केज शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गायब ? शेतकरी बांधवांना अडी अडचणी सोडविण्यासाठी कोठे जायचे पडला प्रश्न !

केज शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गायब ? शेतकरी बांधवांना अडी अडचणी सोडविण्यासाठी कोठे जायचे पडला प्रश्न !


केज


केज शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले तालुका कृषी अधिकारी कार्यालय अचानक कोणतीही पुर्व सुचना न देता गायब झाले असून शेतकऱ्यांना आपल्या अडी अडचणी सोडविण्या साठी कोठे जायचे असा यक्ष प्रश्न पडला आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कृषी कार्यालय केज येथे एसटी डेपो जवळ कार्यान्वित होते.परंतु सदरील जागेवर आता कृषी विभाग कार्यालय नसुन कुठलीही पुर्व सुचना न देता हे तालुका कृषी अधिकारी कार्यालय केज येथुन गायब झाले आहे.या बाबत चौकशी केली असता हे तालुका कृषी कार्यालय हे गावाच्या बाहेर बीड रोडवर दुसऱ्या मजल्यावर स्थीत असल्याचे दिसून आले.आता या तालुका कृषी कार्यालयात जाण्यासाठी दिव्यांग बांधव शेतकऱ्यांनी कसे  जायचे ? असा यक्ष प्रश्न पडला आहे कारण कार्यालय दुसऱ्या मजल्यावर असल्याने दिव्यांग बांधवांना वर कसे जायचे हे कळायला मार्ग नाही तर सदरील कार्यालय शहरात असणे आवश्यक असताना गावाबाहेर नेण्या मागील उद्देश काय हे गुपीत उलगडले नाही.  शेतकऱ्यांना आता तालुका कृषी कार्यालयात जाण्यासाठी आर्थिक दंड सोसावा लागत आहे.शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी सदरील कार्यालयाने शहरामध्ये कार्यालय आणावे अशी मागणी शेतकरी बांधव करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा