शासकीय आयटीआय कॉलेज धारूर येथे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एन.एस.इ.)मार्फतएक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न

शासकीय आयटीआय कॉलेज धारूर येथे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एन.एस.इ.)मार्फतएक दिवसीय स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम संपन्न.



धारुर 


दिनांक 25 जून 2025 रोजी शासकीय आय टी आय कॉलेज धारूर येथे भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड अर्थात (सेबी) तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एन एस इ) च्या माध्यमातून आय टी आय च्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवशीय स्मार्ट निवेक्षक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजचे प्राचार्य विजय बेलेकर सर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले.  

कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून(सेबी) तसेच एन एस इ चे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर गणेश चौधरी सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले.यात त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या विविध योजना,तसेच पोस्ट ऑफिस मधील असलेल्या विविध योजना,डिमॅट अकाउंट, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड व इतर शासकीय योजनांचे मार्गदर्शन केले.

 तसेच गुंतवणूक करत असताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी ? व फसवणूक करणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या.या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन व्यवस्थित रित्या पार पडण्यास घोलक एस. व्ही,काळुंके के.जी, शेख जे.यु,शेख फाजी आदि सरांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन तथा आभार पी.एस.मुळे सर यांनी केले.या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई