बीड जिल्ह्यातील तीन आंबेडकरवादी योद्ध्यांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान
बीड जिल्ह्यातील तीन आंबेडकरवादी योद्ध्यांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान.
केज
अण्णाभाऊ साठे पिपल्स फोर्सचे संस्थापक अध्यक्ष बा.रा.वाघमारे सर यांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीत योगदानाबद्दल महाराष्ट्रा तील ५० मान्यवरांना दि.२६ जून २०२५रोजी पुरस्कृत करण्यात आले.आंबेडकरवादी योद्ध्यांचा सत्कारआणि भव्य पुरस्कार वितरण सोहळा रुबी हॉटेल नवीन नांदेड सिडको येथे पार पडला.अनेक नामवंत मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार सन्मान पूर्वक देण्यात आला.
बीड येथील आझाद क्रांती सेनेचे सेना प्रमुख राजेश घोडे यांनात्यांच्या आंबेडकरवादी चळवळी बद्दल हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्रामध्ये खरी आंबेडकरी चळवळ चालवणारा ध्येयवेढा तरुण म्हणून ते परिचित आहेत.आंबेडकरवादी चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तरुणांची एक वेगळीच सेना तयार केलेली आहे.या सेनेच्या माध्यमातून मागास,वंचित,अन्याय अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी वेगाने तत्पर असतात. त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान नांदेड येथील अण्णाभाऊसाठे पीपल्स फोर्सच्या माध्यमातून करण्यात आला.खऱ्या आंबेडकरवादी योद्धाचा सत्कार झाला अशी चर्चा आज महाराष्ट्रातून उमटतआहे.त्याचप्रमाणे बीड येथील दुसरे सामाजिक कार्यकर्ते बाबूराव केशवराव गालफाडे सर यांनाही छत्रपती राजश्री शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार देण्यात आला.
बाबुराव गालफाडे सर सध्या केज येथे वास्तव्यास असून दलितांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात.त्यांच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. समाजातील यशवंताचा प्रोत्साहनपर सत्कार असो,की एखाद्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदतकरण्याचे कार्य असो,प्रत्येक ठिकाणी त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. समाजातील अनेक संघटनांचे व पक्षांचे ते सल्लागार म्हणून काम करतात.अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या माध्यमातून छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार देऊन त्यांचाहीयथोचित सन्मान करण्यात आला
पुरस्काराचे बीडचे तिसरे मानकरी डॉ. लक्ष्मण वाघमारे यांनाही हा पुरस्कार देण्यात आला.समाजसेवा, शिक्षण,सामाजिकन्याय आणि मानवतावादी विचारांद्वारे आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे महाराष्ट्रा तील ज्येष्ठ नेते आणि श्रमिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. लक्ष्मण मरीबा वाघमारे यांना हा गौरव केवळ एका व्यक्तीचा नव्हे,तर संपूर्ण समाजाचा, कुटुंबाचा आणि महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा सन्मान असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. हा सन्मान म्हणजे डॉ. वाघमारे यांच्या दीर्घ कालीन सातत्यपूर्ण कार्याचा प्रामाणिक पणाचा,सामाजिक बांधिलकीचा आणि शिक्षण व ज्ञान क्षेत्रा तील भरीव योगदानाचा सन्मान होय.या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पॅंथर चळवळीचे नेते रमेशभाई खंडागळे, उद्घाटक म्हणून सामाजिक बांधिलकीचे जाणकार बालाजी नवघरे शिरसिकर, स्वागत अध्यक्ष म्हणून भीम कायदा संघटना जिल्हाध्यक्ष विलास दादा गजभरे,कार्याध्यक्ष म्हणून अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स चे संस्थापक अध्यक्ष बा.रा.वाघमारे सर यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला.
अण्णाभाऊ साठे पिपल्स फोर्सचे संस्थापक बा.रा. वाघमारे मातंग समाजा तील एक अभ्यासू व त्यागी नेते आहेत. कांशीराम यांचे कार्य ते पुढे नेत आहेत.मातंग समाजासह सर्व बहुजन बांधवांना संघटित करण्यासाठी तेअहोरात्र कष्ट घेत आहेत.नवीन नांदेड सिडको येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विदर्भ आणि मराठवाड्यातील काही निवडक बुद्धिजीवी व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना छत्रपती राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी अण्णाभाऊ साठे पिपल्स फोर्सचे संस्थापक अध्यक्ष बा.रा वाघमारे यांनी जी काही भूमिका आपल्या भाषणातून मांडलेली भूमिका निश्चित समाधानकारक व सर्वांच्या हिताची होती, म्हणून समाज बांधवांनी बा.रा वाघमारे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे मत प्रतिक्रिया देताना आरंभ वृत्तपत्राचे प्रतिनिधी पी.डी.कसबे यांनी व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा