सुकळी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर संपन्न.
सुकळी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर संपन्न.
केज
केज तालुक्यातील युसुफ वडगाव सर्कलमधील कळब अंबाजोगाई रोडवरील सुकळी येथील निसर्ग राजा मंगल कार्यालय येथे दिनांक २३-७-२०२५ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबीरामध्ये महसूल विभाग, पुरवठा विभाग, कृषी विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅग, पीएम किसान, रेशन कार्ड नाव कमी करणे, नाव वाढविणे चे कामकाज करण्यात आले.उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र काढण्यात आले संजय गांधी योजना डीबीटी चे कामकाज करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित विकास हजारे मंडळाधिकारी युसुफ वडगाव, खतीब साहेब ग्राम महसूल अधिकारी युसुफ वडगाव, वाघमारे मॅडम,नागेले मॅडम, केंद्रे मॅडम, पूजा मॅडम, सूर्यवंशी मॅडम, कवडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
विकास हजारे मंडळ अधिकारी यू वडगाव यांनी जनता दरबार घेऊन उपस्थित शेतकरी यांचे अर्ज निवेदने स्वीकारली शेतकरी यांना मार्गदर्शन केले सर्व उपस्थित शेतकरी विद्यार्थी, महिला आणि कर्मचारी याचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमास युसुफ वडगाव मंडळातील प्रतिष्ठित नागरिक,शेतकरी, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा