कीर्तन महोत्सव बीड येथे व्याकरणाचार्य ज्ञानेश भक्त ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचा ६१ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

कीर्तन महोत्सव बीड येथे व्याकरणाचार्य ज्ञानेश भक्त ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचा ६१ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन.




बीड

कीर्तन महोत्सव बीड येथे व्याकरणाचार्य ज्ञानेश भक्त ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचा ६१ वा अभिष्टचिंतन सोहळा संत भगवान बाबा वारकरी वारकरी संस्था होळ व स्व. झुंबरलाल  जी खटोड सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१ऑगस्ट ते ३ आॕगष्ट दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की,बीड येथे दि.१ ऑगस्ट ते ३ आॕगष्ट या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,बीड येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात महाराष्ट्रा तील ख्यातनाम सात सांप्रदायिक कीर्तनकार आपली कीर्तन सेवा देणार आहेत.या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे,श्रावण मास सणांचा प्रत्यक्ष उत्सव आणि अध्यात्मिक अनुभव प्रेक्षकांना लाभणार आहे.हा कीर्तन महोत्सव संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या साडे सातशेव्या जन्मजयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आले असून, गेली २५ वर्षे खटोड प्रतिष्ठान कीर्तन आणि संत विचारांचे बीज समाजात पेरण्याचे कार्य सातत्याने करत आहे.दि.१ ते ३ ऑगस्ट रोज सकाळी १० ते सायंकाळी १० पर्यंत चालणाऱ्या या कीर्तन महोत्सवासाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे.

खटोड प्रतिष्ठान च्या वतीने बीड शहरा तील सर्व कीर्तनप्रेमी, भाविकभक्त तसेच नागरिकांना नम्र विनंती करण्यात येत आहे की, आपल्या कुटुंबासह व मित्र मंडळींसह या भव्य कीर्तन महोत्सवात अवश्य सहभागी व्हावे आणि अध्यात्मिक लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक संत भगवान बाबा वारकरी संस्था होळ व गौतम भाऊ खटोड अध्यक्ष स्व. झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा