माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा.
माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा.
केज
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडेंना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर याचिका करता तुषार पडगिलवार याला एक लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कृषी साहित्य खरेदी बाबत राज्य शासनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने दुजोरा दिला आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील कृषी साहित्य खरेदीतील कथित घोटाळ्याचे आरोप खोडून काढले गेले आहेत. त्यांच्या कृषी मंत्रीपदाच्या काळात कृषी साहित्य खरेदी धोरणात बदल केल्याबद्दल आणि त्यामध्ये अनियमितता असल्याचा दावा करत काही याचिका दाखल करण्यात आली होती. यात डीबीटी योजना बंद करून विभागाने स्वतः कृषी साहित्य खरेदी केल्याने अधिक खर्च झाल्याचा आरोप होता. काही कृषी पंपांची खरेदी बाजारातील दरापेक्षा जास्त किमतीत झाल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला होता. या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा होती, परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाने ही खरेदी नियमानुसारच होती असे स्पष्ट केल्याने त्यांना मोठा राजकीय आणि कायदेशीर दिलासा मिळाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा