शारदा इंग्लिश स्कूल केज शाळेचे अल्पकाळात 60 पेक्षा जास्त मुले एमबीबीएस साठी पात्र, कमी कालावधीतील हे विक्रमी यश -- रमेशराव आडसकर
शारदा इंग्लिश स्कूल केज शाळेचे अल्पकाळात 60 पेक्षा जास्त मुले एमबीबीएस साठी पात्र, कमी कालावधीतील हे विक्रमी यश -- रमेशराव आडसकर.
नीट,जेईई-2025 साठी पात्र झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले मत.
केज
इंग्लिश स्कूल केज या शाळेचे नीट 2025 परीक्षेत एमबीबीएस या अत्युच्च अभ्यासक्रमासाठी पात्र ठरलेल्या तसेच जेईई मध्ये उत्कृष्ट गुण घेणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव मा रमेशरावजी आडसकर यांच्या हस्ते आज करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्याबरोबर आई वडील, नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये NEET-2025 मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने प्रत्यूष ठोंबरे 570(AIR 5546),आर्यन शिंदे 533, मुंडे अभिजीत 518, देवयानी थोरात 499,तरJEE-MHCET मध्ये अदिती शिनगारे 98%, यश डुबे 95 %, टोणगे अनिकेत 95 %,संयुक्ता वडगावकर 92 %, श्रेयस पाटील 95%, अल्फिया शेख 90% या विद्यार्थ्यांचा समावेश आहे
याप्रसंगी आपले विचार मांडताना रमेशराव आडसकर यांनी सांगितले की शारदा इंग्लिश स्कूल या शाळेची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली. प्रथम वर्गापासून सुरू करण्यात आली. शाळने आपले नावाचा शैक्षणिक वर्तुळात एक वेगळा पॅटर्न निर्माण केला. नंतरच्या काळामध्ये दहावीचा वर्ग सुरू झाल्यानंतर केवळ आठ बॅचेस बाहेर पडलेले असताना इतक्या कमी कालावधीमध्ये केवळ एमबीबीएस सारख्या एका अभ्यासक्रमास 60 पेक्षा जास्त मुलांची निवड होणे म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार खुले करून देणे आहे असे म्हणता येईल असे सांगताना काही कालावधी पूर्वी डॉक्टर होण्याचे प्रमाण परिसरामध्ये अत्यल्प होते, परंतु शारदा इंग्लिश स्कूल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक वेगळा उच्चांक स्थापन केला असल्याचे सांगितले.
याचबरोबर जेईई परीक्षा असो सीईटी परीक्षा असो शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी अत्यंत मेहनतीने प्रतिष्ठित अशा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये किंवा इतर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवून यश संपादन केले आहे. इतकेच नव्हे तर शाळा स्थापनेनंतरच्या इतक्या कमी काळामध्ये शाळेचे विद्यार्थी आज देश विदेशात शहराचे तालुक्याचे नाव मोठे करत आहेत. असे मत त्यांनी मांडले.
याचबरोबर सर्व सर्व डॉक्टर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ततेनंतर गोरगरीब जनतेची सेवा करावी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी नवनवीन शोध लावावेत व परिसराचे आई-वडिलांचे नाव मोठे करावे किंबहुना हे करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी पालकातर्फे श्री फुलचंद ठोंबरे यांनी आपले विचार मांडताना शाळेने लावलेल्या शिस्तीमुळे, अध्यापनामुळे हे प्रचंड यश विद्यार्थ्यांना मिळाले असे सांगताना आडसकर परिवाराने सर्वच क्षेत्रांमध्ये जनतेची सेवा केली त्याचप्रमाणे शारदा इंग्लिश स्कूल केज या शाळेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये शाळेच्या माध्यमातून क्रांती केली असे विचार मांडले व शाळेचे आभार व्यक्त केले.
यावेळी रणजीत आडसकर,शाळेचे प्राचार्य मिश्रा एस एम, उपप्राचार्य सुरज सनी,देशमुख पी एम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सूत्रसंचालन श्री शेटे प्रदीप यांनी केले, नियोजन व व्यवस्थापन व्यवस्थापनाचे काम ऋषिकेश ढगे यांनी पाहिले, तर आभार प्रदर्शन श्री बाबर सर यांनी केले.याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर व उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा