महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे बीड जिल्हास्तरीय अधिवेशन 17 सप्टेंबरला होणार - वैभव स्वामी. बीड येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे बीड जिल्हास्तरीय अधिवेशन 17 सप्टेंबरला होणार - वैभव स्वामी.
बीड येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न.
बीड
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे मराठवाडा विभागीय अधिवेशन नुकतेच ऐतिहासिक आणि यशस्वीरित्या संपन्न झाले.आता येणाऱ्या 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बीडचे पहिले जिल्हास्तरीय अधिवेशन 2025 मध्ये घेण्याचे जिल्हास्तरीय बैठकीमध्ये निश्चित झाल्याचे पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी जाहीर केले आहे.
बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे शनिवार दिनांक 21 जून 2025 जागतिक योग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई अंतर्गत बीड जिल्हा शाखेची बैठक मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली. या बैठकीस बीडचे जिल्हाध्यक्ष अमजद खान,ग्रामीण जिल्हाध्यक्ष अँड विनायक जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक काळकुटे, महिला जिल्हाध्यक्ष शेख आयेशा, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष शेख ताहेर यांच्यासह पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस शेख वसीम, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा सरचिटणीस शेख अब्दुल, महिला जिल्हा सरचिटणीस प्रा. अनुप्रिता मोरे, जिल्हा उपाध्यक्ष शेख आयुब, जिल्हा संघटक रईस खान, गेवराईचे तालुकाध्यक्ष अंकुश आतकरे, केजचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजलगावचे मार्गदर्शक सुदर्शन स्वामी, पाटोदा तालुकाध्यक्ष अजिज शेख, वडवणीचे तालुकाध्यक्ष अशोक निपटे, ग्रामीणचे जिल्हा सरचिटणीस बालासाहेब फपाळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनुमते बीड जिल्ह्यातील पत्रकार संघाचे पहिले जिल्हास्तरीय अधिवेशन 2025 हे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर 2025 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. या जिल्हास्तरीय अधिवेशनामध्ये जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री,तसेच माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्री त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी आणि बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांमध्ये नावलौकिक मिळवलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्याचे निश्चित करण्यात आले. हे अधिवेशन नेत्रदीपक आणि ऐतिहासिक करण्याबाबत सर्वांनी एक मुखाने सहमती दिली. स्नेहभोजनाने जिल्हास्तरीय बैठकीची सांगता मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात करण्यात आली.
चौकट...
अधिवेशनामध्ये पत्रकारांसह यशस्वी रत्नांचा होणार बीडचे रत्न या पुरस्काराने सन्मान...
बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातून माध्यमातून 11, त्याचबरोबर जिल्ह्यातून 1 पेपर विक्रेता, 1 पेपर लाईन वाटप करणारा, त्याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये नेत्र दीपक यशस्वी भरारी घेतलेल्या रत्नांचा बीडचे रत्न म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.
चौकट....
पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यांच्यासह राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची मंदियाळी...
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे संस्थापक संजय भोकरे साहेब यांच्यासह पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे सर, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, प्रदेश समन्वयक नितीन शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी, मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल सावंत, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्यासह मुंबई, दिल्ली, पुणे येथील वृत्तवाहिनी, विविध मानांकित दैनिकांचे पत्रकार, संपादक यांना विशेष निमंत्रित करण्यात येणार असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हास्तरीय अधिवेशन संपन्न होणार असल्याने बीडचे हे पहिले अधिवेशन ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा