बनसारोळायेथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न, जिल्हाधिकारी श्री. विवेक जाॅन्सन यांची उपस्थिती.

बनसारोळायेथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न, जिल्हाधिकारी श्री. विवेक जाॅन्सन यांची उपस्थिती. 









केज


दिनांक १८ जून २०२५ रोजी तहसील कार्यालय केज मार्फत जनविकास महाविद्यालय बनसारोळायेथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

अखंड हिंदुस्तानचे भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे बीड जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांच्या हस्ते पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले,सोबत अप्पर जिल्हाधिकारी अंबेजोगाई श्रीमती अश्विनी सोनवणे, उप विभागीय अधिकारी अंबेजोगाई दिपक वजाळे,केज तहसील दार राकेश गिड्डे,केज पंचायत समितीच्या गट विकासअधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे, तहसीलचे मंडळ अधिकारी लक्ष्मण ढाकणे,तलाठी श्रीमती आम्रपाली वाघमारे या उपस्थित होत्या. 

जिल्हाधिकारी,अप्पर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांचे गावात स्वागत करण्यात आले.नंतर जनविकास महा विद्यालय येथे जिल्हाधिकारी यांना जनता दरबारामध्ये गावच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन दिले,त्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी विवेक जाॕन्सन यांनी उपस्थित नागरिकांचे जनता दरबारामध्ये प्रश्न मार्गी लावले.विविध विभागा च्या लावलेल्या बूथ वर  

त्यांनी सखोल चौकशी केली,त्यांच्या सोबत सरपंचांनी ही प्रत्येक खात्याची माहिती घेतली.लाभार्थ्यांना सन्मानपत्र देऊनसत्कार करण्यात आला.जन विकास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे यांनी जिल्हाधिकारी यांचा सत्कार केला. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी यांचा  सत्कार करण्यात आला  

यावेळी उपसरपंच श्रीमती नीलावती धायगुडे,सदस्या श्रीमती शारदा वाघमारे,श्रीमती दैवशाला काकडे,सदस्य श्री सतीश गोरे,ग्राम विस्तार अधिकारी संजय देशमुख आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विवेक जाॕन्सन यांनी सर्व नागरिकांना प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देउन उपस्थितांना मार्गदर्शन केले.तसेच बाल विवाह विरोधी शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा