जिल्हा परिषद शाळेच्या लव्हुरी केंद्राची शैक्षणिक शिक्षण परिषद येवता येथे उत्साहात संपन्न
जिल्हा परिषद शाळेच्या लव्हुरी केंद्राची शैक्षणिक शिक्षण परिषद येवता येथे उत्साहात संपन्न.
केज
दि.२३/७/२०२५ रोजी केज तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या लव्हूरी केंद्राची शैक्षणिक शिक्षण परिषद येवता येथे दुपारच्या सत्रात १२-३० ते ४-३० या वेळेत आयोजित करण्यात आली प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यमान जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा मा.गट शिक्षणाधिकारी सुनीलराव केंद्रे होते.
यावेळी त्यांनी बैठकीत सविस्तर मार्गदर्शन केले शाळा व्यवस्थापन समिती रचना व कार्य, बालविवाह रोखणे, प्रतिबंधक व प्रतिज्ञा, पेट परीक्षा,अध्ययन निष्पत्ती इत्यादी विषया वर सविस्तर असे मार्गदर्शन केले.सुलभक म्हणून श्रीराम चाटे, चैतन्य तांबेकर,विक्रम डोईफोडे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमास लव्हूरीकेंद्राचे केंद्रप्रमुख राधाकृष्ण कांबळे, राजाभाऊ कदम,अंकुश मोराळे,दादाराव गीते, गोकुळ सारूक, नामदेव चौरे,संजय चाळक, गजेंद्र जाधव,हनुमंत कटारे इत्यादी मुख्याधापक व सह शिक्षक आणि ट्रेनी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा