आनंद व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी नशा व व्यसनाधीनते पासून दूर रहावे - डॉ. वसुदेवबप्पा गायकवाड

आनंद व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी नशा व व्यसनाधीनते पासून दूर रहावे - डॉ. वसुदेवबप्पा गायकवाड.



केज


आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण,आनंदगांव ता. केज.जि.बीडच्या केज येथील संपर्क कार्यालयात आयोजित नशा व व्यसनाधीनता शरीराला व आरोग्याला घातक या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे संस्थापक कार्यवाह,जेष्ठविचारवंत, जेष्ठ समाजसेवक डॉ. वसुदेवबप्पा गायकवाड बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की,आरोग्यदायी व आनंददायी जीवन जगण्यासाठी  शारीरीक, मानसीक, सामाजिक, आर्थिक हानी व नामुष्की टाळण्यासाठी व्यसनापासून व नशा मुक्त आयुष्य प्रत्येकाने जगावे असे आवाहन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.

यावेळी संजय सोनवणे, आनंदभैय्या गायकवाड, एस.एस.शिनगारे,पी.एस.शिनगारे, आशालता येळवे यांनी ही मार्गदर्शन केले.दि.२१ जुन २०२५ रोजी  जागतीक योगदिन साजरा करून योग करण्याचे फायदे सांगीतले.दि.५ जुन २०२५ रोजी जागतिक पर्यावरणदिनकार्यशाळा घेवून साजरा करण्यात आला.पर्यावरणाचे महत्व, पर्यावरणसंवर्धनाची आवश्यकता, मानवी जीवनासाठी व सर्वच जिवजंतूच्या अस्तित्वा साठी पर्यावरण जपणे कसे आवशयक आहे हे सांगून अन्नसाखळी जपण्यासाठी व भविष्यातजीवनावश्यक अशा प्राणवायूची पर्यायाने ऑक्सीजनची अडचण येवू नये म्हणून पर्यावरणाचे जतन व संवर्धन करावे असे आवाहनही आनंदभैय्या गायकवाड यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा