कोठी येथील शेतकऱ्याचे सोलार अज्ञात व्यक्तीने फोडले, केज पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद.
कोठी येथील शेतकऱ्याचे सोलार अज्ञात व्यक्तीने फोडले, केज पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद.
केज
केज तालुक्यातील कोठी गावचे अशोक देविदास मुळे यांच्या म्हसोबा फड नावाच्या शिवारातील शेतात अज्ञात मातेफिरुने जी.के कंपनीची एक सोलर प्लेट फोडली असून संबंधित व्यक्ती विरोधात केज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अशोक देविदास मुळे वय 55 वर्ष व्यावसाय शेती, हे दि.10 जुन 2025 रोजी सकाळी 9:00 वाजता च्या दरम्यान म्हसोबाचा फड शेतात गेले असता, शेतातील जी.के नावाचे कंपनी सोलर पॅनल मधील एक प्लेट फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले.त्यांच्या सोलर प्लेटचे नुकसान झाल्यामुळे त्यांनी याची माहिती केज पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली आहे. केज पोलिसांनी संबंधित अज्ञात व्यक्ती विरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास केज पोलीस स्टेशनचे पीआय स्वप्निल ऊनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा