आदित्य पाटील यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड.
आदित्य पाटील यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड.
केज
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश समितीच्या सरचिटणीस पदावर आदित्य पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ही निवड पक्षाच्या भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल असून तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या काँग्रेस पक्षाच्या धोरणाची ही ठळक निशाणी आहे.
आदित्य पाटील यांची राजकीय कारकीर्द :
आदित्य पाटील हे अत्यंत अभ्यासू, दूरदृष्टी असलेले आणि समाजाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात. स्थानिक स्तरावरून सुरू झालेला हा प्रवास आता राज्यस्तरावर पोहोचलेला आहे.
त्यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस, आणि जिल्हा कार्यकारिणीमध्ये विशेष कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांचे हक्क, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर त्यांचा ठाम आणि स्पष्टवक्ता दृष्टिकोन पक्षासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरलेला आहे.
चौकट .....
काँग्रेस पक्षाची विश्वासू निवड :
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या अस्थिरतेचे वारे आहेत. अशा परिस्थितीत आदित्य पाटील यांच्यासारख्या तरुण, ऊर्जावान आणि ध्येयवेड्या नेत्याला सरचिटणीसपदाची जबाबदारी देणे ही पक्षाच्या नवविचारांची आणि नवसंजीवनीची साक्ष आहे.
भविष्यासाठी दिशा :
सरचिटणीस या पदावर काम करताना पक्ष संघटन बळकट करणे, युवकांना जोडणे, आगामी काळातील निवडणुकांसाठी रणनीती आखणे या मुख्य जबाबदाऱ्या आदित्य पाटील यांच्या खांद्यावर असतील. त्यांचा अनुभव, विचारशैली आणि लोकांशी असलेला थेट संवाद निश्चितच काँग्रेस पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी उपयुक्त ठरेल. निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा