प्रदिप गायकवाड पत्रकारिता क्षेत्रातील मास्टर ऑफ जर्नलिझम परीक्षा उत्तीर्ण.
प्रदिप गायकवाड पत्रकारिता क्षेत्रातील मास्टर ऑफ जर्नलिझम परीक्षा उत्तीर्ण.
केज
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,केज तालुका उपाध्यक्ष प्रदिप काशिनाथ गायकवाड यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठत “Master of Journalism” (एम जे) ही पदव्युत्तर पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.त्यांनी आपले शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) संलग्न वसंतराव काळे पत्रकारिता व संगणक महाविद्यालय, बीड येथून पूर्ण करून परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
प्रदिप काशिनाथ गायकवाड यांनी शिक्षणाच्या काळात आधुनिक पत्रकारिता,मिडिया रिसर्च,न्यूज रिपोर्टिंग,संपादन तसेच डिजिटल मिडिया या विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे. तसेच,त्यांनी शैक्षणिक प्रबंध व प्रात्यक्षिक कामगिरीद्वारे आपली क्षमता सिद्ध केली आहे.त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय,शिक्षक, मित्रवर्ग आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरां कडून अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,केज तालुकाध्यक्ष,चंद्रकांत पाटील सचिव,विजय बिक्कड,आप्पाराव सारूक,नंदुलाल मिसाळ,पांडुरंग कसबे, विश्वास राऊत,स्वानंद बिक्कड,अॕड.सतीश मस्के यांनी कौतुक केले असुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भविष्यात प्रभावी पत्रकार म्हणून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचा आणि सकारात्मक बदल घडवण्याचा त्यांचा मानस आहे असे प्रदिप गायकवाड यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा