छत्रपती राजर्षी शाहू महाराज कर्ते सुधारक आणि समाज उद्धारक होते - डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड
छत्रपती राजर्षी शाहू महाराज कर्ते सुधारक आणि समाज उद्धारक होते - डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड
केज
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज.जि.बीड येथे २६ जुन २०२५ रोजी लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व्याख्यान कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.प्रमुख व्याख्याते म्हणून दादासाहेब गायकवाड यांचे छोटेखानी व्याख्यान संपन्न झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब जाधव, रामराजे गायकवाड, राजाभाऊ बोडके, बाबासाहेब शिंदे यांची उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, ख्यातनाम वक्ते,परखड व्याख्याते डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे कर्ते समाजसुधारक व समाज उध्दारक होते असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोप करताना डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.सर्वप्रथम छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा