रोहन गलांडे यांच्या अमरण उपोषणाला यश आले ! सप्ताह कमीटी व नामदेव महाराज भक्तांचे मानले आभार !
रोहन गलांडे यांच्या अमरण उपोषणाला यश आले ! सप्ताह कमीटी व नामदेव महाराज भक्तांचे मानले आभार !
केज
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे ७ जुन ते १६ जुन पर्यंत रोहन दादा गलांडे पाटील यांनी विविध मागण्या साठी अमरण उपोषण केले होते. मागण्या अशा होत्या की नागबेट वस्ती ते श्री संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्र अतिक्रमण हटवा तर ८० टक्के अतिक्रमण हटविण्यात आले आहे. राहीले आहे ते ग्रामपंचायत हद्दीतील ते सुद्धा ७ सात दिवसांत हटविण्यात येईल.
तसेच काही क्षनीक सुखा साठी दोन चार बांधकामावर स्टे आला आहे. ते सुद्धा पावसाळा संपला की हटविण्यात येईल असे जिल्हा परिषद बांधकाम यांनी लेखी दिले आहे. महाराष्ट्रतील शेतकरी कर्जमाफी, बँक खात्यावरील होल्ड काढणे, पिकांना हमीभावासाठी कायदा, व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत या विषयावर कलेक्टर यांच्या सोबत रोहन गलांडे यांचे बोलने झाले असून या मागणीसाठी सरकार कडे मागणी केली आहे असे कलेक्टर विवेक जॅक्सन यांनी म्हटले आहे चिंचोली माळी बाजार स्थळ घरे असल्याने पावसाळा संपला की हटविण्यात येईल असे ग्रामपंचायतने लेखी पत्र दिले,श्री संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्र परीसरातील सर्व अतिक्रमण हटवा या मागणीसाठी दोन दिवसांत हटविण्यासाठी सचरवात होईल ,चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम तात्काळ सुरू करा या मागणीसाठी काही कालावधी लागनार आहे कारण शासना कडे निधी उपलब्ध नाही ,पाधन रस्ता ५१,५२,५३, ची काॅलीटी कंट्रोल मार्फत चौकशी करण्यासाठी कार्यालयाला कळविण्यात आले आहे. तरी चौकशी होईपर्यंत बिल अदा करण्यात येणार नाही असे लेखी पत्र दिले आहे व तसेच काळ्याचा मळा येथील बंधाऱ्यांची चौकशी होईपर्यंत बिल अदा करण्यात येणार नाही असे लेखी पत्र देण्यात आले आहे तरी अशा प्रकारे रोहन गलांडे पाटील यांच्या अमरण उपोषणाला यश आले आहे आहे असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे तसेच प्रशासनाच्या वतीने आमरण उपोषण मागे घेतले यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे, तहसीलदार गिट्टे साहेब ,बंडु गव्हाणे, डिप्टीइंजिअर मिसाळ साहेब सप्ताह कमीटीचे आध्यक्ष विजय माने, संजय महाराज नखाते, विजय गायकवाड ,लक्षीमन तात्या गलांडे, गौतम बापु गलांडे, आकाश नखाते, अनिल गलांडे, विजय गलांडे, महादेव गलांडे,राहुल नखाते,सह सर्व गाडेओढनारी भक्त व सर्व श्री संत नामदेव महाराज भक्त, गावकरी उपस्थित होते .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा