केजमध्ये आवादा कंपनीचा मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.

केजमध्ये आवादा कंपनीचा मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.











केज 

गेल्या वर्षभरापासून वादग्रस्त ठरलेल्या आवादा कंपनी च्या मनमानी कारभाराविरोधात केज येथील शेतकरी दि.24/7/2025 गुरुवार रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, केज परिसरात सर्वे नंबर 176 मधील शेतकऱ्यांना आवादा कंपनीचे कर्मचारी पूर्वी झालेल्या सर्व प्रमाणे काम न करता गावंगुंडांना हाताशी धरून बेकायदेशीररित्या शेतामध्ये विद्युत पोल रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर शेतकऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. या प्रकाराने शेतकरी भयभीत झाले आहेत.

 सर्वे नंबर 176 मध्ये शेतकऱ्यांची राहते पत्र्यांची घरे आहेत, येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे, सदर विद्युत पोल रोवले तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल व उपासमारीची वेळ येईल, कंपनीच्या विरोधात प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही असे उपोषकर्त्यांचे म्हणणे आहे, कंपनी चा मनमानी कारभार थांबवावा व मूळ सर्वेक्षण झालेल्या मार्गाने विद्युत जोडावेत. शेतकऱ्यांना केली जाणारी दमदाटी व होणारा अन्याय थांबवावा.

 या मागणीसाठी  शेतकरी रेणुका सूर्यकांत तेलंग, संगीता बलभीम तेलंग, सविता संतराम भोसले, स्वाती पांडुरंग भोसले, कमल शिवाजी वनवे, मीरा गोरख थोरात, मेघराज भोसले, सूर्यकांत तेलंग, गोरख थोरात, अशोक भोसले, संतराम भोसले, मारुती भोसले, पांडुरंग भोसले, बलभीम तेलंग, उपोषणास बसले आहेत. शेतकऱ्यांच्या या मागण्या प्रशासनाने तातडीने मार्गी लावाव्यात अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा