पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आनंद व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी नशा व व्यसनाधीनते पासून दूर रहावे - डॉ. वसुदेवबप्पा गायकवाड

इमेज
आनंद व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी नशा व व्यसनाधीनते पासून दूर रहावे - डॉ. वसुदेवबप्पा गायकवाड. केज आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण,आनंदगांव ता. केज.जि.बीडच्या केज येथील संपर्क कार्यालयात आयोजित नशा व व्यसनाधीनता शरीराला व आरोग्याला घातक या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे संस्थापक कार्यवाह,जेष्ठविचारवंत, जेष्ठ समाजसेवक डॉ. वसुदेवबप्पा गायकवाड बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की,आरोग्यदायी व आनंददायी जीवन जगण्यासाठी  शारीरीक, मानसीक, सामाजिक, आर्थिक हानी व नामुष्की टाळण्यासाठी व्यसनापासून व नशा मुक्त आयुष्य प्रत्येकाने जगावे असे आवाहन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले. यावेळी संजय सोनवणे, आनंदभैय्या गायकवाड, एस.एस.शिनगारे,पी.एस.शिनगारे, आशालता येळवे यांनी ही मार्गदर्शन केले.दि.२१ जुन २०२५ रोजी  जागतीक योगदिन साजरा करून योग करण्याचे फायदे सांगीतले.दि.५ जुन २०२५ रोजी जागतिक पर्यावरणदिनकार्यशाळा घेवून साजरा करण्यात आला.पर्यावरणाचे महत्व, पर्यावरणसंवर्धनाची आवश्यकता, मानवी जीवनासाठी व सर्वच जिवजंतूच्या अस्तित्वा साठी पर्यावरण जपणे कसे आवशयक आहे...

केज तालुक्यातील सर्वात सुंदर सरकारी शाळेचा बहुमान पटकावला जिल्हा परिषद माध्यमिक शाळा भाटुंबा.

इमेज
केज तालुक्यातील सर्वात सुंदर सरकारी शाळेचा बहुमान पटकावला जिल्हा परिषद माध्यमिक शाळा भाटुंबा. केज पंचायत समिती केज येथील सभागृहात पार पडलेल्या मोठ्या दिमाखदार सोहळ्यात केजच्या गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाने यांच्या हस्ते जि.प.माध्यमिक शाळा भाटुंबा शाळेतील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना तीन लाख रुपयांचा प्रतिकात्मक धनादेश, विजयी चषक, प्रमाणपत्र,पुस्तक आणि शाल,श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शासना मार्फत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये सन २०२४- २५ चे शासकीय व्यवस्थापनाच्या शाळा  आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा अशा दोन गटातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रथम तीन शाळांची निवड केली जाते.या निवडलेल्या शाळा पुढे जिल्हा स्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असतात.भरपूर किचकट निकष असणारी ही स्पर्धा प्रत्येक शाळेचा कस पाहते.शाळेचे बाह्यरूप, परिसर,मैदान, वृक्षारोपण,शाळेत किती उपक्रम राबवले जातात? उपक्रमांचा दर्जा कसा असतो? विद्यार्थ्यांचा सहभाग किती असतो? सर्व उपक्रमांचे रेकॉर्ड केव्हा पासून मेंटेन केलेले आहे? असे अनेक निकष पार करत केज तालुक्यातून प्रथम क...

शासकीय आयटीआय कॉलेज धारूर येथे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एन.एस.इ.)मार्फतएक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न

इमेज
शासकीय आयटीआय कॉलेज धारूर येथे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एन.एस.इ.)मार्फतएक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न. धारुर  दिनांक 25 जून 2025 रोजी शासकीय आय टी आय कॉलेज धारूर येथे भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड अर्थात (सेबी) तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एन एस इ) च्या माध्यमातून आय टी आय च्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवशीय स्मार्ट निवेक्षक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजचे प्राचार्य विजय बेलेकर सर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले.   कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून(सेबी) तसेच एन एस इ चे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर गणेश चौधरी सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले.यात त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या विविध योजना,तसेच पोस्ट ऑफिस मधील असलेल्या विविध योजना,डिमॅट अकाउंट, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड व इतर शासकीय योजनांचे मार्गदर्शन केले.  तसेच गुंतवणूक करत असताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी ? व फसवणूक करणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या.या कार्यक्रमाचे आ...

छत्रपती राजर्षी शाहू महाराज कर्ते सुधारक आणि समाज उद्धारक होते - डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड

इमेज
छत्रपती राजर्षी शाहू महाराज कर्ते सुधारक आणि समाज उद्धारक होते - डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड केज स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज.जि.बीड येथे २६ जुन २०२५ रोजी लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व्याख्यान कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.प्रमुख व्याख्याते म्हणून दादासाहेब गायकवाड यांचे छोटेखानी व्याख्यान संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब जाधव, रामराजे गायकवाड, राजाभाऊ बोडके, बाबासाहेब शिंदे यांची उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, ख्यातनाम वक्ते,परखड व्याख्याते डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड हे होते. छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे कर्ते समाजसुधारक व समाज उध्दारक होते असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोप करताना डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.सर्वप्रथम छत्रपती  राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.

बीड जिल्ह्यातील तीन आंबेडकरवादी योद्ध्यांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान

इमेज
बीड जिल्ह्यातील तीन आंबेडकरवादी योद्ध्यांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान.  केज अण्णाभाऊ साठे पिपल्स फोर्सचे संस्थापक अध्यक्ष  बा.रा.वाघमारे सर यांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीत योगदानाबद्दल महाराष्ट्रा तील ५० मान्यवरांना दि.२६ जून २०२५रोजी पुरस्कृत करण्यात आले.आंबेडकरवादी योद्ध्यांचा सत्कारआणि भव्य पुरस्कार वितरण सोहळा रुबी हॉटेल नवीन नांदेड सिडको येथे पार पडला.अनेक नामवंत मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार सन्मान पूर्वक देण्यात आला. बीड येथील आझाद क्रांती सेनेचे सेना प्रमुख राजेश घोडे यांनात्यांच्या आंबेडकरवादी चळवळी बद्दल हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्रामध्ये खरी आंबेडकरी चळवळ चालवणारा ध्येयवेढा तरुण म्हणून ते परिचित आहेत.आंबेडकरवादी चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तरुणांची एक वेगळीच सेना तयार केलेली आहे.या सेनेच्या माध्यमातून मागास,वंचित,अन्याय अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी वेगाने तत्पर असतात. त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान नांदेड येथील अण्णाभाऊसाठे पीपल्स फोर्सच्य...

कोठी येथील शेतकऱ्याचे सोलार अज्ञात व्यक्तीने फोडले, केज पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद.

इमेज
कोठी येथील शेतकऱ्याचे सोलार अज्ञात व्यक्तीने फोडले, केज पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद.  केज   केज तालुक्यातील कोठी गावचे अशोक देविदास मुळे यांच्या म्हसोबा फड नावाच्या शिवारातील शेतात अज्ञात मातेफिरुने जी.के कंपनीची एक सोलर प्लेट फोडली असून संबंधित व्यक्ती विरोधात केज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  याबाबत सविस्तर वृत्त असे की, अशोक देविदास मुळे वय 55 वर्ष व्यावसाय शेती, हे दि.10 जुन 2025 रोजी सकाळी 9:00 वाजता च्या दरम्यान म्हसोबाचा फड शेतात गेले असता, शेतातील जी.के नावाचे कंपनी सोलर पॅनल मधील एक प्लेट फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले.त्यांच्या सोलर प्लेटचे नुकसान झाल्यामुळे त्यांनी याची माहिती केज पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली आहे. केज पोलिसांनी संबंधित अज्ञात व्यक्ती विरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास केज पोलीस स्टेशनचे पीआय स्वप्निल ऊनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

रोहन गलांडे यांच्या अमरण उपोषणाला यश आले ! सप्ताह कमीटी व नामदेव महाराज भक्तांचे मानले आभार !

  रोहन गलांडे यांच्या अमरण उपोषणाला यश आले !       सप्ताह कमीटी व नामदेव महाराज भक्तांचे मानले आभार ! केज केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे ७ जुन ते १६ जुन पर्यंत रोहन दादा गलांडे पाटील यांनी विविध मागण्या साठी अमरण उपोषण केले होते. मागण्या अशा होत्या की नागबेट वस्ती ते श्री संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्र अतिक्रमण हटवा तर ८० टक्के अतिक्रमण हटविण्यात आले आहे. राहीले आहे ते ग्रामपंचायत हद्दीतील ते सुद्धा ७ सात दिवसांत हटविण्यात येईल.  तसेच काही क्षनीक सुखा साठी दोन चार बांधकामावर स्टे आला आहे. ते सुद्धा पावसाळा संपला की हटविण्यात येईल असे जिल्हा परिषद बांधकाम यांनी लेखी दिले आहे. महाराष्ट्रतील शेतकरी कर्जमाफी, बँक खात्यावरील होल्ड काढणे, पिकांना हमीभावासाठी कायदा, व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत या विषयावर कलेक्टर यांच्या सोबत रोहन गलांडे यांचे बोलने झाले असून या मागणीसाठी सरकार कडे मागणी केली आहे असे कलेक्टर विवेक जॅक्सन यांनी म्हटले आहे  चिंचोली माळी बाजार स्थळ घरे असल्याने पावसाळा संपला की हटविण्यात येईल असे ग्रामपंचायतने लेखी...

मराठवाड्यातील रेल्वेमार्ग, सुविधा आणि थांब्यांची मागणी तात्काळ पूर्ण करा - खा.रजनीताई पाटील.

इमेज
मराठवाड्यातील रेल्वेमार्ग, सुविधा आणि थांब्यांची मागणी तात्काळ पूर्ण करा - खा.रजनीताई पाटील.   केज पुणे येथे रेल्वे समितीची बैठक सोमवार रोजी झाली.या बैठकीत खा. सौ.रजनीताई पाटील यांनी मराठवाड्यातील रेल्वे विकास संदर्भात बीड,लातूर, धाराशिव  यांसह विविध जिल्ह्या तील रेल्वेचे प्रश्न मांडून अनेक मागण्या मांडल्या यावेळी रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री.धरम वीर मीना साहेब,खासदार डॉ.सुप्रियाताई सुळे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे,खासदार डॉ. अमोल कोल्हे,खासदार डॉ.शिवाजी काळगे, खासदार श्री.निलेश लंके,खासदार श्री. धैर्यशील मोहिते पाटील आदी उपस्थित होते.  घाटनांदूर-अंबाजोगाई-केज-नेकनूर- मांजरसुंभा-पाटोदा- आष्टी-जामखेड-कर्जत-श्रीगोंदा(दौंड) रेल्वे मार्ग (संरक्षण मंजूर सर्वेक्षण सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद- लातूर- अंबाजोगाई-परळी- सोनपेठ-पाथरी- मानवत-पाचलेगाव- जिंतूर-औंढा नागनाथ- नरसी-हिंगोली मार्ग, परळी,लातूर रेल्वे स्थानकावरून योग्य रेल्वे मार्ग जोडून व्यावसायिक आणि पर्यटन क्रियाकलाप वाढविण्यासाठी मराठवाडा मागास प्रदेशाला विदर्भ आणि उत्तर भारताशी म्हणजेच दिल्ली, राजस्थान,पंजाब, हरियाणा,जम्मू ...

मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांसंबंधी खा.सौ. रजनीताई पाटील यांनी मांडले अभ्यासपूर्ण विवेचन.

इमेज
मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांसंबंधी खा.सौ. रजनीताई पाटील यांनी मांडले अभ्यासपूर्ण विवेचन. केज पुणे येथील रेल्वे समिती च्या बैठकीत मराठवाड्यातील विविध रेल्वेमार्गाच्या प्रश्नावर खा.सौ.रजनीताई पाटील यांनी प्रश्न मांडले   घाटनांदूर-अंबाजोगाई-केज-नेकनूर- मांजरसुंभा-पाटोदा- आष्टी-जामखेड-कर्जत-श्रीगोंदा(दौंड) रेल्वे मार्ग (संरक्षण मंजूरसर्वेक्षण)  सोलापूर- तुळजापूर- धाराशिव - लातूर - अंबाजोगाई-परळी - सोनपेठ-पाथरी- मानवत-पाचलेगाव- जिंतूर-औंढा नागनाथ - नरसी - हिंगोली मार्ग, परळी,लातूर रेल्वे स्थानकावरून योग्य रेल्वे मार्ग जोडून व्यावसायिक आणि पर्यटन क्रियाकलाप वाढविण्यासाठी मराठवाडा मागास प्रदेशाला विदर्भ आणि उत्तरभारताशी म्हणजेच दिल्ली,राजस्थान, पंजाब,हरियाणा,जम्मू आणि काश्मीर, मध्यप्रदेश इत्यादींशी जोडणे.विकाराबाद- बिदर-लातूर-कुर्डुवाडी हा मार्ग/ट्रॅक गेल्या दहा वर्षांपासून सुरू झाला आहे,अजूनही खूपकमी प्रवासी गाड्या आहेत. या मार्गाचा वापर नवीन गाड्यांसाठी केला जाऊ शकतो ज्या विशाखापट्टणम, विजयवाडा,हैदराबाद ते मुंबई/पुणे दरम्यानधावू शकतात.आदी विषय मांडले.लवकरच नवीन रेल्वे मार्ग म...

कीट्टी आडगाव चे सरपंच रुख्मांगद खेत्रे यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा - केज तालुका सरपंच परिषदेची मागणी

इमेज
कीट्टी आडगाव चे सरपंच रुख्मांगद खेत्रे यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा - केज तालुका सरपंच परिषदेची मागणी. केज  दोन दिवसापूर्वी माजलगाव तालुक्या तील कीट्टी आडगाव चे सरपंच रुख्मांगद खेत्रे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून सदरील रक्कम ही सरपंच यांनी सदरील रक्कम ही स्वतःसाठी घेतली नाही तर विहीर मंजुरीसाठी जे अधिकारी पैसे मागतात त्यांना देण्यासाठी घेतली होती यात त्यांचा काहीही दोष नसल्याने त्यांना यागुन्ह्यातून मुक्त करावे अशी मागणी केज तालुका सरपंच परिषदेच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत सविस्तर वृतांत असा की,दोन दिवसापूर्वी माजलगाव तालुक्यातील कीट्टी आडगाव चे सरपंच रुख्मांगद खेत्रे यांनी विहीर मंजुरीसाठी लाभार्थी यांचेकडून पैसे घेतल्याचे प्रकरण घडले परंतु हे पैसे सरपंच यांनी स्वतःसाठी घेतले नाहीत तर वरिष्ठ अधिकारी विहीर मंजूर करण्यासाठी 25 ते 30 हजार रुपये मागतात मग ही रक्कम सरपंच कोठून देणार सदर लाभार्थी यासाठी ही रक्कम देतात परंतु ही रक्कम सबंधित अधिकारी सरपंच किंवा उपसरपंच किंवा रोजगार सेवक यांच्या माध्यमातून स्वीकारतात आण...

शारदा इंग्लिश स्कूल केज शाळेचे अल्पकाळात 60 पेक्षा जास्त मुले एमबीबीएस साठी पात्र, कमी कालावधीतील हे विक्रमी यश -- रमेशराव आडसकर

इमेज
शारदा इंग्लिश स्कूल केज शाळेचे अल्पकाळात 60 पेक्षा जास्त मुले एमबीबीएस साठी पात्र, कमी कालावधीतील हे विक्रमी यश --  रमेशराव आडसकर. नीट,जेईई-2025 साठी पात्र झालेल्या शाळेतील  विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले मत.   केज  इंग्लिश स्कूल केज या शाळेचे नीट 2025 परीक्षेत एमबीबीएस या अत्युच्च अभ्यासक्रमासाठी पात्र ठरलेल्या तसेच जेईई मध्ये उत्कृष्ट गुण घेणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव मा रमेशरावजी आडसकर यांच्या हस्ते आज करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्याबरोबर आई वडील, नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये NEET-2025 मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने  प्रत्यूष ठोंबरे 570(AIR 5546),आर्यन शिंदे 533, मुंडे अभिजीत 518, देवयानी थोरात 499,तरJEE-MHCET मध्ये अदिती शिनगारे 98%, यश डुबे 95 %, टोणगे अनिकेत 95 %,संयुक्ता वडगावकर 92 %, श्रेयस पाटील 95%, अल्फिया शेख 90%  या विद्यार्थ्यांचा समावेश आहे याप्रसंगी आपले विचार मांडताना रमेशराव आडसकर यांनी सांगितले की श...

जीवन विकास शिक्षण मंडळ, केज संचलित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा संपन्न

इमेज
जीवन विकास शिक्षण मंडळ, केज संचलित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा संपन्न ध्येयप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे - प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे. १० व १२ बोर्ड परीक्षेतील तसेच वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वी एकूण ९५ गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केज  सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मानसिक व शारीरिक दृष्ट्या सबल असले पाहिजे. तसेच ध्येयप्राप्तीसाठी नेहमी सकारात्मक राहिले पाहिजे. आपल्याला काय व्हायचंय हे विद्यार्थ्यांनी आत्ताच ठरवले पाहिजे. मोठी स्वप्ने पाहत असताना, स्वप्न हे झोपेत नव्हे तर ते उघड्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे. या जगामध्ये सर्व काही शक्य आहे परंतु आपली इच्छाशक्ती तितकी प्रबळ असायला हवी. समाजातील प्रत्येक घटक हा महत्त्वाचा आहे. क्षेत्र कुठलेही असो तेंव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता विकसित केल्या पाहिजेत. यशस्वी होण्यासाठी महापुरुषांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत. जगातील सगळी युद्धे केवळ शस्त्रांच्या व सैनिकांच्या बळावर जिंकली गेली नसून ती सैन्यांच्या मनोबळावर जिंकली...

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली म्हणजे अरण्य परिसंस्थेचे दीपस्तंभ --- डॉ. काशीद

इमेज
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली म्हणजे अरण्य परिसंस्थेचे दीपस्तंभ --- डॉ. काशीद केज    जंगल हे फक्त सौंदर्यांचे ठिकाण नसून वनातील सूक्ष्म निरीक्षणाद्वारे जैवविविधतेचा अभ्यास करून जंगलातील अद्भुत विश्व उभारणारे पद्मश्री मारुती चितमपल्ली म्हणजे अरण्य परिसंस्थेचे दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन डॉ. नवनाथ काशीद यांनी केले. ते मारुती चितमपल्ली यांच्या आदरांजली  कार्यक्रमात  बोलत होते.       कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील अध्यापक  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर हे होते. तर मसाप केजचे सचिव राहुल गदळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या स्मरणात मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या मैदानावर वृक्षारोपन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारंप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. सौदागर म्हणाले की, अभ्यासूनी प्रकटावे या उक्तीप्रमाणे पद्मश्री मारुती चितमपल्ली यांनी स्वःअनुभवातून अरण्यातील संबंध विश्व जगासाठी उलगडून दाखवले आहे. याची साक्ष आपणाला त्यांनी लिहिलेल्या पक्षीकोश, प्राणीकोश, मत्स्यकोश, रणवाटा, अनंददायी बगळे, चकव...

केज शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गायब ? शेतकरी बांधवांना अडी अडचणी सोडविण्यासाठी कोठे जायचे पडला प्रश्न !

इमेज
केज शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गायब ? शेतकरी बांधवांना अडी अडचणी सोडविण्यासाठी कोठे जायचे पडला प्रश्न ! केज केज शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले तालुका कृषी अधिकारी कार्यालय अचानक कोणतीही पुर्व सुचना न देता गायब झाले असून शेतकऱ्यांना आपल्या अडी अडचणी सोडविण्या साठी कोठे जायचे असा यक्ष प्रश्न पडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कृषी कार्यालय केज येथे एसटी डेपो जवळ कार्यान्वित होते.परंतु सदरील जागेवर आता कृषी विभाग कार्यालय नसुन कुठलीही पुर्व सुचना न देता हे तालुका कृषी अधिकारी कार्यालय केज येथुन गायब झाले आहे.या बाबत चौकशी केली असता हे तालुका कृषी कार्यालय हे गावाच्या बाहेर बीड रोडवर दुसऱ्या मजल्यावर स्थीत असल्याचे दिसून आले.आता या तालुका कृषी कार्यालयात जाण्यासाठी दिव्यांग बांधव शेतकऱ्यांनी कसे  जायचे ? असा यक्ष प्रश्न पडला आहे कारण कार्यालय दुसऱ्या मजल्यावर असल्याने दिव्यांग बांधवांना वर कसे जायचे हे कळायला मार्ग नाही तर सदरील कार्यालय शहरात असणे आवश्यक असताना गावाबाहेर नेण्या मागील उद्देश काय हे ...

एच.पी.एम.चा बेजबाबदार कारभार; केज बसस्थानका जवळील पूल वापरण्याआधीच कोसळला!"

इमेज
एच.पी.एम.चा बेजबाबदार कारभार; केज बसस्थानका जवळील पूल वापरण्याआधीच कोसळला!" गुण नियंत्रक पथक नुसते नावालाच ? केज   केज येथील बसस्थानकाबाहेरील वाहतुकीसाठी नव्याने उभारण्यात आलेला पूल अवघ्या काही तासांतच खचल्याने आणि त्यातील लोखंडी सळया बाहेर पडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, हा पूल अजून वाहतुकीस अधिकृतपणे खुला देखील झाला नव्हता, तरीदेखील एकच वाहन गेल्यानंतर या पुलावर खड्डा पडल्याची घटना समोर आली आहे. केज बसस्थानकात वाहने ये-जा करण्यासाठी बाहेर निघणाऱ्या मार्गावरून नाल्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या नाल्यावर पूल बांधण्याचे काम एच. पी. एम. कंपनीकडे सोपवण्यात आले होते. मात्र, कंपनीने अत्यंत हलगर्जीपणे व निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते. जनतेकडून असा प्रश्न निर्माण होतो की, सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः प्रवाशांच्या दैनंदिन वापरातील रस्ते व पूल बांधताना प्रशासन आणि ठेकेदार कंपन्या इतक्या बेफिकीर कशा राहू शकतात? केवळ दाखवण्यापुरते काम करून करोडोंच्या निधीचा अपव्यय आणि नागरिकांच्या जिवाशी खेळ, हे थांबवण्यासाठी प्रशासन काय पावल...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे बीड जिल्हास्तरीय अधिवेशन 17 सप्टेंबरला होणार - वैभव स्वामी. बीड येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न.

इमेज
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे बीड जिल्हास्तरीय अधिवेशन 17 सप्टेंबरला होणार - वैभव स्वामी.  बीड येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न. बीड   महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे मराठवाडा विभागीय अधिवेशन नुकतेच ऐतिहासिक आणि यशस्वीरित्या संपन्न झाले.आता येणाऱ्या 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बीडचे पहिले जिल्हास्तरीय अधिवेशन 2025 मध्ये घेण्याचे जिल्हास्तरीय बैठकीमध्ये निश्चित झाल्याचे पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी जाहीर केले आहे.  बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे शनिवार दिनांक 21 जून 2025 जागतिक योग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई अंतर्गत बीड जिल्हा शाखेची बैठक मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली. या बैठकीस बीडचे जिल्हाध्यक्ष अमजद खान,ग्रामीण जिल्हाध्यक्ष अँड विनायक जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक काळकुटे, महिला जिल्हाध्यक्ष शेख आयेशा, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष शेख ताहेर यांच्यासह पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस शेख वस...

राष्ट्रीय महामार्गातील दोन टप्प्यांसाठी ४२१ कोटींची कामे मंजूर.

इमेज
राष्ट्रीय महामार्गातील दोन टप्प्यांसाठी ४२१ कोटींची कामे मंजूर. खा.बजरंग सोनवणेंनी करून दाखविले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले सोनवणेंच्या पाठपुराव्याला पाठबळ बीड:  जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय महामार्ग गेले असून वाहूतुकीच्या दृष्टीने माजलगाव ते केजमधील धारूर जवळचा घाट ब्लॅकस्पॉट ठरला होता. शिवाय लातूर ते लोखंडीसावरगाव दरम्यान बर्दापुर फाटा ते लोखंडी सावरगाव रस्त्यातील उर्वरित लांबीचे चौपदरीकरण करण्याची बाबही महत्वाची होती. याबाबत खा.बजरंग सोनवणे यांनी वारंवार पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठबळ देत ४२१ कोटींची ही दोन्ही कामे सन २५-२६ च्या वार्षिक नियोजनामधे मंजुरीस प्रस्तावित केली आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८(सी) माजलगाव ते केजमधील धारुर जवळच्या घाट अरुंद असून चढ जास्त असल्यामुळे वारंवार अपघात होत होते, तसेच प्रवासात वेळ लागत होता. हा घाट ब्लॅकस्पॉट म्हणूनही जाहिर करण्यात आलेला आहे. ही बाब विचारात घेऊन बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी धारुर घाटातील रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून थेटेगव्हाण मार्गे कमी चढाईचा व अधिक रुंदीचा चौपदरी रस्ता ...

*लोखंडी सावरगाव ते बर्दापूर महामार्गाचे होणार चौपदरीकरण*

इमेज
  *लोखंडी सावरगाव ते बर्दापूर महामार्गाचे होणार चौपदरीकरण* *वार्षिक आराखड्यात समावेश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली वचनपूर्ती* *लोखंडी सावरगाव ते मांजरसुंबा रस्ता चौपदरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचेही आदेश* अंबाजोगाई :  शहराजवळून जाणारा ५४८ बी हा महामार्गावरील बर्दापूर ते लोखंडी सावरगाव या टप्प्याचे चौपदरीकरण करण्याचे आ. नमिता मुंदडा यांच्या प्रचारसभेत दिलेले वचन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्ण केले आहे. केंद्र सरकारच्या वार्षिक आराखड्यात या मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे.  अंबाजोगाई आणि लातूरला जोडणाऱ्या ५४८ बी या महामार्गावर बर्दापूरच्या पुढे येताच चार पदरी रस्त्याचे अचानक दोन पदरीत रूपांतर होते. या ठिकाणी येणाऱ्या वाहनांच्या गतीचा अचानक अडथळा होत असल्यामुळे याठिकाणी वारंवार गंभीर अपघात घडत आले आहेत. अनेक निष्पाप नागरिकांचे जीव या अपुऱ्या आणि असुरक्षित रस्त्यामुळे गेले आहेत. त्यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात होती. माजी खासदार प्रीतमताई मुंडे आणि अंबाजोगाईच्या आमदार नमिता मु...

केज येथे विविध समस्या साठी नागरिकाचे रास्ता रोको आंदोलन संपन्न

इमेज
केज येथे विविध समस्या   साठी नागरिकाचे रास्ता रोको आंदोलन संपन्न  केज   झोपडपट्टी हक्क संघर्ष समिती,क्रांती नगर, कानडी रोड, केजच्या विविध प्रश्न व समस्या करिता शुक्रवार दिनांक 20 जुन 2025 रोजी सकाळी 11-00वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बाबुराव गालफाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व लक्ष्मण जाधव भाऊ माजी नगर सेवक, तसेच युवा नेते,योगेश भाऊ गायकवाड,नागनाथ जावळे,ईरफान पठाण, सय्यद आखिल, बालासाहेब पवार,प्रेम गायकवाड, महादेव लांडगे,अरविंद चाळक, भीमराव हजारे, अच्युतराव मस्के,गंपू मस्के,समाधान मस्के, रणजित मस्के तसेच क्रांतीनगर येथील सर्व महिला,नागरिक,युवा कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.या रस्ता रोको आंदोलना करीता नगर पंचायत केजचे कर्तव्यदक्ष नगर पंचायत मुख्याधिकारी, तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्य्क अभियंता तसेच पोलीस स्टेशन केजचे अहंकारे साहेब व कागदे साहेब यावेळी हजर होते.

डॉ.लक्ष्मण वाघमारे यांना डॉक्टर पदवी प्रधान.

इमेज
डॉ .लक्ष्मण वाघमारे यांना डॉक्टर पदवी प्रधान.  केज  समाजसेवा, शिक्षण, सामाजिक न्याय आणि मानवतावादी विचारांद्वारे आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि श्रमिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय डॉ. लक्ष्मण मरीबा वाघमारे यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या Cedarbrook University, USA या विद्यापीठाकडून Doctor of Philosophy (Honorary Doctorate) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या मानद पदवीमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा गौरव केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण समाजाचा, कुटुंबाचा आणि महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा सन्मान असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. ही पदवी म्हणजे डॉ. वाघमारे यांच्या दीर्घकालीन सातत्यपूर्ण कार्याची, प्रामाणिकपणाची, सामाजिक बांधिलकीची आणि शिक्षण व ज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानाची जगभरातून घेतलेली पावती आहे. डॉ. वाघमारे यांनी या पदवीसह घेतलेली शपथही अत्यंत प्रेरणादायक ठरली. “प्रामाणिकपणा, कष्ट, सुसंवेदनशीलता, सामाजिक न्याय आणि माणुसकी” या मूल्यांचा अंगीकार करत त्यांनी आपले संपूर्...

चाईल्ड प्रायमरी स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा

इमेज
चाईल्ड प्रायमरी स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा. केज  चाईल्ड प्रायमरी स्कूलमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या उपस्थितीत विविध योग क्रियांच्या माध्यमातून शरीर आणि मनाच्या आरोग्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक शिक्षकांच्या नेतृत्वाखाली ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, प्राणायाम, अनुलोम-विलोम, कपालभाती यांसारख्या विविध योगासने सादर केली. लहान मुलांनीही उत्साहाने सहभागी होत योग्य पद्धतीने आसने केली, ज्यामुळे उपस्थित सर्वांना प्रेरणा मिळाली. मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आभार मानत सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी लहान वयातच आरोग्याविषयी जागरूक होतात आणि हीच खरी शाळेची गरज आहे. कटारेवस्ती येथे योगा दिन उत्साहात साजरा येवता:  दि२१- जून -२०२५ रोजी केज तालुक्यातील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  कटारेवस्ती येथे आज दिनांक 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारची योगासने आणि प्राणायाम यांची सविस्तर माहिती देऊन हनुमंत कटारे व...

केज पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांचे पत्रकार संघ केज यांच्या वतीने स्वागत

इमेज
केज पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांचे पत्रकार  संघ केज यांच्या वतीने स्वागत  केज केज पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा केजचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील ,उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, सचिव विजय बिक्कड,प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग कसबे कार्याध्यक्ष नंदकुमार मिसाळ, विश्वास राऊत उपस्थित होते.यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक श्री.स्वप्नील उनवणे यांनी सांगितले की,केज पोलीस स्टेशन च्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्या साठी वरिष्ठ अधिकारी साहेब यांनी आपली नियुक्ती केली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणाची ही गय केली जाणार नाही.खाकी हाच आपला धर्म असुन कोणावरही अन्याय होणार नाही.पोलीस स्टेशनला आलेल्या प्रत्येक पिडीत व्यक्तीची तक्रार घेतली जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आता सर्व माहिती घेत असुन सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.केज शहरा तील गु...

बनसारोळायेथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न, जिल्हाधिकारी श्री. विवेक जाॅन्सन यांची उपस्थिती.

इमेज
बनसारोळायेथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न, जिल्हाधिकारी श्री. विवेक जाॅन्सन यांची उपस्थिती.  केज दिनांक १८ जून २०२५ रोजी तहसील कार्यालय केज मार्फत जनविकास महाविद्यालय बनसारोळायेथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. अखंड हिंदुस्तानचे भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे बीड जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांच्या हस्ते पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले,सोबत अप्पर जिल्हाधिकारी अंबेजोगाई श्रीमती अश्विनी सोनवणे, उप विभागीय अधिकारी अंबेजोगाई दिपक वजाळे,केज तहसील दार राकेश गिड्डे,केज पंचायत समितीच्या गट विकासअधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे, तहसीलचे मंडळ अधिकारी लक्ष्मण ढाकणे,तलाठी श्रीमती आम्रपाली वाघमारे या उपस्थित होत्या.  जिल्हाधिकारी,अप्पर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांचे गावात स्वागत करण्यात आले.नंतर जनविकास महा विद्यालय येथे जिल्हाधिकारी यांना जनता दरबारामध्ये गावच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन दिले,त्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी विवेक जाॕन्सन यांनी उपस्थित ना...

मराठवाडा साहित्य परिषदेच्या केज शाखेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.नवनाथ काशिद उपाध्यक्षपदी डॉ.कविता कराड,तर सचिवपदी राहुल गदळे यांची बिनविरोध निवड.

इमेज
मराठवाडा साहित्य परिषदेच्या केज शाखेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.नवनाथ काशिद  उपाध्यक्षपदी डॉ.कविता कराड,तर सचिवपदी राहुल गदळे यांची बिनविरोध निवड. केज  मराठवाडा साहित्य परिषदेच्या केज शाखेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.नवनाथ काशिद यांची तर सचिवपदी प्राचार्य राहुल गदळे, उपाध्यक्षपदीडॉ.कविता कराड,कोषाध्यक्ष पदी  डॉ.बी.जे.हिरवे, कार्याध्यक्षपदी मेजर अजिमोद्दीन इनामदार, सहसचिव म्हणून विक्रम डोईफोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या बिनविरोध कार्य कारणी निवडीबद्दल मसाप शाखेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.दरम्यान बाबुराव जी आडसकर महा विद्यालयातील चार जणांची या कार्यकारणी  मध्ये निवड झाली आहे. साहित्यपरिषदेच्या केज शाखेतील मराठवाडा साहित्य परिषद आजीव सदस्य यांची स्थानिक कार्यकारिणी निवडी साठीची बैठक दि.15 जून 2025 रोजी सायंकाळी 5-00 वाजता केज येथील शासकीय विश्रामगृहात छत्रपती संभाजीनगर येथील मसापचे केंद्रीय कार्यकारणीसदस्य तथा निरीक्षक दगडू लोमटे  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नूतन पदाधिकारी यांची निवड खालील प्रमाणे करण्यात आली.केज शाखा अध्यक्ष प्र...

प्रदिप गायकवाड पत्रकारिता क्षेत्रातील मास्टर ऑफ जर्नलिझम परीक्षा उत्तीर्ण.

इमेज
प्रदिप गायकवाड पत्रकारिता क्षेत्रातील मास्टर ऑफ जर्नलिझम परीक्षा उत्तीर्ण. केज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,केज तालुका उपाध्यक्ष प्रदिप काशिनाथ गायकवाड यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठत  “Master of Journalism” (एम जे) ही पदव्युत्तर पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.त्यांनी आपले शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) संलग्न वसंतराव काळे पत्रकारिता व संगणक महाविद्यालय, बीड येथून पूर्ण करून परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रदिप काशिनाथ गायकवाड यांनी शिक्षणाच्या काळात आधुनिक पत्रकारिता,मिडिया रिसर्च,न्यूज रिपोर्टिंग,संपादन तसेच डिजिटल मिडिया या विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे. तसेच,त्यांनी शैक्षणिक प्रबंध व प्रात्यक्षिक कामगिरीद्वारे आपली क्षमता सिद्ध केली आहे.त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय,शिक्षक, मित्रवर्ग आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरां कडून अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,केज तालुकाध्यक्ष,चंद्रकांत पाटील सचिव,विजय बिक्कड,आप्पाराव सारूक,नंदुलाल मिसाळ,पांडुरंग कसबे, विश्वास राऊत,स्वानंद बिक्...

छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय पत्रकार भवन बांधण्यासाठी शासन जागा उपलब्ध करुन देणार - सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट.

इमेज
छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय पत्रकार भवन बांधण्यासाठी शासन जागा उपलब्ध करुन देणार - सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट.   भारतीय माध्यम क्षेत्र अधिक सक्षम झाले पाहिजे - मंत्री अतुल सावे राज्यकर्ते आणि प्रसार माध्यम यांचे संबंध आंबटगोड असले तरच लोकशाही टिकून राहील - राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे  पत्रकार संघटना ही पत्रकारांना आधार देण्यासाठीच - प्रदेश संघटक संजय भोकरे पत्रकार संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन ऐतिहासिक झाल्याने मराठवाड्यातील पत्रकारांना मिळाली नवसंजीवनी  परिसंवादातून दिग्गज वक्तव्यांनी मांडली परखड मते,विभागीय अधिवेशनाला राज्यभरा तील पत्रकारांची उपस्थिती ! छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचे विभागीय केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे ज्या प्रकारे सर्व शासकिय कार्यालये आहेत.त्याच पध्दतीचे एक विभागीय पत्रकार भवन बांधण्या साठी शासन जागा उपलब्ध करुन देईल आणि ते बांधून देण्या साठी आम्ही प्रयत्न करू असे आश्‍वासन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईच्या मराठवाडा विभागाच्या वतीने संत एकनाथ रंग...