विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल,केज या शाळेस CBSE बोर्डाची मान्यता प्राप्त

विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल,केज या शाळेस CBSE बोर्डाची मान्यता प्राप्त.



केज 

विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल केज या शैक्षणिक संस्थेस केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) दिल्ली यांची मान्यता प्राप्त झाली असून संस्थेने केलेल्या महत्वपूर्ण वाटचालीस यश मिळाले आहे .

केज शहरापासून जवळच असलेल्या विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूलची CBSE निरीक्षण समितीमार्फत दिनांक २३ जुलै २०२५ रोजी तपासणी करण्यात आली.या समितीमध्ये पुणे येथिल सिंहगड स्कूलच्या प्राचार्या श्रीमती स्मिता सावंत,आणि पुणे येथिल भारती विद्यापीठाच्या प्राचार्या श्रीमती भावना राय यांचा समावेश होता.तपासणी दरम्यान समितीच्या सदस्यांनी ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक सुविधांचे कौतुक केले. शाळेतील पायाभूत सुविधा,शिस्तबद्ध व्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेले प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण पाहून समिति कडून समाधान व्यक्त केले.

या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे,विजयकांत भैया मुंडे,अतुल दादा मुंडे, प्राचार्या माधुरीताई मुंडे,शाळेच्या प्राचार्या श्रीमती अभिलाषा सारंगदेवोत यांनी शिक्षक धनंजय मस्के सर,अमर शिंदे सर,अविनाश शीलवंत सर,ओम ठोंबरे सर,नवीन कुमार सर,सोमनाथ इंगळे सर,केतन गीते सर,रवी त्रिभुवन सर,निलेश मांजरे सर,शुभांगी सगरे मॅडम,सुमया आतार मॅडम,अश्विनी आरेकर मॅडम, शीला घोळवे मॅडम,दिपाली शेटे मॅडम, आसराबाई अंकुरवाड मॅडम,रत्नगीता शिंदे मॅडम,दिपाली राजमाने मॅडम,झीनत शेख मॅडम,तेजश्री शेटे मॅडम,लीना त्रिभुवन मॅडम,अश्विनी मगर मॅडम,अंजुम शेख मॅडम,प्रणिता वाघमारे मॅडम,वैष्णवी वडगावकर मॅडम,सविता ओहाळ मॅडम,मेघा मोरे मॅडम,अश्विनी शिंदे मॅडम,केतकी मारोटकर मॅडम,शिक्षकेत्तर कर्मचारी गणेश काळे सर,शरद चौरे सर, आदिती पाटील मॅडम,अनिकेत पाटील सर,संदीप कुलकर्णी सर,आणि सर्व मावशी व सर्व ड्रायव्हर,विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानले.तसेच या टप्प्यावर पोहोचण्यामागे सर्वांच्या मेहनतीचे व समर्पणाचे मोठे योगदान असल्याचे शाळेच्या प्राचार्या श्रीमती अभिलाषा सारंगदेवोत यांनी सांगितले.शाळेला आज अधिकृतपणे CBSE अधिसूचना क्रमांक (Affiliation Number) प्राप्त झाला असून केज तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही एक अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब ठरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा