महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन व पशु संवर्धन विभाग यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशाळांना नोंदणी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न.
महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन व पशु संवर्धन विभाग यांच्या वतीने बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशाळांना नोंदणी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न.
बीड
महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन व पशु संवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी पशुसंवर्धनआयुक्त कार्यालय बीड येथे बीड जिल्ह्यातील एकूण ५३ नोंदणीकृत गो शाळांचे नोंदणी प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे शासकीय सदस्य श्री.उद्धवजी नेरकर व डॉ.दिलीप मोरे यांच्या हस्ते सदर प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने बीड जिल्ह्यातील गोशाळांना नोंदणी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन बीड शहरातील सुभाष रोड वरील पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी श्री.उध्दवजी नेरकर,सदस्य,महाराष्ट्र गोसेवा आयोग,महाराष्ट्र राज्य डॉ.आर डी कदम, जिल्हा पशु संवर्धन उपायुक्तबीड,डॉ.दिलीप मोरे,सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन बीड,
श्री.बाजीराव ढाकणे, बीड जिल्हा समन्वयक, महाएनजिओ फेडरेशन, महाराष्ट्र राज्य, डॉ.देशपांडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील गो शाळेचे संचालक यांची उपस्थिती होती.सर्व ५३ गोशाळा संचालकांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा