आवादा कंपनी मुळे केज तालुक्यात दुसरा बळी,आवादा कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण ; वृद्ध महिलेचा उपोषणा दरम्यान मृत्यू उपोषणकर्ते यांचा आरोप.

आवादा कंपनी मुळे केज तालुक्यात दुसरा बळी,आवादा कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण ; वृद्ध महिलेचा उपोषणा दरम्यान मृत्यू उपोषणकर्ते यांचा आरोप.


केज


गेल्या वर्षभरापासून सतत वादग्रस्त ठरत चाललेल्या आवादा कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात केज तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.दि. २४ जुलै २०२५ गुरुवार पासून केज येथील तहसील कार्यालया समोर काही शेतकरी उपोषणाला बसले असून,या आंदोलनात एक दुर्दैवी घटना घडली आहे.उपोषण सुरू असताना सुभाबाई गोपाळ भोसले (वय ६०) या वृद्ध महिलेस प्राण गमवावा लागला असा आरोप उपोषणकर्ते यांनी केला आहे. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की,केज शहराजवळील सर्वे नंबर ७६ या क्षेत्रात आवादा कंपनीच्या वीज प्रकल्पाचे काम सुरू आहे.परंतु कंपनीकडून मूळ सर्वेक्षणाच्या मार्गाचा अवलंब न करता,गावगुंडांच्या मदतीने बेकायदेशीर रित्या विद्युत पोल शेतांमध्ये रोवण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध केला असता,त्यांना धमक्या दिल्या जात असून,अनेक शेतकरी भयभीत झाले आहेत.७६ या सर्वे क्रमांकात शेतकऱ्यांची पत्र्याचीघरे व वस्ती आहे.विद्युत पोल रोवल्यास शेतीचे नुकसान होणार असून, अनेक कुटुंबांना उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.तरीही प्रशासनाने अद्याप कंपनीविरोधात कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही,असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.या कारणामुळे काही शेतकरी तहसील कार्यालय केजच्या समोर उपोषणास बसले रेणुका सूर्यकांत तेलंग, संगीता बलभीम तेलंग,सविता संतराम भोसले,स्वाती पांडुरंग भोसले,कमल शिवाजी वनवे,मीरा गोरख थोरात,मेघराज भोसले, सूर्यकांत तेलंग,गोरख थोरात,अशोक भोसले, संतराम भोसले,मारुती भोसले, पांडुरंग भोसले, बलभीम तेलंग आदी शेतकरी महिलांसह सहभागी होते.आणि उपोषण सुरू असताना दि.२५ जुलै दुपारी १-०० वाजण्याच्या सुमारास उपोषणास बसलेल्या सुभाबाई गोपाळ भोसले वय ६० वर्षे यांची तब्बेत अचानक खालावली आणि काही वेळातच त्यांचा मृत्यु झाला असा आरोप उपोषणकर्ते यांनी केला आहे.


या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून,नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.उपोषण कर्त्यांनी आवादा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा