भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी जिया भाई शेख यांची निवड. सच्चा कार्यकर्त्याच्या कार्याची मिळाली पावती.

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी जिया भाई शेख यांची निवड. सच्चा कार्यकर्त्याच्या कार्याची मिळाली पावती.



बीड 

  सन २००८ सालापासून दिवंगत गोपीनाथराव मुंडे साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिया भाई शेख यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे याबद्दल जिया शेख यांचे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहे.

जिया भाई शेख हे मुंडे साहेबांच्या हयातीत आणि त्यांच्या मृत्यू पश्चात सुद्धा मुंडे भगिनी आणि भाजप सोबत एकनिष्ठतेने कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची व एकनिष्ठतेची दखल घेत राज्याच्या पर्यावरण मंत्री मा.नामदार पंकजाताई मुंडे, माजी खासदार प्रितमताई मुंडे, केज मतदार संघाच्या दबंग आमदार नमिताताई व अक्षयजी मुंदडा आणि केज मतदार संघाचे किंग मेकर म्हणून जिल्हाभर प्रसिद्ध असलेले नंदकिशोर (काकाजी) मुंदडा व युवकांचे हृदयसम्राट युवा नेते पनगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अक्षयजी नंदकिशोर मुंदडा, भाजप  जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख, तालुकाध्यक्ष राणा  दादा डोईफोडे यांच्या आदेशाने

 भा.ज.प. अल्पसंख्यांक मोर्चा बीड तालुका अध्यक्षपदी जिया भाई शेख यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल पक्षीय पातळीसह समाजातील नागरिकांकडून अभिनंदन होत असून पुढील कार्यासाठी हृदय शुभेच्छा दिल्या जात आहे याबद्दल जिया भाई शेख यांनी सर्व अभिनंदनकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा