अरण्यऋषी मारुती चितमपल्ली म्हणजे अरण्य परिसंस्थेचे दीपस्तंभ --- डॉ. काशीद
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली म्हणजे अरण्य परिसंस्थेचे दीपस्तंभ --- डॉ. काशीद
केज
जंगल हे फक्त सौंदर्यांचे ठिकाण नसून वनातील सूक्ष्म निरीक्षणाद्वारे जैवविविधतेचा अभ्यास करून जंगलातील अद्भुत विश्व उभारणारे पद्मश्री मारुती चितमपल्ली म्हणजे अरण्य परिसंस्थेचे दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन डॉ. नवनाथ काशीद यांनी केले. ते मारुती चितमपल्ली यांच्या आदरांजली कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर हे होते. तर मसाप केजचे सचिव राहुल गदळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या स्मरणात मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या मैदानावर वृक्षारोपन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारंप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. सौदागर म्हणाले की, अभ्यासूनी प्रकटावे या उक्तीप्रमाणे पद्मश्री मारुती चितमपल्ली यांनी स्वःअनुभवातून अरण्यातील संबंध विश्व जगासाठी उलगडून दाखवले आहे. याची साक्ष आपणाला त्यांनी लिहिलेल्या
पक्षीकोश, प्राणीकोश, मत्स्यकोश, रणवाटा, अनंददायी बगळे, चकवा चांदण इ. साहित्यातून दिसून येते. मारुती चितमपल्ली यांचे जाणे निसर्ग अभ्यासकांसाठी न भरून येणारी हानी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मराठवाडा साहित्य परिषद केजचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. डॉ. नवनाथ काशीद व सचिव राहुल गदळे यांचा त्यांच्या निवडीबद्दल वृक्ष देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नागेश कराळे तर आभार प्र. डॉ. महादेव सुवर्णकार यांनी मानले. यावेळी श्री. सुजित नाईकवाडे, शिक्षकेत्तर कर्मचारी सतीश नेहरकर, अरविंद गायसमुद्रे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा