स्वामी विवेकानंद विद्या मंदिर[माध्यमिक विभाग] शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न.

 स्वामी विवेकानंद विद्या मंदिर[माध्यमिक विभाग] शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न.








८ वी शिष्यवृत्तीधारक, होमी भाभा बाल वैज्ञानिक व एम.टी.एस. ऑलंपियाड राज्य स्तरीय परीक्षेतील मोमेंटो,गोल्ड मेडल व सिल्वर मेडल प्राप्त एकूण ७५ विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


केज 

जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [माध्यमिक विभाग] या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ वर्षातील विविध स्पर्धा परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जीवन विकास शिक्षणमंडळाचे सचिव जी.बी.गदळे, प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे,तर प्रमुख उपस्थिती म्हणून जीवन विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, ज्येष्ठ शिक्षक अजय देशपांडे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील सहशिक्षक तसेच एम.टी.एस. ऑलंपियाड समन्वयक बी.एम.टिंगरे यांनी केले याप्रसंगी ते म्हणाले की, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [माध्यमिक विभाग ] या शाळेचा आलेख केवळ गुणात्मक नव्हे तर संख्यात्मक ही वाढत आहे.यावर्षी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एकूण पाच  विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत.डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेमध्ये एकूण तीन विद्यार्थी दुसऱ्या लेव्हल साठी पात्र ठरले आहेत. महाराष्ट्र टॅलेंट सर्च राज्यस्तरीय परीक्षेमध्ये शाळेतील मुंडे आर्यन अंगद इयत्ता सातवी मधून राज्यातून सर्व प्रथम आला आहे.तर एम.टी.एस.ऑलंपियाड परीक्षेमध्ये इयत्ता आठवीतून यादव हिंदवी विष्णू राज्यातून सर्वतृतीय आली आहे. स्पेशल मोमेंटो प्राप्त ३ विद्यार्थी,गोल्ड मेडल प्राप्त २१ विद्यार्थी, सिल्वर मेडल प्राप्त ३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष जी. बी.गदळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेतूनही आपले करिअर घडवले पाहिजे.त्या दृष्टिकोना तून यशस्वी वाटचाल केली पाहिजे.यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये विद्यार्थ्यांचा पाया घडविणाऱ्या शिक्षकांचे योगदान फार महत्त्वाचे असते.शेवटी त्यांनी सर्व स्पर्धा परीक्षे तील गुणवंतविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही अभिनंदन केले. 

आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी- यादव हिंदवी विष्णू,मोरलवार कैवल्य गणेश,जगदाळे श्रेयस किरण,चव्हाण अक्षरा सुंदर,यादव पार्थ विष्णू इत्यादी.

डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा-

भिसे अभिनव श्रीहरी, सांजुरे आकांक्षा दिपक, लटपटे आर्या राजेंद्र इत्यादी.

महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा- मुंडे आर्यन अंगद राज्यातून सर्वप्रथम,चाटे ओंकार सूर्यकांत केंद्रातून सर्वद्वितीय इत्यादी.

एम.टी.एस.ऑलंपियाड राज्यस्तरीय परीक्षा- 

यादव हिंदवी विष्णू राज्यातून सर्वतृतीय, मोरलवार कैवल्य गणेश जिल्ह्यातून सर्व द्वितीय, लटपटे आर्या राजेंद्र जिल्ह्यातून सहावी हे विद्यार्थी स्पेशल मोमेंटो साठी पात्र ठरले आहेत.

एम.टी.एस. ऑलंपियाड गोल्ड मेडल प्राप्त विद्यार्थी- काकडे अनुष्का बाबासाहेब, चौरे सोहम लक्ष्मण, डोईफोडे आदित्य राजाभाऊ,कांबळे जयराज हरिभाऊ,मोरे संस्कृती दत्ता,खरमाटे सत्यानंद मेघराज,काळे शौर्य सागर,चाटे रोहन संतोष,घोळवे गुंजन धनंजय,कापरे अथर्व अंकुश,जाधव संस्कृती भारत,शेळके हर्षदा संजय,घोडके शिवम संतोष,ठोंबरे श्रेयश श्रीधर,बावगे वेदांत महादेव,देशमुख गौरी गणेश,शेटे सक्षम मिलिंद,ढोबळे प्राची युवराज,क्षीरसागर सिद्धी सचिन इत्यादी.

एम.टी.एस.ऑलंपियाड सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी- रणवीर रविंद्र मुंडे,अनुष्का आश्रुबा नागरगोजे,प्रणव स्वप्नील वाघमारे,अपूर्वा उत्तरेश्वर सोनवणे, आरती बिबिशन चाटे, सौम्या सचिदानंद ढेपे, संस्कृती रणजितकेदार, अमृता नरसिंग शिंदे, अंजली लक्ष्मण चौरे, आर्या अशोक खोगरे, तनुजा संतोषकुमार बियाणी,श्रेया प्रविण मैंद्रे,अथर्व बाबू इंगोले, रुपाली शिवराज लांब, शिवभक्ती प्रेमानंद स्वामी,रसिका शाहूराव कुलकर्णी, शिवानी शिवराज जाधव,आरती वैजनाथ राऊत, अंकिता संतोष चौरे,आर्या बालाजी शेटे,समर्थ प्रशांत चौरे, विक्रांत महादेव चौगुले, आरव दिपक कांबळे,तनुजा शिवराम राऊत,श्रेया पांडुरंग घाटुळे,दुर्गेश सचिन जोगदंड,श्रेया विनोद गुंड,श्रावणी सचिन मुळे,प्रतिक रामेश्वर डोईफोडे,पवन जयदेव चौरे,अक्षरा विकास नेहरकर,आर्या रमेश डोईफोडे, राजेश अशोक साखरे, प्रथमेश चंद्रकांत पाळवदे,वैभव अंगद ससाणे,सोनाक्षी किशोर दुनघव,भिसे श्रेया श्रीहरी,काकडे अथर्व विजय,कदम कार्तिक सुरेश.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले.तर आभार कल्याण आदमाने यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा