मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांसंबंधी खा.सौ. रजनीताई पाटील यांनी मांडले अभ्यासपूर्ण विवेचन.
मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांसंबंधी खा.सौ. रजनीताई पाटील यांनी मांडले अभ्यासपूर्ण विवेचन.
केज
पुणे येथील रेल्वे समिती च्या बैठकीत मराठवाड्यातील विविध रेल्वेमार्गाच्या प्रश्नावर खा.सौ.रजनीताई पाटील यांनी प्रश्न मांडले
घाटनांदूर-अंबाजोगाई-केज-नेकनूर- मांजरसुंभा-पाटोदा- आष्टी-जामखेड-कर्जत-श्रीगोंदा(दौंड) रेल्वे मार्ग (संरक्षण मंजूरसर्वेक्षण)
सोलापूर- तुळजापूर- धाराशिव - लातूर - अंबाजोगाई-परळी - सोनपेठ-पाथरी- मानवत-पाचलेगाव- जिंतूर-औंढा नागनाथ - नरसी - हिंगोली मार्ग, परळी,लातूर रेल्वे स्थानकावरून योग्य रेल्वे मार्ग जोडून व्यावसायिक आणि पर्यटन क्रियाकलाप वाढविण्यासाठी मराठवाडा मागास प्रदेशाला विदर्भ आणि उत्तरभारताशी म्हणजेच दिल्ली,राजस्थान, पंजाब,हरियाणा,जम्मू आणि काश्मीर, मध्यप्रदेश इत्यादींशी जोडणे.विकाराबाद- बिदर-लातूर-कुर्डुवाडी हा मार्ग/ट्रॅक गेल्या दहा वर्षांपासून सुरू झाला आहे,अजूनही खूपकमी प्रवासी गाड्या आहेत. या मार्गाचा वापर नवीन गाड्यांसाठी केला जाऊ शकतो ज्या विशाखापट्टणम, विजयवाडा,हैदराबाद ते मुंबई/पुणे दरम्यानधावू शकतात.आदी विषय मांडले.लवकरच नवीन रेल्वे मार्ग मंजूर होतील असे महाप्रबंधक यांनी सांगितले.यावेळी सोलापूर,पुणे, मराठवाडा भागातील मराठवाड्यातील खासदार यांची उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा