरम्यान मृत्यू उपोषणकर्ते यांचा आरोप.

इमेज
आवादा कंपनी मुळे केज तालुक्यात दुसरा बळी,आवादा कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण ; वृद्ध महिलेचा उपोषणा दरम्यान मृत्यू उपोषणकर्ते यांचा आरोप. केज गेल्या वर्षभरापासून सतत वादग्रस्त ठरत चाललेल्या आवादा कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात केज तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.दि. २४ जुलै २०२५ गुरुवार पासून केज येथील तहसील कार्यालया समोर काही शेतकरी उपोषणाला बसले असून,या आंदोलनात एक दुर्दैवी घटना घडली आहे.उपोषण सुरू असताना सुभाबाई गोपाळ भोसले (वय ६०) या वृद्ध महिलेस प्राण गमवावा लागला असा आरोप उपोषणकर्ते यांनी केला आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी की,केज शहराजवळील सर्वे नंबर ७६ या क्षेत्रात आवादा कंपनीच्या वीज प्रकल्पाचे काम सुरू आहे.परंतु कंपनीकडून मूळ सर्वेक्षणाच्या मार्गाचा अवलंब न करता,गावगुंडांच्या मदतीने बेकायदेशीर रित्या विद्युत पोल शेतांमध्ये रोवण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध केला असता,त्यांना धमक्या दिल्या जात असून,अनेक शेतकरी भयभीत झाले आहेत.७६ या सर्वे क्रमांकात शेतकऱ्यांची पत्र्याचीघरे व वस्ती आहे.विद्युत प...

माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा.

इमेज
माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा. केज   राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडेंना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर याचिका करता तुषार पडगिलवार याला एक लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कृषी साहित्य खरेदी बाबत राज्य शासनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने दुजोरा दिला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील कृषी साहित्य खरेदीतील कथित घोटाळ्याचे आरोप खोडून काढले गेले आहेत. त्यांच्या कृषी मंत्रीपदाच्या काळात कृषी साहित्य खरेदी धोरणात बदल केल्याबद्दल आणि त्यामध्ये अनियमितता असल्याचा दावा करत काही याचिका दाखल करण्यात आली होती. यात डीबीटी  योजना बंद करून विभागाने स्वतः कृषी साहित्य खरेदी केल्याने अधिक खर्च झाल्याचा आरोप होता. काही कृषी पंपांची खरेदी बाजारातील दरापेक्षा जास्त किमतीत झाल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला होता. या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा होती, परंतु आता मुंबई ...

खा.बजरंग सोनवणे यांच्याकडून महामार्ग, रेल्वेमार्गासाठी सतत पाठपुरावा ; केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवून मांडले प्रश्न, रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्या कडून मागण्या संदर्भात सकारात्मकता

इमेज
खा.बजरंग सोनवणे यांच्याकडून महामार्ग, रेल्वेमार्गासाठी सतत पाठपुरावा ; केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवून मांडले प्रश्न, रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्या कडून मागण्या संदर्भात सकारात्मकता केज बीडजिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पुर्ण करावेत, महामार्ग कामे करीत असताना जिथे-जिथे तांत्रिक दोष झालेले आहेत ते दुरुस्त करावेत भेगा पडलेल्या महामार्गांची दुरूस्ती करावी,अशा विविध मागण्यांसाठी खा. बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी सततचा पाठ पुरावा पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठ थोपटली.तर जिल्ह्यातील रेल्वेच्या संदर्भात केंद्रीयरेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेवून रेल्वे संदर्भा तील विषयावर चर्चा केली.यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेसंदर्भाने मांडलेल्या सर्व मागण्यांबाबत सकारात्कता दर्शवली. दि.२४ जुलै रोजी खा. बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली.यावेळी शेगाव- पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग मधील परतूर- माजलगाव बिट...

महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन व पशु संवर्धन विभाग यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशाळांना नोंदणी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न.

इमेज
महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन व पशु संवर्धन विभाग यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशाळांना नोंदणी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न. बीड   महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन व पशु संवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी पशुसंवर्धनआयुक्त कार्यालय बीड येथे बीड जिल्ह्यातील एकूण ५३ नोंदणीकृत गो शाळांचे नोंदणी प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम  महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे शासकीय सदस्य श्री.उद्धवजी नेरकर व डॉ.दिलीप मोरे यांच्या हस्ते सदर प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने बीड जिल्ह्यातील गोशाळांना नोंदणी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन बीड शहरातील सुभाष रोड वरील पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी श्री.उध्दवजी नेरकर,सदस्य,महाराष्ट्र गोसेवा आयोग,महाराष्ट्र राज्य डॉ.आर डी कदम, जिल्हा पशु संवर्धन उपायुक्तबीड,डॉ.दिलीप मोरे,सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन बीड, श्री.बाजीराव ढाकणे, बीड जिल्हा समन्वयक, महाएनजिओ फेडरेशन, महाराष्ट्र राज्य,...

केज पंचायत समिती मध्ये लोकमान्य टिळक जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

इमेज
केज पंचायत समिती मध्ये लोकमान्य टिळक  जयंती मोठ्या उत्साहात साजरी. केज   केज पंचायत समिती मध्ये  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन धुप दिप गुलाल लावुन अभिवांदन करण्यात आले.  यावेळी उपस्थित गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे मॅडम सहाय्यक गटविकास अधिकारी श्री राठोड साहेब ढोकर साहेब, विस्तार अधिकारी श्री चौरे साहेब रोडेवार साहेब मुळे साहेब मासूमदार साहेब राऊत मॅडम केदार मॅडम पवार मॅडम बनकर मॅडम रासवे साहेब,येनकुळे साहेब सरवदे साहेब,शेख साहेब इत्यादी सर्व कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी रंजीत घाडगे यांची निवड.

इमेज
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी रंजीत घाडगे यांची निवड. केज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अडागळे , व राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ  यांच्या आदेशानुसार रंजीत घाडगे यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या "बीड जिल्हाध्यक्ष"  या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण पुरोगामी पत्रकार संघात करत असलेले काम व संघटन कौशल्य तसेच पत्रकारा विषयी आपली असलेली तळमळ पाहता, आपल्या कामाची दखल घेऊनच आम्ही आपणास पुरोगामी पत्रकार संघामध्ये  मोठी जबाबदारी देत आहोत. या निवडी बद्दल बीड जिल्ह्यातील पुरोगामी पत्रकार संघाला मिळाले आहे. या निवडीबद्दल पुरोगामी पत्रकार संघातून तसेच इतर सर्व क्षेत्रातून रंजीत घाडगे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

लिंबराज गायकवाड यांची 'प्रकाशपर्व न्युज'च्या कार्यकारी संपादकपदी नियुक्ती.

इमेज
लिंबराज गायकवाड यांची 'प्रकाशपर्व न्युज'च्या कार्यकारी संपादकपदी नियुक्ती. वंचित बहुजन समाजाचा ठाम आवाज आता अधिक ताकदवान होणार. केज 'आवाज वंचित बहुजन समाजाचा' या ब्रीदवाक्याने समाजातील दबलेल्या, उपेक्षित घटकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या प्रकाशपर्व न्युज या माध्यम संस्थेच्या कार्यकारी संपादकपदी लिंबराज शंकरराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक भान, स्पष्ट भूमिका, आणि पत्रकारितेतील सक्रिय सहभाग यामुळे लिंबराज शंकरराव गायकवाड यांची ही निवड प्रकाशपर्व न्युजसाठी निर्णायक ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशपर्व न्युज नक्कीच नवीन उंची गाठेल, असा विश्वास संस्थेच्या संपादकीय व व्यवस्थापन विभागाने व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल प्रकाशपर्व न्युज परिवारातर्फे मा. लिंबराज गायकवाड साहेबांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. नवीन जबाबदारी स्वीकारताना लिंबराज गायकवाड यांनी समाजातील वंचित घटकांचा आवाज बुलंद करण्याची आणि लोकशाही मूल्यांशी निष्ठा ठेवत निडर पत्रकारिता करण्याची ग्वाही दिली.

केजमध्ये आवादा कंपनीचा मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.

इमेज
केजमध्ये आवादा कंपनीचा मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण. केज   गेल्या वर्षभरापासून वादग्रस्त ठरलेल्या आवादा कंपनी च्या मनमानी कारभाराविरोधात केज येथील शेतकरी दि.24/7/2025 गुरुवार रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, केज परिसरात सर्वे नंबर 176 मधील शेतकऱ्यांना आवादा कंपनीचे कर्मचारी पूर्वी झालेल्या सर्व प्रमाणे काम न करता गावंगुंडांना हाताशी धरून बेकायदेशीररित्या शेतामध्ये विद्युत पोल रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर शेतकऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. या प्रकाराने शेतकरी भयभीत झाले आहेत.  सर्वे नंबर 176 मध्ये शेतकऱ्यांची राहते पत्र्यांची घरे आहेत, येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे, सदर विद्युत पोल रोवले तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल व उपासमारीची वेळ येईल, कंपनीच्या विरोधात प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही असे उपोषकर्त्यांचे म्हणणे आहे, कंपनी चा मनमानी कारभार थांबवावा व मूळ सर्वेक्षण झालेल्या मार्गाने विद्युत जोडावेत. शेतकऱ्यांना केली जाणारी दमदाटी व होणारा अन्याय थांबवावा.  या म...

जिल्हा परिषद शाळेच्या लव्हुरी केंद्राची शैक्षणिक शिक्षण परिषद येवता येथे उत्साहात संपन्न

इमेज
जिल्हा परिषद शाळेच्या लव्हुरी केंद्राची शैक्षणिक शिक्षण परिषद येवता येथे उत्साहात संपन्न.   केज दि.२३/७/२०२५ रोजी केज तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या लव्हूरी केंद्राची शैक्षणिक शिक्षण परिषद येवता येथे दुपारच्या सत्रात १२-३० ते ४-३० या वेळेत आयोजित करण्यात आली प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यमान जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा मा.गट शिक्षणाधिकारी सुनीलराव केंद्रे होते.  यावेळी त्यांनी बैठकीत सविस्तर मार्गदर्शन केले शाळा व्यवस्थापन समिती रचना व कार्य, बालविवाह रोखणे, प्रतिबंधक व प्रतिज्ञा, पेट परीक्षा,अध्ययन निष्पत्ती इत्यादी विषया वर सविस्तर असे मार्गदर्शन केले.सुलभक म्हणून श्रीराम चाटे, चैतन्य तांबेकर,विक्रम डोईफोडे यांनी काम पाहिले.  कार्यक्रमास लव्हूरीकेंद्राचे केंद्रप्रमुख राधाकृष्ण कांबळे, राजाभाऊ कदम,अंकुश मोराळे,दादाराव गीते, गोकुळ सारूक, नामदेव चौरे,संजय चाळक, गजेंद्र जाधव,हनुमंत कटारे इत्यादी मुख्याधापक व सह शिक्षक आणि ट्रेनी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुकळी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर संपन्न.

इमेज
सुकळी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर संपन्न. केज  केज तालुक्यातील युसुफ वडगाव सर्कलमधील कळब अंबाजोगाई रोडवरील सुकळी येथील निसर्ग राजा मंगल कार्यालय येथे  दिनांक २३-७-२०२५ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये महसूल विभाग, पुरवठा विभाग, कृषी विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅग, पीएम किसान, रेशन कार्ड नाव कमी करणे, नाव वाढविणे चे कामकाज करण्यात आले.उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र काढण्यात आले संजय गांधी योजना डीबीटी चे कामकाज करण्यात आले.  यावेळी कार्यक्रमास उपस्थित विकास हजारे मंडळाधिकारी युसुफ वडगाव, खतीब साहेब ग्राम महसूल अधिकारी युसुफ वडगाव, वाघमारे मॅडम,नागेले मॅडम, केंद्रे मॅडम, पूजा मॅडम, सूर्यवंशी मॅडम, कवडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. विकास हजारे मंडळ अधिकारी यू वडगाव यांनी जनता दरबार घेऊन उपस्थित शेतकरी यांचे अर्ज निवेदने स्वीकारली शेतकरी यांना मार्गदर्शन केले सर्व उपस्थित शेतकरी विद्यार्थी, महिला आणि कर्मचारी  याचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगत...

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा केज तालुकाध्यक्षपदी प्राचार्य राहुल भैय्या गदळे यांची निवड.

इमेज
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा केज तालुकाध्यक्षपदी प्राचार्य राहुल भैय्या गदळे यांची निवड. केज   भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा केज तालुकाध्यक्षपदी प्राचार्य राहुल भैय्या गदळे यांची निवड करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य लोकनेत्या नामदार पंकजाताई मुंडे माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे,केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिताताई अक्षयजी मुंदडा व केज विधानसभा मतदार संघाचे किंगमेकर नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा तसेच युवकांचे ह्रदयसम्राट युवानेते पनगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अक्षयजी नंदकिशोर मुंदडा तालुका अध्यक्ष संदीप पाटील यांच्या आदेशाने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी प्राचार्य राहुल भैय्या गदळे यांची निवड करण्यात आली आहे.  त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात असुन त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.प्राचार्य राहुल भैय्या गदळे यांच्या निवडीमुळे युवकांचे संघटन मोठ्या प्रमाणात  होणार असून भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.

जवळबन येथे ग्रामविकास समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

इमेज
जवळबन येथे ग्रामविकास समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.  केज   तालुक्यातील जवळबन येथील ग्रामविकास समिती संस्थेतर्फे गावातील  ६६ गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उपयोगी साहित्य देऊन गुणगौरव करण्यात आला. गावातील ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनियर तसेच शासकीय सेवांमध्ये नियुक्ती झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  गावातील काही विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत. त्यापैकी इटली येथे पीएच डी प्राप्त डॉ.सुधीर भाकरे तसेच फिजिओथेरपी पदवी प्राप्त डॉक्टर कुलकर्णी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच पती  प्रमोद करपे, प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले,  प्रा.बळवंते, जगदीश करपे  संस्थेचे कार्यवाह श्री कुलकर्णी  उपस्थित होते  जि प  शाळेचे  मुख्याध्यापक,  माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक,  सेवा सोसायटीचे चेअरमन नितीन भाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते "मुलांकडून अवाजवी गुणवत्तेची अपेक्षा न ठेवता मुलांना त्याच्या  आवडीनुसार शिक्षण...

स्वामी विवेकानंद विद्या मंदिर[माध्यमिक विभाग] शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न.

इमेज
  स्वामी विवेकानंद विद्या मंदिर[माध्यमिक विभाग] शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न. ८ वी शिष्यवृत्तीधारक, होमी भाभा बाल वैज्ञानिक व एम.टी.एस. ऑलंपियाड राज्य स्तरीय परीक्षेतील मोमेंटो,गोल्ड मेडल व सिल्वर मेडल प्राप्त एकूण ७५ विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केज  जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [माध्यमिक विभाग] या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ वर्षातील विविध स्पर्धा परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जीवन विकास शिक्षणमंडळाचे सचिव जी.बी.गदळे, प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे,तर प्रमुख उपस्थिती म्हणून जीवन विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, ज्येष्ठ शिक्षक अजय देशपांडे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील सहशिक्षक तसेच एम.टी.एस. ऑलंपियाड समन्वयक बी.एम.टिंगरे यांनी केले याप्रसंगी ते म्हणाले की, स्वामी विवेक...

प्रशांत नगर कानडी रोड केज हा मुख्य रस्ताच गुत्तेदाराने टाकला खोदून!

इमेज
प्रशांत नगर कानडी रोड केज हा मुख्य रस्ताच गुत्तेदाराने टाकला खोदून!          केज                                  केज शहरातील प्रशांत नगर कानडी रोडचा वार्ड क्रमांक 4 चा मुख्य रहदारीचा रस्ताच खोदून टाकल्यामुळे या भागातील नागरिकांना रहदारी साठी तसेच वाहन ये-जा करण्या साठी रस्ताच खोदून टाकल्यामुळे गैरसोय होत आहे.गेली पन्नास वर्षे झाले हा रस्ता आहे यावर नगरपंचायत अंतर्गत रस्ते व नाली बांधकाम बऱ्याच वेळा झाले असून याचे रीतसर बिल सुद्धा गुत्तेदारांनी उचललेले आहे.हा प्रशांत नगरचा मुख्य रस्ता आहे व तो जवळ पास पन्नास वर्षे झाले येथील नागरिकांच्या वापरात आहे.  15 फुट रस्ताच खोदून टाकल्या मुळे या भागातील नागरिकांचे रहदारी साठी तसेच वाहन चालवताना अतोनात हाल होत आहेत.मोठी चार चाकी गाडी तर आतबाहेर जाणे शक्यच राहिलेनाही.वकिलवाडी अंतर्गत येणाऱ्या या भागात रमेश आडसकर यांचे निवासस्थानअसून त्यांना मानणारा वर्ग या भागात मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या शब्दावर या भागातील रहिवासी प्रत्येक वेळेस न...

पंतप्रधान आवास योजना सर्वेक्षणासाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ.

इमेज
पंतप्रधान आवास योजना सर्वेक्षणासाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ. केज   मा. संचालक ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांनी आवास प्लस  2024 चे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी दिनांक 31 जुलै 2025 पर्यंतची अंतिम मुदत वाढ दिलेली आहे. या संदर्भात पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. 1) आपल्या जिल्ह्यातील आवाज प्लस सर्वेक्षण 2018 मधील प्रतीक्षा यादीत priority list समाविष्ट न झालेले व सिस्टीम द्वारे अपात्र झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेले सर्व कुटुंबाचे potential eligible household under PMAY-G प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टॉप अंतर्गत नवीन 10 exclusion criteria नुसार दिनांक 31 जुलै 2025 पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करून कोणतेही बेघर कुटुंब या सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.  2) या ग्रामपंचायत मध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अशा सर्व ग्रामपंचायतींना आवास सॉफ्ट प्रणालीवर सर्वेक्षण पूर्ण sarve completed झाल्याचे दिनांक 31 जुलै २०२५ पर्यंत चिन्हांकित marck करावे. 3) जिल्ह्यातील शंभर टक्के स्वयं सर्वेक्षण  Shelf  survey प्रकरणाचे सर्वेक्षकाद्वारे पुष्टीकरण cor...