खा.बजरंग सोनवणे यांच्याकडून महामार्ग, रेल्वेमार्गासाठी सतत पाठपुरावा ; केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवून मांडले प्रश्न, रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्या कडून मागण्या संदर्भात सकारात्मकता
खा.बजरंग सोनवणे यांच्याकडून महामार्ग, रेल्वेमार्गासाठी सतत पाठपुरावा ; केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवून मांडले प्रश्न, रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्या कडून मागण्या संदर्भात सकारात्मकता
केज
बीडजिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पुर्ण करावेत, महामार्ग कामे करीत असताना जिथे-जिथे तांत्रिक दोष झालेले आहेत ते दुरुस्त करावेत भेगा पडलेल्या महामार्गांची दुरूस्ती करावी,अशा विविध मागण्यांसाठी खा. बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी सततचा पाठ पुरावा पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठ थोपटली.तर जिल्ह्यातील रेल्वेच्या संदर्भात केंद्रीयरेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेवून रेल्वे संदर्भा तील विषयावर चर्चा केली.यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेसंदर्भाने मांडलेल्या सर्व मागण्यांबाबत सकारात्कता दर्शवली.
दि.२४ जुलै रोजी खा. बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली.यावेळी शेगाव- पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग मधील परतूर- माजलगाव बिटमधील सादोळा ता.माजलगाव येथील अपूर्ण असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली माजलगाव-केज बिट मधील नादुरुस्तभागांची दुरुस्ती व तांत्रिक दोष दूर करण्याबाबत निर्देश द्यावेत,धारूर घाटातील प्रस्तावित वळण मार्गाचे काम तसेच बर्दापूर- लोखंडी सावरगाव चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे,केज-कळंब मधील मांजरानदीवरील पुलाच्या कामासंदर्भात निर्माण झालेल्या अडचणी दूर करून काम पूर्ण करावे, पैठण-पंढरपूर रस्ता व अहमदपूर-मांजरसुंबा-पाटोदा या रस्त्यांवरील समस्या तातडीने सोडवाव्यात व प्रस्तावित अतिरिक्त बाबींना मंजुरी देण्यात यावी.छत्रपती संभाजीनगर-बीड- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई तालुक्यातील गढी येथील उड्डाणपुल व रस्ता हा विभागाच्या तांत्रिक दोषामुळे अपघात होऊन ६ युवकांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला.या तांत्रिक दोषाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. मयतांच्या कुटूंबियांना मदत करण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली.या सर्व मुद्द्यांकडे ना.नितीन गडकरी यांनी वैयक्तिक लक्ष घालण्याचे आश्वासन दिले व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्या साठी संबंधितांना सूचना दिल्या.याच वेळी 'तुमचा बीड जिल्ह्याच्या विकासासाठीचा पाठपुरावा आणि धडपड चांगली आहे', अशा शब्दात पाठीवर थाप देवून कौतूक केले. यानंतर रेल्वे मंत्री ना. अश्विनी वैष्णव यांची त्यांच्या संसदभवन कार्यालयामधे खा. बजरंग सोनवणे यांनी भेट घेतली.यावेळी, आहिल्यानगर-बीड—परळी रेल्वे प्रकल्पा अंतर्गत प्रस्तावित १० रोड ओव्हर ब्रिज व ढोलेवस्ती (बीड) रोड अंडरपासचे कामत्वरीत सुरू करण्यात यावे. बार्शीनाका (बीड शहर) रेल्वे स्टेशनवर प्रवासी संख्येच्या प्राथमिकते च्या आधारे थांबा देण्यास मंजुरी देणे, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्यांना थांबा देण्याचा प्रस्ताव मंजूर करून आदेश त्वरित निर्गमित करणे,बीड-आहिल्या नगर-सीएसटी (मुंबई) अशी नियमीत रेल्वेसेवा लवकर सुरू करावी, अशी मागणी केली. यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मकता दाखवित मागण्यां संदर्भात कार्यवाही करण्याचा शब्द दिला.
बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महामार्ग,रेल्वेचे कामे होणे अत्यंत महत्त्वाचे असून,केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरीसाहेब यांनी वैयक्तिक लक्ष देतो,असा शब्द दिला आहे.तर रेल्वेमंत्र्यांनी मागण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.या प्रकल्पांची अंमल बजावणी लवकरात लवकर होण्यासाठी माझ्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जाईल - खा.बजरंग सोनवणे, बीड लोकसभा मतदार संघ.
सादोळाकरांची मागणी केंद्रीय मंत्र्यांपुढे मांडली
शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गामधील परतूर- माजलगाव बिटमधील सादोळा ता.माजलगाव येथे पुल आणि रस्त्याचे काम अपुर्ण आहे. याठिकाणी जमीनी वरून ही वादविवाद निर्माण झालेले आहेत. यामुळे काम अपूर्ण असून यावर योग्य तो मार्ग काढून तेथील काम पूर्ण करावे,यासाठी मागील काही दिवसां पुर्वी सादोळाकरांनी उपोषण केले होते. यानंतर दि.२४ जुलै रोजी खा.सोनवणे यांनी सादोळाकरांचा प्रश्न थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे ठेवला.रस्त्यासंदर्भात जनभावना लक्षात घेवून तो प्रश्न तातडीने सोडवू,असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा