चाईल्ड प्रायमरी स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा

चाईल्ड प्रायमरी स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा.





केज 

चाईल्ड प्रायमरी स्कूलमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या उपस्थितीत विविध योग क्रियांच्या माध्यमातून शरीर आणि मनाच्या आरोग्याचा संदेश देण्यात आला.

विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक शिक्षकांच्या नेतृत्वाखाली ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, प्राणायाम, अनुलोम-विलोम, कपालभाती यांसारख्या विविध योगासने सादर केली. लहान मुलांनीही उत्साहाने सहभागी होत योग्य पद्धतीने आसने केली, ज्यामुळे उपस्थित सर्वांना प्रेरणा मिळाली.

मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आभार मानत सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी लहान वयातच आरोग्याविषयी जागरूक होतात आणि हीच खरी शाळेची गरज आहे.



कटारेवस्ती येथे योगा दिन उत्साहात साजरा

येवता:

 दि२१- जून -२०२५ रोजी केज तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कटारेवस्ती येथे आज दिनांक 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारची योगासने आणि प्राणायाम यांची सविस्तर माहिती देऊन हनुमंत कटारे व लोकरे सर यांनी सहभाग घेऊन योगा दिन साजरा करण्यात आला.



राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत जागतिक योग दिन साजरा.

केज 

दिनांक 21 जून 2025 रोजी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्यासाठी योगाचे महत्व समजावून देण्या साठी स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज च्या राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत योगाभ्यास घेण्यात आला.यावेळी शाळेच्यामुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी. यांची प्रमुख उपस्थिती होती तर मार्गदर्शक म्हणून शाळेचे माजी शिक्षक श्री.एस.ए. डापकर यांची उपस्थिती होती.यावेळी एस.ए. डापकर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की,योगामुळे आपण निरोगी व दीर्घायुष्य जगू शकतो. आपल्या शरीर व मनाचे आरोग्य चांगले ठेवण्या साठी योग करणे खूप गरजेचे आहे.त्यामुळेच सर्व जगभर योगाचे महत्व अधोरेखित होत आहे.यावेळी विविध योगासने करण्यात आली.यावेळी विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा