पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हेवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

पंकजाताई  मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त  कोल्हेवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.



केज 

ग्रामपंचायत कोल्हेवाडी येथे 26 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांचा वाढदिवस एक सामाजिक उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड करून साजरा केला.



"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या वाक्याप्रमाणे  सजीवांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे.


वृक्ष ( झाडे) आपणास ऑक्सिजन देतात, ऑक्सीजन ज्याच्याशिवाय आपण काही मिनिटांपेक्षा जास्त जगू शकत नाही. वृक्ष आपल्याला सावली देतात, पशू पक्षी या सावलीत रखरखत्या सूर्यापासून आसरा घेतात. वृक्षांची मुळे जमिनीची धूप थांबवतात. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून असा हा सामाजिक उपक्रम कोल्हेवाडीच्या ग्रामस्थांनी हातात घेतला व कोल्हेवाडी  येथील मुख्य रस्त्याच्या लगत, जिल्हा परिषद शाळा मिसाळ वस्ती, जिल्हा परिषद शाळा कोल्हेवाडी या ठिकाणी वृक्ष लागवड केली. 

याप्रसंगी कोल्हेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ सरपंच-उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा