लिंबराज गायकवाड यांची 'प्रकाशपर्व न्युज'च्या कार्यकारी संपादकपदी नियुक्ती.

लिंबराज गायकवाड यांची 'प्रकाशपर्व न्युज'च्या कार्यकारी संपादकपदी नियुक्ती.

वंचित बहुजन समाजाचा ठाम आवाज आता अधिक ताकदवान होणार.



केज

'आवाज वंचित बहुजन समाजाचा' या ब्रीदवाक्याने समाजातील दबलेल्या, उपेक्षित घटकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या प्रकाशपर्व न्युज या माध्यम संस्थेच्या कार्यकारी संपादकपदी लिंबराज शंकरराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सामाजिक भान, स्पष्ट भूमिका, आणि पत्रकारितेतील सक्रिय सहभाग यामुळे लिंबराज शंकरराव गायकवाड यांची ही निवड प्रकाशपर्व न्युजसाठी निर्णायक ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशपर्व न्युज नक्कीच नवीन उंची गाठेल, असा विश्वास संस्थेच्या संपादकीय व व्यवस्थापन विभागाने व्यक्त केला आहे.

या नियुक्तीबद्दल प्रकाशपर्व न्युज परिवारातर्फे मा. लिंबराज गायकवाड साहेबांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

नवीन जबाबदारी स्वीकारताना लिंबराज गायकवाड यांनी समाजातील वंचित घटकांचा आवाज बुलंद करण्याची आणि लोकशाही मूल्यांशी निष्ठा ठेवत निडर पत्रकारिता करण्याची ग्वाही दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा