शिक्षक कॉलनी भागातील नागरिकांनी गणेश उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा घेतला निर्णय

शिक्षक कॉलनी भागातील नागरिकांनी गणेश उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा घेतला निर्णय.                                     


केज


केज शहरातील शिक्षक काॕलनी भागातील नागरिकांनी बैठक घेऊन आगामी गणेश उत्सवात कोणताही धांगडधिंगा न घालता एकदम साध्या पद्धतीने गणेश जयंती उत्सव साजरा करुन एक आदर्श निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.कोणालाही वर्गणी न मागण्याचा निर्णय समस्त शिक्षक कॉलनी भागातील रहिवासी लोकांनी घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.


येणारा गणेश उत्सव व इतर सर्वच उत्सव साजरे करताना पारंपरिक व साध्या पद्धतीने,उत्साहात प्रत्येक उत्सव साजरा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.डिजेचा धिंगाणा व इतर गोष्टी यामुळे टाळल्या जातात.गणेश उत्सवात पारंपरिक देवाची गाणी,पुजा तसेच प्रसाद ठेऊन गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे.शिक्षक कॉलनी,बीड रोड केजच्या नागरिकांचे व युवकांचे या कौतुकास्पद निर्णयामुळे सर्वञ कौतुक केले जात आहे.


 यामध्ये दत्ता धस पंत, पिटू भैय्या तांदळे, खय्युम शेख,भगवान केदार,सुनील घोळवे, अमर केजकर,राजेश गवळी सर,डॉ. विजयकुमार धस,प्रकाश मुंडे,सोनू धस, दिनकर तांदळे सर,प्रशांत मुळे,रवि घुले, अमोल धस,संदीप भुतडा,चंदू चौरे,सुरेश घुले, राजेश मुळे,राजेभाऊ शिंदे,सुर्यवंशी दादा, पाळवदे सर,घुले सर,गोटू पाळवदे,अमोल मुंडे,वैभव केंद्रे,डॉ.डापकर साहेब,नवनाथ घुले, राज ढाकणे,प्रा.मुकूंद घुले सर,रवि अंधारे, विजय अंधारे,गालफाडे तात्या,मयुर भैय्या टकले,डोईफोडे मेजर,विकास मुळे,अतूल ठोंबरे,अमोल ठोंबरे,चौरे साहेब दुकानदार, हांगे सर,विक्की घोडके,बाबा मुंडे सर व इतर प्रमुख मान्यवर यांनी हा एक चांगला पायंडा मांडला आहे.


या निर्णयाचे सर्व स्तरातून, व्यापारी वर्ग‌,नेते मंडळी तसेच सामान्य जनते तुन केज शहरात सर्वञ कौतुक केले जात आहे.ईतरांनी या निर्णयाचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांतुन व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा