जवळबन येथे ग्रामविकास समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जवळबन येथे ग्रामविकास समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
केज
तालुक्यातील जवळबन येथील ग्रामविकास समिती संस्थेतर्फे गावातील ६६ गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उपयोगी साहित्य देऊन गुणगौरव करण्यात आला. गावातील ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनियर तसेच शासकीय सेवांमध्ये नियुक्ती झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गावातील काही विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत. त्यापैकी इटली येथे पीएच डी प्राप्त डॉ.सुधीर भाकरे तसेच फिजिओथेरपी पदवी प्राप्त डॉक्टर कुलकर्णी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच पती प्रमोद करपे, प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, प्रा.बळवंते, जगदीश करपे संस्थेचे कार्यवाह श्री कुलकर्णी उपस्थित होते जि प शाळेचे मुख्याध्यापक, माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक, सेवा सोसायटीचे चेअरमन नितीन भाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते "मुलांकडून अवाजवी गुणवत्तेची अपेक्षा न ठेवता मुलांना त्याच्या आवडीनुसार शिक्षण घेऊ द्यावे" असे मत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हनुमंत भोसले यांनी व्यक्त केले "विद्यार्थी मार्कवंत होण्यापेक्षा गुणवंत व्हावा "असे मत प्रा. बळवंते यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. मुलांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होण्यासाठी तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी गेल्या 18 वर्षापासून संस्थेतर्फे गुणवंताचा सत्कार सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविकातून प्रताप भाकरे यांनी संस्थेच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा इतिहास सांगितला.
दोन्ही शाळेतील शैक्षणिक कामकाजाबाबत ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार डॉ.तानाजी जाधव यांनी केले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा