मराठवाडा साहित्य परिषदेच्या केज शाखेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.नवनाथ काशिद उपाध्यक्षपदी डॉ.कविता कराड,तर सचिवपदी राहुल गदळे यांची बिनविरोध निवड.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या केज शाखेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.नवनाथ काशिद  उपाध्यक्षपदी डॉ.कविता कराड,तर सचिवपदी राहुल गदळे यांची बिनविरोध निवड.










केज 


मराठवाडा साहित्य परिषदेच्या केज शाखेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.नवनाथ काशिद यांची तर सचिवपदी प्राचार्य राहुल गदळे, उपाध्यक्षपदीडॉ.कविता कराड,कोषाध्यक्ष पदी  डॉ.बी.जे.हिरवे, कार्याध्यक्षपदी मेजर अजिमोद्दीन इनामदार, सहसचिव म्हणून विक्रम डोईफोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या बिनविरोध कार्य कारणी निवडीबद्दल मसाप शाखेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.दरम्यान बाबुराव जी आडसकर महा विद्यालयातील चार जणांची या कार्यकारणी  मध्ये निवड झाली आहे. साहित्यपरिषदेच्या केज शाखेतील मराठवाडा साहित्य परिषद आजीव सदस्य यांची स्थानिक कार्यकारिणी निवडी साठीची बैठक दि.15 जून 2025 रोजी सायंकाळी 5-00 वाजता केज येथील शासकीय विश्रामगृहात छत्रपती संभाजीनगर येथील मसापचे केंद्रीय कार्यकारणीसदस्य तथा निरीक्षक दगडू लोमटे  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

नूतन पदाधिकारी यांची निवड खालील प्रमाणे करण्यात आली.केज शाखा अध्यक्ष प्रा. नवनाथ काशिद, उपाध्यक्ष डॉ.कविता कराड,कार्याध्यक्ष अजिमोद्दीन इनामदार तर सचिवपदी राहुल गदळे,सहसचिव म्हणून विक्रम डोईफोडे, कोषाध्यक्षपदी प्रा.बाबासाहेब हिरवे यांची कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य निवडण्यात आले. यामध्ये अनिल गव्हाणे, बाळासाहेब लोखंडे, डॉ.सुनील राऊत, डॉ.छत्रभुज सोळंके, डॉ.हनुमंत सौदागर तर मार्गदर्शक म्हणून प्रा.ईश्वर मुंडे,जी.बी. गदळे गुरुजी व निमंत्रितामध्ये माजी शाखा अध्यक्ष श्रावणकुमार जाधव,  प्रा.हनुमंत भोसले यांच्यासह सर्व माजी अध्यक्ष या प्रमाणे  वरील पदाधिकारी एकमताने निवडण्यात आले.या सर्व नुतन  पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष ईश्वर मुंडे,जी.बी.गदळे यांनी शुभेच्छा दिल्या तर आभार प्रदर्शन भागवत सोनवणे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा