शंकर माध्यमिक विद्यालय साळेगांव येथे मौखिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

शंकर माध्यमिक विद्यालय साळेगांव येथे मौखिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न 



केज


जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय राऊत सर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय केंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मौखिक आरोग्य अभियाना अंतर्गत दिनांक 2 आॕगष्ट 2025 रोजी शंकर माध्यमिक विद्यालय साळेगाव येथे  उपस्थित अंदाजे 350 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची मौखिक दंत तपासणी उपजिल्हा रुग्णालयाचे दंतशल्य चिकित्सक डॉ.रमण दळवी यांनी केली.उपस्थित विद्यार्थ्यांना दोन वेळा ब्रश करण्याचे महत्त्व, चॉकलेट,जंक फूड इत्यादींचे दुष्परिणाम काय असतात ह्या बद्दल सविस्तर समजावून सांगितले.दैनंदिन आरोग्य व समतोल आहार याचे महत्त्व समुपदेशक श्रीमती सीता गिरी यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.शाळेचे मुख्याध्यापक श्री. तांबारे सर व सर्व शिक्षक वृंद यांनी शिबिराच्या आयोजना साठी विशेष सहकार्य केले.

मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अशा पद्धतीच्या दंत तपासणी शिबिरामुळे शिक्षक,पालक व विद्यार्थी वर्ग समाधान व्यक्त करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा